जगातील, देशातील अशा काही घटना घडल्या आहेत त्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. यामध्ये अशा काही घटना असतात ज्याबद्दल लोकांना माहिती असते पण त्याचे रहस्य कोणालाच माहिती नसते. अशातच राजस्थान मधील कुलधरा गाव (Kuldhara Village) हे सुद्धा त्या घटनांपैकी एक आहे. या ठिकाणाला असे म्हटले जाते की, येथील लोक रात्रीच्या रात्री घर सोडून निघून गेले होते. हे खुप हैराण करणारी गोष्ट आहे, कारण गावातील सगळी लोक अशी एकाच वेळी रात्रोरात कशी आणि कुठे जाऊ शकतात? या अशा घटनेमुळे आज ही लोक त्या ठिकाणी जाणे पसंद करत नाहीत. असे म्हटले जाते की, त्या गावात भूतांचा वावर असतो आणि त्यामुळेच लोक जात नाहीत.
कुलधारा हे गाव राजस्थान मधील जैसलमेर येथून जवळजवळ २० किमी दूर आहे. या गावाबद्दल असे सांगितले जाते की, येथे भूत असतात आणि गावात कोणीही राहत नाहीत. गावात खुप जुनी घरं आहेत, जी आता पूर्णपणे खडकांमध्ये रुपांतरीत झाली आहेत. मात्र त्याच्या भिंती शाबूत आहेत. या गावाला आता लोक भूताटक्यांची जागा म्हणून ओळखू लागले आहेत. असे म्हटले जाते जवळजवळ २०० वर्षांपासून हे गाव अशाच पद्धतीने रिकामे आहे. रात्रीच्या वेळी येथे लोकांना जाण्यास ही परवानगी दिली जात नाही.

काय आहे रहस्य?
आज भले या गावाला भूताटक्यांची जागा म्हणून ओळखले जाते. मात्र या आधीची स्थिती तशी नव्हती तेथे लोकांची गर्दी दिसून यायची. मान्यतांनुसार आणि लोक कथांनुसार, हे पालीवाल ब्राम्हणांचे गाव होते. मात्र एके दिवशी असे झाले की, गावातील जवळजवळ १५०० लोकांनी येथून पलायन केले आणि त्याला काही लोक कथेत गायब होणे असे म्हणतात. आता या गावात येण्यासंदर्भात विविध कथा सांगितल्या जातात. परंतु नक्की काय झाले होते हे रहस्यच आहे.(Kuldhara Village)
हेे देखील वाचा- पद्मनाभ मंदिराच्या ७व्या दरवाजाचे रहस्य काय? किती असू शकतो खजिना?
काय आहे यामागील कथा?
असे म्हटले जाते की, येथे एक मंत्री रहायचा त्याचे नाव सलीम सिंह होते. सलीम हा अतिशय क्रुर होता आणि गावातील लोक त्याच्या वागण्यामुळे कंटाळले होते. असे सुद्धा सांगितले जाते की. तो वसूली करायचा आणि गावातील लोकांचे शोषण करायचा. त्याला कंटाळून लोकांनी गाव सोडले. त्या सोबत असे ही म्हटले जाते की, सलीमने एकदा गावातील प्रधानांच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिले आणि तिला आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ब्राम्हणांनी येथून निघून जाण्याचे ठरवले.
काही लोक असे ही सांगतात की, ब्राम्हणांनी एकत्रितपणे पलायन तर केले होते आणि जाताना त्यांना गावाला श्राप सुद्धा दिला. त्यानंतर येथे एकही व्यक्ती राहण्यास गेला नाही. तेव्हापासून हे गाव ओसाड पडलेले आहे. लोकांचे असे मानणे आहे की, जर येथे गेलो किंवा राहिल्यास कोणा सोबत ही काहीही वाईट होऊ शकते.