जेवढे देश तेवढे वेश असे म्हटले जाते. पण त्या देशात अगदी पावलापावलावर पदार्थांची चव बदलली जाते. आपल्या देशाच्या सगळ्याच प्रांतात विभिन्न पदार्थ बनवले जातात. ब-याचवेळा एकच पदार्थ अनेक पद्धतीनं केला जातो. जगात कुठेही जा, जिभेचे चोचले पुरवणा-या खाद्यपदार्थांची भलीमोठी यादीच समोर येते. मात्र या सर्वांमध्ये कॉमन असणारा पदार्थ म्हणजे, मीठ कुठल्याही देशातील खाद्यपदार्थांमध्ये मीठ नसेल तर त्याची चव चाखायाला कोणालाही आव़डत नाही. (Salt)
जगाच्या पाठिवर कुठेही जा, मीठ हे अन्नपदार्थांमध्ये असणारच. या मिठाचे प्रकार किती असतात, आणि त्याची किंमत किती असते, हे जाणून घेणे उत्सुकतेचे आहे. साधारण मिठ हे सर्वात स्वस्त समजले जाते. अगदी महागात महाग मीठ म्हणजे, 100 रुपये किलो. या शंभर रुपयांवर महिना तरी आरामात निघतो. पण जगात असेही एक मीठ मिळते, त्याची किंमत काही हजारात आहे. हे मीठ कोरियामध्ये तयार केले जाते. या मिठाची किंमत 30 हजार रुपये किलो आहे. याला कोरियन बांबू मिठ असेही म्हटले जाते. जगातील सर्वात महाग आणि दुर्मिळ मिठांमध्ये याचा समावेश होतो. 250 ग्रॅम कोरियन मिठाची किंमत 7500 रुपयांपर्यंत जाते. या महागड्या अशा कोरियन मिठामध्ये काय विशेष आहे, हे समजून घेऊयात. स्वयंपाकघरात मिठाची खास जागा असते. गोड, तिखट अशा कुठल्याही पदार्थात चिमुटभर तरी मीठ लागतेच. आपल्याकडे मिठाचे निवडक प्रकार वापरले जात असले तरी, जगभरात मिठाचे बाराहून अधिक प्रकार आहेत. आपण शक्यतो जाड मीठ, खडा मीठ किंवा अलिकडे वापरण्यात येणारे सैंधव मीठ बघितले आहे. (Social News)
पण याशिवाय अन्यही मिठाचे प्रकार असून त्यांच्या किंमतीही वेगवेगळ्या आहेत. अर्थात या किंमती हजार रुपयांच्या आत आहेत. मात्र जगात सर्वात महाग आणि दुर्मिळ असे मीठ हे कोरियन बनावटचे आहे. या 250 ग्रॅम मिठाला तब्बल 7500 रुपये मोजावे लागतात. हे मीठ तयार करण्यासाठी अत्यंत किचकट अशी प्रक्रिया असते. त्यामुळेच त्याची किंमत सर्वात जास्त असते. कोरियन मिठाला कोरियन बांबू मीठ, जांभळा बांबू मीठ किंवा जुग्योम असेही म्हणतात. कोरियन बांबू मीठ बनवण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यासाठी समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले मिठ बांबूच्या नळ्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे मीठ अनेक दिवस विशिष्ट तापमानावर भाजले जाते. त्याला अॅमेथिस्ट बांबू म्हणतात. मीठाने भरलेल्या बांबूच्या नळ्या 800 °C ते 1000 °C तापमानापर्यंत गरम केल्या जातात. यामुळे बांबूमध्ये असलेले खनिजे मीठात मिसळली जातात. या सर्व प्रक्रियात मिठाचा पोत, रंग आणि वैशिष्ट्ये देखील बदलली जातात. (Salt)
मिठाला बांबूच्या नळ्यांमध्ये भाजण्यात आल्यामुळे बांबूमध्ये असलेल्या गुणधर्माची मिठामध्ये भर पडते. हे मीठ नंतर थंड करण्यात येते. या संपूर्ण प्रक्रियेला किमान 50 दिवस लागतात. हे मीठ तयार कऱणारे कामगारही कुशल असतात. यातील एकही प्रक्रिया चुकली तर मिठाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळेच या मिठाची किंमतही आभाळाएवढी असते. कोरियन बांबूच्या मीठात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अशी अनेक खनिजे असतात. हे मीठ शरीरात अँटी-ऑक्सिडंट्स वाढवते. याचे सेवन केल्यास मानवी शरीराला अनेक फायदे होतात. संधिवाताच्या रुग्णांसाठी हे मीठ म्हणजे, औषधासारखे उपयोगी ठरते. शिवाय अल्सर, आणि हिरड्यांमध्ये येणारी सूज यावरही या मिठामुळे उतार होऊ शकतो. कोरियन मीठ शरीराची पीएच पातळी संतुलित करते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते. शिवाय पचनशक्ती वाढवण्यासाठीही या मिठाचा उपयोग होतो. त्यामुळेच या मिठाची किंमत ही जास्त आहे. (Social News)
===============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
भारतात हे मीठ अगदी मोजक्या ठिकाणी मिळते. या कोरियन मिठाला तयार करण्यासाठी काही दिवसाचा कालावधी जात असल्यामुळे ब-याचवेळा आधी त्याची मागणी नोंदवावी लागते. या कोरियन मिठाबरोबरच अन्य मिठाचे प्रकारही आहेत, ज्याबदद्ल फारशी माहिती नाही. यात कोशेर मीठ आहे, युरोपियन देशात या मिठाचा जास्त वापर होतो. हिमालयीन गुलाबी मीठ किंवा दगडी मीठ हे मीठ जगातील सर्वात स्वच्छ मीठ मानले जाते. पाकिस्तानमधील हिमालयीन पर्वतरांगातील खेवरा मीठ खाणींमधून हे मीठ काढले जाते. सेल्टिक समुद्री मीठही उपलब्ध आहे. फ्रान्सच्या किनाऱ्यावरील भरती-ओहोटीच्या तलावांमधून सेल्टिक समुद्री मीठ काढले जाते. हिमालयीन प्रदेशात आढळणारे काळे मीठही उपयुक्त मानले जाते. याशिवाय लाल हवाईयन मीठ, स्मोक्ड मीठ, पिकलिंग मीठ असे अनेक मिठाचे प्रकार आहेत. (Salt)
सई बने