भारत आणि भारताची वैशिष्ट्ये कायम सर्वच लोकांना सुखद धक्का देत असतात. भारतात लहान मोठी अनेक गावं आणि शहरं आहेत. यांचा मिळून विशाल भारत तयार होतो. भारतातील प्रत्येक गावाची, शहराची एक वेगळी ओळख आहे. आजच्या आधुनिक काळात जिथे लोकांना शहरं अधिक विकसित आणि मॉडर्न जाणवत असताना भारतातील खेडयांनी मात्र अशा सर्व लोकांना चुकीचे सिद्ध केले आहे. भारतातील गावांनी लोकांच्या विचारांना तडा देत शहरांपेक्षा गावं अधिक विकसित असल्याचे दाखवून दिले आहे. भारतात अशी अनेक गावं आहेत ज्यांनी विकासासाठी सरकारवर किंवा कोणावरही अवलंबून न राहता आपला विकास आपणच साधला आणि सगळ्यांसमोर आदर्श निर्माण केला. (Maharashtra News)
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत, जे गावं सरकारला वीज पुरवते. या गावात कोणीही वीज बिल भरत नाही. गावाने मागच्या काही वर्षांमध्ये एवढा विकास केला आहे, जो पाहून मोठमोठ्या शहरांना देखील कमीपणा जाणवेल. आम्ही बोलत आहोत, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी या गावाबद्दल. (Marathi News)
आपल्याला भारतातील ‘पिंक सिटी’बद्दल तर ठाऊक आहेच. मात्र भारतात ‘पिंक व्हिलेज’ देखील आहे, ज्याची ओळख खूपच वेगळी आणि अभिमान वाटावा अशी आहे. भारतातील ‘पिंक व्हिलेज’ म्हणून नावारूपाला आलेले शेळकेवाडी हे गाव १०० टक्के सौरऊर्जा आणि बायोगॅसवर चालणारे गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव अवघ्या १०० घरांचे असून लोकसंख्या जेमतेम हजाराच्या आसपास आहे. कमी महसूल आणि राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे या गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, अखेर आपला मार्ग आपल्यालाच निवडावा लागतो आणि त्यावर आपल्यालाच चालावे लागते. असा विचार करून २००४ मध्ये गावकऱ्यांनी या गावाचे संपूर्ण रूपच बदलून टाकायचे ठरवले. हा बदल आज शेळकेवाडी गावाची ओळख बनला आहे. हे गाव स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि स्वयंपूर्णतेचं जिल्ह्यातील एकमेव आदर्श गाव बनले आहे. (Todays Marathi Headline)
२००४ पासून गावाने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेतला. राज्यस्तरीय पातळीवर होणाऱ्या जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये शेळकेवाडी गाव पहिल्या क्रमांकावर आले. या स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून गावात हागणदारीमुक्त मोहीम राबविण्यात आल्या. तर, बायोगॅस प्रकल्प राबवणारे आणि १००% सौर उर्जेवर चालणारे शेळकेवाडी जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून नावारूपाला आले आहे. गावची एकजूट दर्शवणारा गुलाबी रंग या गावातील सर्व घरांना देण्यात आला आहे. सर्वच घर गुलाबी रंगामध्ये असल्याने या गावाला ‘पिंक व्हिलेज’ म्हणूनही ओळखण्यात येते. (Top Trending News)
शेळकेवाडीने सौरऊर्जेच्या माध्यमातून एक मोठी आणि अभूतपूर्व क्रांती घडवली. पंतप्रधान सूर्य घर योजनेंतर्गत गावातील प्रत्येक घरात सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही सोलर सिस्टीम बसवण्यासाठी लागणाऱ्या ६७ हजार रुपयांच्या खर्चापैकी ग्रामस्थांकडून फक्त ५ हजार रुपये घेण्यात आले. तर उर्वरित रक्कम गावाला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून भागवली गेली. याशिवाय, या योजनेतून प्रत्येक घराला ३० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. (Latest Marathi NEws)
शेळकेवाडी येथील गावकऱ्यांचे वीज बिल आता सोलर सिस्टीम बसवल्यानंतर शून्य रुपये येत आहे. इतकेच नाही, तर प्रत्येक घरातून २ ते ३ युनिट वीज महावितरणला विकली देखील जाते. गावातील नदीवर सोलर पॅनल्स बसवूनही वीज निर्मिती केली जाते. यामुळे शेळकेवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले १०० टक्के सौरऊर्जेवर चालणारे गाव बनले आहे. गावकऱ्यांचे आर्थिक बजेट आता सुधारले आहे आणि विजेच्या बिलाची चिंता पूर्णपणे मिटली आहे. (Top Stories)
==============
हे देखील वाचा :
Maya Dolas लोखंडवाला शूटआउट आणि खरं सत्य!
The Maya Mystery : २०१२ ची भविष्यवाणी करणारी रहस्यमयी माया जमात
===============
या गावातील प्रत्येक घरावर सुविचार बघायला मिळतात. घरातील कर्त्या पुरुषासोबत साथ देणाऱ्या महिला भगिनींचे नाव हे प्रत्येक घरावर दिसते. गावातील स्वच्छता तर चकित करणारी आहे. बायोगॅसचा वापर करून गावातील सगळ्या शौचालयांना जोडले आहे. ओला कचरा गॅस निर्मितीसाठी वापरण्यात येतो, तर सुका कचरा ‘अवनी’ संस्थेच्या सहकार्याने व्यवस्थापित केला जातो. सांडपाण्याचं पुनर्वापर करून शेतीस मदत केली जाते. शोषखड्ड्यांच्या आजूबाजूला केळीची लागवडही करण्यात आली आहे. बंदिस्त गटारी, लोकसहभागातून उभारलेले बंधारे, आणि परसबागा अशा उपक्रमांमुळे शेळकेवाडी स्वच्छ आणि आदर्श गाव बनले आहे. (Social Updtes)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics