Home » Netflix वर पहा ‘हे’ टॉप 5 कोरियन ड्रामा

Netflix वर पहा ‘हे’ टॉप 5 कोरियन ड्रामा

भारतीय प्रेक्षकांमध्ये काही कोरियन ड्रामा फार पसंद केले जात आहेत. अशातच कोरियन ड्रामाचा उत्तम कंटेट आणि व्हिज्युअल्स इफेक्ट्स हे सर्वांना पहायला आवडतात.

by Team Gajawaja
0 comment
Share

भारतीय प्रेक्षकांमध्ये काही कोरियन ड्रामा फार पसंद केले जात आहेत. अशातच कोरियन ड्रामाचा उत्तम कंटेट आणि व्हिज्युअल्स इफेक्ट्स हे सर्वांना पहायला आवडतात. काही इंडियन ओटीटी प्लॅटफॉर्मलर आजकाल कोरियन ड्रामा हिंदीत दाखवले जात आहेत. जे तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासह किंवा मित्रमैत्रीणींसोबत आवर्जुन पाहू शकता. इंडियात नेटफ्लिक्सवर काही कोरियन ड्रामा अत्यंत प्रसिद्ध झाले आहेत. त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. (Korean drama on Netflix)

ग्लॉबिन 


जर तुम्हाला रोमँन्टिक फेंटेसी ड्रामा पाहण्याची आवड असेल तर तुम्ही ग्लॉबिन पाहू शकता. याची कथा एका ग्लॉबीनवर आधारित आहे, ज्याला एका तरुणीशी लग्न करायचे असते. जेणेकरून त्याला आपल्यामधील लपलेल्या एका अदृश्य तलवारला काढता येईल. यामुळे तो अन्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकेल. हा ड्रामा काही इमोशन्सला एकत्रित जोडण्याचे काम करतो. हा शो तुम्ही नेटफ्लिक्सवर मोफत पाहू शकता.

पेंटहाउस

The Penthouse | Korea | Drama | Watch with English Subtitles & More ✔️
सत्ता, पावर आणि संपत्तीवर आधारित एखादा ड्रामा पहायचा असेल तर तुम्ही नेटफ्लिक्सवर कोरियन ड्रामा पेंटहाउस जरूर पहा. हा एक अॅक्शन आणि सस्पेंशन शो असून जो काही देशांमध्ये फार प्रसिद्ध आहे. शो ची कथा हेरा-पॅलेसच्या घरावर आधारित आहे. ज्याला पेंटहउसच्या नावाने ओळखले जाते. यामध्ये दोन परिवार एकाच घरावर हक्क गाजवू पाहत आहेत. याच कारणास्तव या शो मध्ये सस्पेंस आणि थ्रिलरची मजा घेता येईल.

डॉक्टर स्ट्रेंजर

Doctor Stranger | Netflix
भारतीय तरुणांसाठी डॉक्टर स्ट्रेंजरची कथा खुप रिफ्रेशिंग आहे. ज्यामध्ये डॉक्टरच्या आयुष्याबद्दल दाखवले गेले आहे. तो डॉक्टर पैशांसाठी मोठ्या गुन्हेगार ते दहशतवाद्यांवर उपचार करतो हे दाखवले आहे. मात्र जेव्हा त्याच्या आयुष्यात एक महिला येते आणि त्यांचे प्रेम जुळते तेव्हा दोघांचे आयुष्य बदलले जाते. यानंतर दोघांच्या आयुष्यत काही प्रकारचे ट्विस्ट येतात. जे तुमचे नक्कीच मनोरंजन करतील. हा ड्रामा तुम्ही जरूर नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Korean drama on Netflix )

क्रॅश लँन्डिंग ऑन यू

Crash Landing on You | Netflix ऑफ़िशियल साइट
क्रॅश लँन्डिंग ऑन यू खुप प्रसिद्ध कोरियन ड्रामा आहे. जो तुम्ही हिंदीत नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या शो मध्ये एका महिलेबद्दल सांगितले आहे. जी व्यावसायिक आहे आणि ती पॅराग्लाइडिंग करत नॉर्थ कोरियात पोहचते. तुम्ही या विकेंडला हा सिनेमा आपल्या परिवारासोबत पाहू शकता. हा एक रोमँन्टिक आणि कॉमेडी बेस्ड ड्रामा आहे. जो तुम्ही पार्टनरसोबत पाहू शकता.

हेही वाचा- 5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री

इट्स ओके टू नॉट बी ओके

Its Okay To Not Be Okay Full Episode 4 Korean Drama in Hindi/Urdu Part 1 -  video Dailymotion
जर तुम्हाला फॅमिली ड्रामा पाहणे पसंद असेल तर इट्स ओके टू नॉट बी ओके एक उत्तम ऑप्शन आहे. यामध्ये एका मुलीची स्टोरी दाखवली आहे जी पूर्ण समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या आईसोबत राहते. मात्र आई तिला नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न करते. याच कारणास्तव ती मुलगी सतत आपल्या आईच्या त्रासाला बळी पडते. परंतु तिच्या आयुष्यात जेव्हा एका मुलाची एन्ट्री होते तेव्हा तिचे आयुष्य बदलले जाते. हा ड्रामा तुम्ही हिंदीत जरुर नेटफ्लिक्सवर पाहू शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.