जगाच्या कानाकोपऱ्यातल्या अजब गोष्टी सोशल मीडियावर Viral होतं असतात. रोजच्यापेक्षा जरा काही वेगळं दिसलं की लोकं त्याला सोशल मीडियावर उचलून धरतात. सध्या इनस्टाग्रामवर रील स्क्रोल करता करता दर ५- १० रीलनंतर तुम्हालाही ‘लड्डू मुत्यानी अवताररं इन संचारी देवरं’ हे गाण ऐकू येतच असेल. त्यासोबत फिरता पंखा हाताने थांबवून लोकांना आशीर्वाद देताना एक दिव्यांग माणूस दिसतं असेलच. एखाद्या अशा माणसाचा पंखा थांबवून लोकं आशीर्वाद का घेत असतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा लड्डू मुत्या बाबा कोण आहे? तो असा पंखा थांबवून आशीर्वाद का देतो, जाणून घेऊया. (Laddhu Muthya)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसतो, ज्याला दोन तीन जण खुर्चीसकट उचलतात. मग त्याच्या डोक्यावर फिरणारा फॅन तो स्वत:च्या हाताने थांबवतो आणि हातात आलेली धूळ विभूती म्हणून भक्तांना म्हणजेच त्याला उचलणाऱ्या माणसाच्या कपाळाला लावतो. या रीलच्या मागे एक गाणं वाजत असतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे. या गाण्यात सारखा उल्लेख होतं असतो ‘लड्डू मुत्या’ या नावाचा. आता लड्डू मुत्यानी अवताररं इन संचारी देवरं हे गाणं वाजल्यावर आपल्याला हा पंखा थांबवणारा बाबाच दिसतो. म्हणून हाच लड्डू मुत्या बाबा आहे असं इनस्टाग्रामीण मंडळींना वाटलं असेल. पण तसं नाही आहे.
तर काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या मुघलखोद मधून एक साधारण कुटुंबातला मुलगा, जो स्पेशल चाइल्ड होता, तो कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यात कुटुंबा पासून लांब पळून आला. पळून येण्याच कारण होतं की तो अभ्यासात एवढा हुशार नव्हता, म्हणून त्याला शाळेतून त्याच्या घरच्यांनीच काढलं होतं. त्याला सुधरवण्यासाठी त्याच्या घरचे त्याला बोलायचे, आम्ही तुझं आता लग्न लावून टाकू. याच गोष्टीला घाबरून तो घरातून पळून बागल कोट येथे आला. (Laddhu Muthya)
तो रस्त्यावरच राहायचा. रस्त्यावर असणारा फळवाल्या शेजारी किंवा एखाद्या दुकानासमोर तो उभा राहायचा तेव्हा त्याला दुकानदार आणि फळवाले खायला द्यायचे. आता फळवाल्यांना आणि दुकानदारांना असा विश्वास बसला की, त्या मुलाला खायला दिल्यावर धंदा चांगला होतं आहे. त्यामुळे त्यांनी त्याला रोज फळ किंवा काहीतरी खायला द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी ते गरजूना वाटायला सुरुवात केली. हळूहळू लोकांमध्ये असा समज पसरला की त्याचा आशीर्वाद घेतल्यावर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईलच. म्हणून लोकं त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. भोवऱ्याला जशी रशी गुंडाळलेली असते तसा फडका हा मुलगा डोक्याला गुंडाळायचा म्हणून त्याच नाव लड्डू मुत्या पडलं असं बोललं जातं. ज्याचा बागलकोटच्या रस्त्यावरच कोणत्या तरी आजाराने मृत्यू झाला. याच लड्डू मुत्या स्वामींचं आज बागलकोट जिल्हयात एक मठ आहे आणि त्यांना मानणारे अनेक भक्त सुद्धा आहेत.
मग व्हायरल झालेल्या पंख्या वाल्या बाबचं काय ? तर त्याचं खरं नाव अजून समोरं आलेलं नाहीये. पण त्याच वागणं बोलणं लड्डू मुत्या या स्वामींसारखच आहे म्हणून लोकं त्याला सुद्धा लड्डू मुत्याच म्हणतात. अशी माहिती मिळाली आहे. एकदा त्याने एका भक्ताच्या घरात जोरात फिरणारा पंखा हाताने थांबवला आणि त्या भक्ताला आशीर्वाद दिला. तेव्हा पासून लोकं त्याला आपल्या घरी नेऊ लागली आणि पंखा थांबवून आशीर्वाद घेऊ लागले. एवढचं नाही काही भक्तांनी त्याला कार सुद्धा भेट दिली आहे. त्याच्याच एका भक्ताने त्याचा पंख्यावरून हात फिरवून आशीर्वाद देतानाचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मिडियावर टाकला. मग काय त्या रीलने धुमाकूळच घातला. आज अनेक जण लड्डू मुत्यानी अवताररं इन संचारी देवरं हे गाणं वापरुन कधी पंख्याला हात लावून, कधी एसीला, तर कधी ट्रॅक्टरच्या टायरला हात लावून आशीर्वाद देतानाच्या व्हिडिओ बनवल्या आणि पोस्ट केल्या आणि करत आहेत.
======
हे देखील वाचा : अलिगढचे लड्डूगोपाल
======
काहींनी मस्करीत प्रश्न सुद्धा विचारले की, पंख्याने आशीर्वाद दिल्यावर चमत्कार होतं असेल तर. हेलिकॉप्टरच्या पंख्याला हात लावून आशीर्वाद द्या. आता श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण पंख्यावरुन हात फिरवताना अपघात सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या श्रद्धेला सुद्धा मर्यादा असायला हवी नाही का ? (Laddhu Muthya)