Home » केरळातील ‘या’ मंदिरात स्री च्या वेशात जातात पुरुष मंडळी

केरळातील ‘या’ मंदिरात स्री च्या वेशात जातात पुरुष मंडळी

by Team Gajawaja
0 comment
Kottankulangara sridevi temple
Share

भारताच्या संस्कृतीत विविधता असल्याचे वेळोवेळी दिसून येते. प्रत्येक जातीनुसार परंपरा-रुढी या प्रत्येक गोष्टींमध्ये वेगळ्या आहेत. अशातच पवित्र स्थान मानल्या गेलेल्या मंदिरांबद्दल ही वेगवेगळ्या परंपरा आहे. एखाद्या मंदिरात महिलांना जाण्यास बंदी आहे तर दुसरीकडे पुरुषांवर बंदी, मात्र तुम्ही कधी अशा मंदिराबद्दल ऐकले आहे का ज्यामध्ये देवीच्या पुजेसाठी पुरुषांना चक्क स्री च्या वेशात जावे लागते. यावेळी पुरुषांना साडी नेसणे अनिवार्य असून त्यांना १६ श्रृंगार करत देवाजी पूजा करावी लागते.(Kottankulangara sridevi temple)

हे खास मंदिर केरळातील कोल्लम येथे आहे. ज्याला कोट्टनकुंलंगरा श्री देवी मंदिराच्या नावाने ओळखले जाते. मार्च महिन्यात येथे Chamayavilakku Festival साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान पुरुष मंडळी या महिलांप्रमाणे साडी नेसून आणि नटून मंदिरात जातात आणि देवाची आराधना करतात.

फेस्टिवलच्या दरम्यान पुरुषांना मेकअपण करण्यासाठी दक्षिण भारतातील तमाम मेकअप आर्टिस्ट येतात. मंदिर परिसराच्या बाहेर एक स्टॉल लावला जातो. तेथेच मेकअप केला जातो. उत्सवादरम्यान ज्या पुरुषांचा मेकअप खास असतो त्यांना पुरस्कार ही दिला जातो. केरळातील या उत्सवात ट्रांसजेंडर समुदायाची लोक सुद्धा सहभागी होऊ शकतात. कोट्टनकुंलंगरा श्री देवी मंदिरात जी प्रतिमा आहे ती स्वयंभू आहे. लोककथांमध्ये सुद्धा मंदिर आणि उत्सवाचा उल्लेख करण्यात आला आहे.

असे म्हटले जाते की, एका मुलांच्या ग्रुपला जंगलात खेळताना एक नारळ मिळाला होता. तेव्हा त्यांनी तो फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यामधून रक्त वाहू लागले. जेव्हा त्यांनी या बद्दल लोकांना सांगितले तेव्हा या नारळाला देवीचे रुप मानले गेले. त्यानंतर या मंदिराची स्थापना करण्यात आली. अशी मान्यता आहे की, जे पुरुष महिलांच्या वेशात पुजा करण्यासाठी येतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. हा उत्सव मलयाली महिना मीनमच्या आधारावर साजरा केला जातो. जो मार्च महिन्यात येतो. येथील खासियत अशी की, कोणत्याही धर्माचे, जातिचा व्यक्ती येथे येऊ शकतो.(Kottankulangara sridevi temple)

हे देखील वाचा- काश्मिरमध्ये पुन्हा ‘शारदा माता मंदिरात’ भाविकांचा जयघोष 

असे म्हटले जाते की, येथे उत्तम नोकरी ते उत्तम बायको मिळावी म्हणून लोक इच्छा व्यक्त करतात. मंदिराच्या नियमांनुसार पूजा करताना त्यांच्या या इच्छा पूर्ण होतात. हेच कारण आहे की, पुरुष मंडळी स्री यांच्या वेशात या मंदिरात येतात. तर केरळातील हे एकमेव मंदिर आहे जेथे देवीच्या गाभाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे छत अथवा घुमट नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.