Home » Janmashtami : २०० वर्ष जुने ऐतिहासिक नाशिकमधील मुरलीधर मंदिर

Janmashtami : २०० वर्ष जुने ऐतिहासिक नाशिकमधील मुरलीधर मंदिर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Janmashtami
Share

श्रावण महिना सुरु झाला की लगेच सुरु होते सणांची रेलचेल. श्रावणातील व्रत वैकल्यांसोबतच साजरे केले जातात विविध सण. नागपंचमी झाली, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झाले आता सगळे वाट पाहत आहेत, श्रीकृष्ण जन्माष्टमीची. आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या नटखट कान्हाचा जन्मोत्सव म्हणजे भक्तांसाठी जणू पर्वणीच. भगवान विष्णूचा द्वापारयुगात अवतार म्हणून श्रीकृष्णांना ओळखले जाते. कंस राजाच्या कैदेमध्ये देवकी आणि वासुदेव यांचे आठवे संतान म्हणून भगवान विष्णूंनी कृष्ण अवतार घेतला. (Todays Marathi Headline)

अवघ्या काही दिवसांवरच श्रीकृष्ण जनमाष्टमीचा उत्सव येऊन ठेपला आहे. सर्वच घरांमध्ये, कृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टीमीची तयारी अंतिम टप्प्यात आली असेल. आपल्या लाडक्या कृष्णाचा जन्म मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. रात्री १२ वाजता सर्वच कृष्ण मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये हा उत्सव होतो. मात्र काही ठिकाणी जन्माष्टमीच्या काही दिवस आधीपासूनच या जन्माष्टमीच्या उत्सवाला सुरुवात होते. यातलेच एक मंदिर म्हणजे, नाशिक येथील मुरलीधर कृष्ण मंदिर. (Top Marathi News)

मंदिरांचे शहर म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. नाशिकमध्ये अनेक जुनी नवीन मंदिरं आहेत. यातलेच एक मंदिर म्हणजे कापडपेठेतील मुरलीधराचे मंदिर. दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. या दरम्यान श्री मुरलीधराचे विविध रूपे साकारली जातात. यात झुल्यावर विराजमान कृष्ण, शेषनाग, मोर, मोहिनी, अर्धनारीनटेश्वर, झुल्यावर कृष्ण रूप, गरुडावर विराजमान कृष्ण, रथावर विराजमान कृष्ण, घोंगडीवाला कृष्ण अशा विविध प्रकारचे रूप साकारले जातात, कृष्णाची ही विविध रूप बघण्यासाठी नाशिक शहरातून भाविक या मंदिरात गर्दी करीत असतात. (Latest Marathi News)

Janmashtami

नाशिक मधील १९९ वर्ष जुने मुरलीधर मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक मुरलीधर मंदिर नाशिकच्या कापड बाजारातील पुरातन मंदिर आहे. १८२५ साली गणराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आहे. आज त्यांची १४ वी पिढी या मंदिराचं व्यवस्थापन बघत आहे. गोदावरीच्या तीरावर हे मंदिर वसलेले आहे. मुरलीधर मंदिर लाकडी जुन्या ठेवणीतील बनवलेले मंदिर आहे. मंदिरात असलेली श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक आहे. या मंदिरात श्री कृष्णाची बालमूर्ती असून, मूर्तीकडे बघितल की श्री कृष्णाचे मनमोहक रूप डोलत पाणी आणि ओठांवर स्मितहास्य एकाचवेळी घेऊन येते. (Top Stories)

===================

हे देखील वाचा : Shravan : श्रावण विशेष : त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास

Tulsidas: रामचरितमानस ग्रंथाची रचना करणाऱ्या संत तुलसीदासांची आज जयंती

===================

दररोज अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र जन्माष्टमीच्या उत्सव काळात भाविकांची अलोट गर्दी असते. श्री कृष्णाचे हे ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर सराफ बाजारालगत असलेल्या कापड बाजारात आहे. सीबीएस बस स्थानकापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर आहे. मंदीर सकाळी भाविकांसाठी ७ वाजता उघडते तर रात्री १० वाजता बंद होते. मंदिरात सकाळी व सायंकाळी ८ वाजता आरती होत असते. बस किंवा खाजगी वाहनाने आपण मंदिरापर्यंत पोहचू शकतो. श्री मुरलीधर मंदिरात मागितलेली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसंच ज्यांचं लग्न जमत नाही, वंशवृद्धी होत नाही, अशांना मंदिरातून श्रीकृष्णाची मूर्ती दिली जाते. त्यानंतर या मूर्तीची मनोभावे पूजा केल्यानंतर मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.