LAC Standoff- भारत आणि चीन सैन्याने लद्दाख मधील गोगरा-हॉट स्प्रिंग क्षेत्रातील गस्त चौकी-१५ च्या स्टँडऑफ लाइनपासून, फ्रंट लाइन पर्यंत असलेल्या आपल्या सैनिकांना माघार घेण्यास सांगितली आहे. दोन्ही देशांमध्ये १६ व्या फेरीच्या सैन्य स्तरीय वार्तेत झालेल्या एकमतामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत तेथील अस्थायी बंकर सुद्धा उद्धस्त करण्यात आले. सुत्रांच्या हवाल्याने न्यूज एजेंसी पीटीआयने ही माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, या दोन्ही पक्षांच्या योजनेनुसार माघार घेण्यात आली आहे, ज्यामध्ये संपूर्ण प्रक्रियेचे संयुक्त रुपात सत्यापण करण्याचा सुद्धा समावेश आहे. एका सुत्राने असे म्हटले की, माघार घेणे आणि सत्यापनाच्या प्रक्रियेसंदर्भात स्थानिक कमांडर यांच्याकडून संपूर्ण माहितीची वाट पाहिली जात आहे. दोन्ही पक्षाने चौकी-१५ (pp-15) पासून माघार घेतली आहे. मात्र डेचमोक आणि देपसांग क्षेत्रात अडथळे सोडण्यासंदर्भात कोणतीही प्रगती झालेली नाही.
भारत आणि चीनच्या सैन्याने ८ सप्टेंबरला घोषणा केली होती की, त्यांनी क्षेत्रात अडथळे आणणाऱ्या ठिकाणांपासून सैनिकांना हटवण्यासाठी थांबलेली प्रक्रिया पुढे नेत पीपी-१५ येथून सैनिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पीपी-१५ मध्ये सैनिकांना माघार घेण्यासंदर्भात विचारल्यास सैन्याच्या प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी असे म्हटले की, मला तेथे जाऊन अंदाज घ्यावा लागेल, मात्र ते निर्धारित कार्यक्रमानुसारच होत आहे.(LAC Standoff)
सुत्रांनी असे म्हटले की, सामना होणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेले सर्व बंकर नष्ट करण्यात आले आहे. सध्या हे माहिती नाही की, खरंच दोन्ही पक्ष पीपी-१५ वर एक बफर जोन तयार करतील का? जसे की, पैंगोग नदीच्या उत्तर आणि दक्षिण तटावर आणि गेल्या वर्षात गस्त चौकी-१७ (ए)वर संघर्षात्मक होणाऱ्या बिंदूंवरुन सैनिकांना हटवल्यानंतर तयार करण्यात आला होता. बफर जोन येथे सुद्धा कोणत्याही पक्षाकडून गस्त घातली जात नाही. दोन्ही सैन्यांनी ८ सप्टेंबरला सुरु केलेल्या प्रक्रियेची घोषणा करत असे म्हटले होते की, जुलै मध्ये उच्च स्तरीय सैन्याच्या बैठकीच्या १६ व्या फेरित गोगरा-हॉट स्प्रिंग क्षेत्रातील सैन्यांना माघार घेण्यासंदर्भात एकमत झाले आहे.
हे देखील वाचा- भारतात नाही तर, ‘या’ देशात ठरली ‘साक्षरता दिवसाची’ संकल्पना
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ९ सप्टेंबरला म्हटले होते की, पीपी-१५ मधील सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया सोमवार पर्यंत पूर्ण होईल. बागची यांनी असे म्हटले की, करारानुसार या क्षेत्रातील सैन्याला मागे हटवण्याची प्रक्रिया ८ सप्टेंबरच्या साठे आठ वाजल्यापासून सुरु झाली असून ती १२ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही पक्षांनी या क्षेत्रात योग्य पद्धतीने, समजूतीने आणि सत्यापित पद्धतीने पुढील तैनाती रोखण्यावर एकमत व्यक्त केले आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षातील सैन्याने माघार घेतली आहे.