Home » Famous Bridge : भारतातील ‘हा’ खांबविरहित ब्रिज, रात्री १२ वाजता खास कारणामुळे होतो बंद

Famous Bridge : भारतातील ‘हा’ खांबविरहित ब्रिज, रात्री १२ वाजता खास कारणामुळे होतो बंद

by Jyotsna Kulkarni
0 comment
Famous Bridge
Share

‘पूल’ हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. दोन ठिकाणांना जोडणारा पूल आपण नेहमीच सर्वत्र बघत असतो. आपल्या आजूबाजूला लहान मोठे अनेक पूल असतात ज्याचा वापर करून आपण आपल्या प्रवास करतो. आपल्या देशात देखील अनेक लहान – मोठे, जुने – नवीन अगणित ब्रिज आहेत. प्रत्येक पुलाचा, ब्रिजचा एक इतिहास असतो, एक खास वैशिष्ट्य असतं. भारतात एक पूल आहे, जो सगळ्यांच माहित असेल. भलेही तो पूल पाहिला नसेल मात्र त्याचे नाव आणि तो कुठे याबद्दल माहिती असेलच. (Top News)

भारतातील अतिशय प्रसिद्ध, मोठा ऐतिहासिक वारसा असलेला एक ब्रिज आहे ज्याचे नाव आहे, ‘हावडा ब्रिज’. कोलकात्यामधील जगप्रसिद्ध अशा या ब्रिजबद्दल सर्वच लोकांना कमी जास्त प्रमाणात माहित आहे. कोलकाता शहराचे सौंदर्य वाढवण्यात या ब्रिजचा मोलाचा वाटा आहेत. किंबहुना या शहराचे मुख्य आकर्षण म्हणून देखील या ‘हावडा ब्रिजची’ ओळख आहे. ८० पेक्षा जास्त वर्ष जुना असलेला हा ब्रिज अनेक ऐतिहासिक चांगल्या, वाईट गोष्टींचा साक्षीदार आहे. (Famous Bridge)

पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोलकात्याला हावडा शहराशी जोडणारा पूल आहे. सस्पेन्शन प्रकारातील हा पूल हुगळी नदीवर बांधला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात असलेल्या ब्रिटिश सरकारने कोलकाता आणि हावडा यांच्यामध्ये वाहणाऱ्या हुगळी नदीवर हा तरंगता पूल बांधण्याची योजना आखली. (Latest News)

Famous Bridge

==========

हे देखील वाचा : Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

==========

तसे पाहिले तर त्या काळी हुगळी नदीतून रोज अनेक जहाजं ये-जा करत. त्यामुळे या जहाजांना ब्रिजच्या खांबांमुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो असा विचार करत या ब्रिजला खांब विरहित तयार करण्याचे नियोजन केले गेले. यासाठी १८७१ मध्ये हावडा ब्रिज ॲक्ट संमत करण्यात आला. या पूलाचे बांधकाम १९३६ मध्ये सुरू झाले. ते काम १९४२ला पूर्ण झाले. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. (Social News)

ब्रिटिशांनी बांधलेला हा पूल म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ब्रिटिशांनी हा पूल केवळ २८० फूट उंचीच्या दोन खांबांवर उभा आहे. या दोन खांबांमधील अंतर दीड हजार फूट आहे. या पुलासाठी २६,५०० टन स्टील वापरले गेले. यातील २३,५०० टन टाटा स्टीलने पुरविले होते. हा पूल तयार झाल्यानंतर तो त्या काळी जगातील ३ नंबरचा लांब पूल होता. हा पूल हुगळी नदीच्या दोन तीरावर २८० फुट उंच पायांवर हा पूल तोलला गेला आहे. आज रोज किमान लाखाहून अधिक वाहने आणि हजारो पादचारी या पुलावरून ये-जा करतात. मुख्य म्हणजे या पुलाला आधार देण्यासाठी नदीत कोठेही खांब नाही. (Marathi Top News)

रात्री १२ वाजता पूल होतो बंद
या पुलाबाबत खूपच आधीपासून किंबहुना ब्रिटिशांच्या काळापासून एक समज किंवा गैरसमज आहे. कोलकाताचा हावडा ब्रिज एक कॅंटिलीवर ब्रिज आहे. या हावडा पूलाला दररोज रात्री १२ वाजता काही वेळेसाठी बंद करतात. तिथे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, रात्री १२ वाजता पूल तूटण्याचा धोका वाढतो. कारण यावेळी पूल कोसळण्याचा धोका जास्त असल्याचे स्थानिकांचे मत आहे. रात्री १२ वाजता पुलाखालील ट्रेन, कार आणि बोट काही काळ थांवण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात येतं. (Marathi Trending News)

Famous Bridge

वजन जास्त असल्याने अनेकदा पूल कोसळण्याचा धोका असतो. हा पूल बांधल्यानंतर हावडा पुलाच्या इंजिनियर्सने सांगितलं होतं की, पुलाचे खांब कधी पडले तर ते १२ वाजताच पडतील. म्हणूनच रात्री १२ च्या दरम्यान या पुलावरची वाहतूक पूर्ण बंद केली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा हा पूल पूर्ववत सुरु होतो. बॉलिवूडच्या देखील अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला या पुलाचे दर्शन झाले आहे. १९६५ साली त्याचे नामकरण रवींद्र सेतू असे केले गेले आहे. मात्र हावडा ब्रिज हेच त्याचे नाव आजही लोकांच्या ओठावर आहे. (Top Stories)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

दुसरे महायुद्ध सुरु होते आणि जपानने हा पूल नष्ट करण्यासाठी त्यावर तुफान बॉम्बवर्षाव केला होता. या ब्रिजने अनेक ऐतिहासिक गोष्टी पहिल्या आहेत. स्वतंत्रता आंदोलन, दुसरे महायुद्ध, देश स्वतंत्र झाला, बंगालचा भयानक दुष्काळ देखील या ब्रिजने पाहिला आहे. असा हा ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ब्रिज आजही कोलकात्याच्या शान आहे. आजही पर्यटक या ब्रिजजवळ जातात आणि फोटो काढतात. (Marathi Top News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.