भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री झाला. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी उपवास, जागरण, भजन-कीर्तन, विविध धार्मिक विधी करून भगवान कृष्णांची पूजा करतात. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णांना आवडणारे पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णाचे विविध पदार्थ करून लाड पुरवले जातात. यासाठी घरांमध्ये अनेक पदार्थ बनतात. यातल्याच काही पारंपरिक पदार्थांची सोपी आणि सहज होणारी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे पदार्थ बनवून तुम्ही कृष्णाला अर्पण करू शकतात. (janmashtami naivedya)
सुंठवडा
साहित्य
– सुंठ पावडर – २ टेबलस्पून
– बदाम पावडर – २ टेबलस्पून
– शुद्ध तूप – २ टेबलस्पून
– नैसर्गिक गोडवा / खजूर पावडर / गूळ – ३ टेबलस्पून
– वेलदोडा पावडर – ½ टीस्पून
– जायफळ पावडर – चिमूटभर
कृती
कढईत मंद आचेवर तूप गरम करा. त्यात बदाम पावडर घालून हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. त्यानंतर सुंठ पावडर, वेलदोडा आणि जायफळ घालून नीट मिक्स करा मात्र हे मिश्रण जास्त भाजू नका. गॅस बंद करून लगेच त्यात खजूर पावडर किंवा गूळ घालून चांगले मिक्स करा. आता तयार सुंठवडा श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करून प्रसाद म्हणून वाटा. (Marathi News)
———————————————————————————————————————————
पंजिरी
साहित्य
– धने पावडर – 100 ग्रॅम
– शुद्ध देसी तूप – 3 टीस्पून
– साखरेची पावडर – 1/2 कप
– किसलेलं नारळ – 1/2 कप
– मखाने – 1/2 कप
– काजू – 8-10
– बदाम – 8-10
– चिरंजीचे (चारोळी) दाणे – 1 टीस्पून
कृती
पंजिरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई घ्या. त्यात १ टीस्पून तूप टाका आणि मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळेल तेव्हा कढईमध्ये धने पावडर टाका आणि गॅस कमी आचेवर ठेवा. १-२ मिनिटे धने पावडर भाजून घ्या. भाजलेली धने पावडर प्लेटमध्ये काढा. आता पुन्हा कढईत तूप टाका आणि त्यात मखाने मध्यम आचेवर भाजून घ्या. मखाने चांगले भाजले की त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर काजू आणि बदामाचे तुकडे करुन त्यात घाला. एका वाटीत किसलेलं नारळ घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र करा. शेवटी चिरंजीचे दाणे टाका आणि पुन्हा एकत्र करा. (Todays Marathi Headline)
———————————————————————————————————————————
मोहनथाळ
साहित्य
– अर्धा किलो बेसन
– ४०० ग्रॅम साखर
– ३०० ग्रॅम मावा
– १५० ग्रॅम साजूक तूप
– १५ वेलची दाणे
– १० काजू
– १० बदाम
– अर्धा कप दूध
कृती
प्रथम अर्धा किलो चण्याच्या डाळीचं पीठ घेऊन त्यात अर्धा कप दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर मिश्रणावर झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवावे. एक तासानंतर मिश्रणातील गुठळ्या हाताने व्यवस्थित फोडून हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे. नंतर गॅसवर पितळेच्या कढईत १०० ग्रॅम साजूक तूप घालून मध्यम आचेवर गरम करावं. तूप गरम झाल्यानंतर त्यात चण्याच्या डाळीचं पीठ घालून ते व्यवस्थित भाजून घ्या. पीठ भाजले की ते एका ताटात काढून घ्या. (Top Trending News)
पुन्हा कढईत ५० ग्रॅम साजूक तूप गरम करत ठेवा. त्यात ३०० ग्रॅम मावा, ४०० ग्रॅम साखर, एक चमचा दूध आणि वेलचीपूड घालून, मिश्रणाचा पाक होईपर्यंत सतत ढवळत राहा. मिश्रणाचा पाक झाल्यानंतर भाजलेले पीठ पाकात घालून सुमारे १० मिनिटं मध्यम आचेवर एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. १० मिनिटांनी गॅस बंद करा. परातीला साजूक तूप लावून घ्या. नंतर कढईतील मिश्रण परातीत ओतून वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित एकसमान पसरवा. मग त्यावर काजू-बदामचे तुकडे पसरवून, वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित थापून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने वड्या पाडा आणि मोहनथाळचा आस्वाद घ्या. (Top Stories)
———————————————————————————————————————————
पंचामृत
==============
हे देखील वाचा : Shrikrushna : श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला?
===============
साहित्य
– दूध – १ कप
– दही – ½ कप
– मध – २ चमचे
– साखर – २ चमचे
– तूप – १ चमचा
– वेलची पावडर – चिमूटभर
– तुळशीची पाने – २ ते ३
कृती
यासाठी सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन त्यात दही मिसळावे. त्यात मध, साखर, तूप घालावे. सर्व मिश्रण नीट ढवळावे. नंतर त्यात वेलची पावडर, तुळशीची पाने घालून पुन्हा मिसळावे. हे पंचामृत भगवान कृष्णांना अर्पण करावे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics