Home » एका ट्रेनी डॉक्टरची हत्या !

एका ट्रेनी डॉक्टरची हत्या !

by Team Gajawaja
0 comment
Kolkata Rape Case
Share

कोलकत्ता राधा गोविंदाकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी एक अर्धनग्न मृतदेह आढळला. तपासणी केली तर कळालं की, मृतदेह हॉस्पिटलमध्येच काम करणाऱ्या एका महिला ट्रेनी डॉक्टरचा आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून तिच्या घरी कळवलं जात की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिचे आईवडील येतात आणि तिला पाहून स्तब्ध होतात त्यांना कळत नाही त्यांच्या मुलीसोबत नेमकं काय झालं आहे. कारण त्या मृतदेहाच्या डोळ्यातून, तोंडातून आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता आणि मानेच हाड सुद्धा तुटलेलं होतं. काय आहे ही भयानक घटना जी कोलकत्त्या मध्ये घडली आहे ? आरोपी कोण आहे ? (Kolkata Rape Case)

९ ऑगस्टच्या रात्री ती आरजी कार हॉस्पिटल मध्ये ३६ तासांची ड्यूटि करत होती. आईचा फोन आल्यावर तिने आईला सांगितलं की, “मी आता राऊंडवर जाते आहे. जेवण ऑनलाइन मागवलं आहे आल्यावर जेवून घेईल”. हे तिचं आईसोबतचं शेवटचं बोलणं ठरलं. रात्री २ वाजता ती आपल्या जुनीअर्स सोबत जेवली आणि मग थोडी विश्रांती घेण्यासाठी ती हॉस्पिटलच्या सेमिनार हॉल मध्ये गेली, सेमिनार हॉल मध्ये का गेली कारण हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या ड्युटी रूमची कमतरता आहे म्हणून. तिथे ती शांत झोपलेली. तेव्हा तिथे आला संजय रॉय नावाचा नराधम. ती एकटी झोपलीये हे पाहून तो सेमिनार हॉल मध्ये घुसला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिचा चश्मा फोडला त्या चश्म्याच्या काचा तिच्या डोळ्यात घुसल्या तीच डोकभिंतीवर आपटून तिला ठार केलं आणि मग तिच्यावर बलात्कार केला. रात्री ३ ते ६ च्या दरम्यान ही घटना घडली. (Kolkata Rape Case)

त्यानंतर या नराधमाने काय केलं, घरी गेला, झोपला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं कपडे धुतले. पण त्यांने त्याचे बूट मात्र धुतलेच नाही ज्यावर रक्ताचे डाग होते. संजय रॉय हा एक नागरी स्वयंसेवक म्हणून काम करतो तो बॉक्सर सुद्धा आहे. नागरी स्वयंसेवक म्हणजे काय पोलिसांची छोटी मोठी काम करणार माणूस. पण त्याने स्वत:ला पोलिसच घोषित केलं होतं. त्याच्या गाडीवरही त्याने पोलिस म्हणून स्टिकर लावलेलं.एका मित्राचे नातेवाईक रुग्णालयात होते. त्यांना पाहण्याचं कारण देत तो रुग्णालयात आला होता. एका मित्राचे नातेवाईक रुग्णालयात आहेत असं सांगून तो हॉस्पिटलमध्ये आला होता. सुरूवातीला ११ वाजता आणि मग नंतर साडेतीन वाजता त्या रात्री तो हॉस्पिटलच्याच मागे दारू पित होता, आणि दारू पितांना तो अश्लील व्हिडिओ पाहत होता. त्यानंतरच त्यांने ते कृत्य केलं. (Kolkata Rape Case)

पोलिसांनी CCTV  फूटेजेस चेक केलं तेव्हा सेमिनार हॉलच्या आसपास फिरणाऱ्या सर्वांचा शोध घेतला गेला. घटनास्थळी पोलिसांना एक ब्ल्युटूथ ईयरफोन सापडलं होतं. ते सर्वांच्या मोबईल फोनला कनेक्ट करून बघत होते तेव्हा ते संजय रॉयच्या मोबईलशी कनेक्ट झालं आणि लगेचच त्याला अटक करण्यात आली. CCTV फूटेजेस मध्ये संजय रॉय पावणे पाचच्या सुमारास तो सेमिनार हॉलमधून बाहेर पडत असल्याचं दिसलं होतं. सुरूवातीला तो अनेकदा त्याचे जबाब बदलत होता. पोलिसांनी धाक दाखवल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. पण त्याला त्याचा पश्चाताप नव्हता. वर “मला फाशीद्या असं ही तो म्हणाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात रेसिडंट डॉक्टरांनी संप केला आहे. ती सुद्धा रेसिडंट डॉक्टर म्हणूनच काम करत होती. (Kolkata Rape Case)

=====

हे देखील वाचा : इराकच्या हुकूमशाही सरकारचे विधेयक

======

जेव्हा एमबीबीएसच शिक्षण पूर्ण होतं तेव्हा एमडी किंवा एमएस करण्यासाठी ३ वर्षांचा कोर्स करवा लागतो तो पूर्ण करत असताना त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागत आणि अभ्यास करत करत काम करावं लागतं. या एका घटनेमुळे नाइट शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. या प्रकरणांनंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मृत व्यक्तीही माझ्या मुलीसारखी होती. मी पण एक पालक आहे. असं ते म्हणाले. या घटनेमुळे लोकानी रस्त्यावर येऊन पीडितेच्या न्यायसाठी मागणी केली. स्वत:मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणात लक्ष्य दिलं. पोलिसानी ६ तासात आरोपी ला अटक केली. लहानपणी तिने स्वप्नं पहिलं असेल डॉक्टर बनण्याच , त्यासाठी तिने अपार मेहनत घेतली असले. बारावीनंतर नीट सर्वोत्कृष्ट मार्क्सने उत्तीर्ण होण्यापासून एमबीबीएससाठी पाच वर्ष अभ्यास केल्यानंतर पुन्हा तीन वर्षांचा कोर्स एमएस किंवा एमडी बनण्यासाठी. एवढ्या वर्षांच्या मेहनतीवर चार तासात पाणी फेरलं गेलं. एका माणसाच्या हवसमुळे, यापेक्षा मोठ दुर्दैव काय. (Kolkata Rape Case)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.