Home » Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?

Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?

by Team Gajawaja
0 comment
Share

आपल्या कुटुंबातील एखादा माणूस दगावला, तर आपण लहान पोरांना समजवण्यासाठी तो माणूस देवाघरी गेला असं समजावतो. पण त्यांच काय, जे मृत घोषित होऊन पुन्हा जीवंत होतात ? ते काय मग देवाच्या घराच्या रस्त्यातून मागे फिरतात का? कारण मृत होऊन जीवंत होण्याच्या घटना खूप घडल्या आहेत. नुकतीच अशी घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील एका आजोबांचा मृतदेह रुग्णालयातून घरी नेला जात असताना ॲम्ब्युलेन्स खड्ड्यात आदळली आणि झटका लागून मेलेले आजोबा जीवंत झाले. पण या घटने मागचं सत्य काय हा चमत्कार आहे का? अशाप्रकारच्या किती घटना घडल्या आहेत? जाणून घेऊ.

सुरुवातीला महाराष्ट्रातील घडलेली घटना काय होती ती पाहूया… १६ डिसेंबरला कोल्हापूरच्या पांडुरंग उलपे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक तास डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. अनेक प्रयत्नांंन नंतर अखेर डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केलं. ही बातमी त्यांच्या घरी पोहचली पाहुणे, नातेवाईक, शेजार पाजरची लोकं त्यांच्या घरी त्यांच्या अंत्यविधीसाठी जमली. पण आजोबांना ज्या ॲम्ब्युलेन्स मधून घरी आणलं जात होतं. ॲम्ब्युलेन्स खड्ड्यात आदळली आणि आजोबांच्या शरीराची हालचाल झाल्याचं ॲम्ब्युलेन्स मधील लोकांच्या लक्षात आलं. गाडी पुन्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आली. तेथे आजोबांवर पुन्हा उपचार झाले. आजोबांच्या शरीराने हळूहळू उपचाराला प्रतिसाद दिला. आजोबा शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. लोकांच्या मते हा आजोबांचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल. देव तारी त्याला कोण मारी असं सुद्धा म्हटलं जात आहे.

अशाच अनेक घटना आधी सुद्धा घडल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये बिहारच्या बेगूसराय येथे ६० वर्षीय रामवती देवी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. पण मृत्यूच्या १५ तासांनंतर त्यांना चितेवर ठेवताच त्यांचं शरीर हलू लागलं. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले.

उत्तरप्रदेशच्या वृंदावनमध्ये ऑक्टोबर २०२३मध्ये ३८ वर्षीय कविता यांना सुद्धा स्वास्थ्य बिघडल्यामुळे एक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तिथून त्यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांच्यावर सुद्धा अंत्यविधीसुरू असताना त्या जीवंत झाल्या आणि रुग्णालयात नेल्यानंतर पुन्हा त्यांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये मुरादाबादमध्ये ४० वर्षांच्या श्रीकेश कुमार हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मर्चुरीच्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला. ७ तासांनंतर जेव्हा मृतदेह बाहेर काढला गेला, तेव्हा त्यात हलचाल होऊ लागली. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची स्थिती सुधारली.

आता आशा प्रकारच्या इतक्या घटना घडल्या म्हणजे हा काही चमत्कार तर नाही आहे. मेडिकल सायन्स नुसार माणसाच्या मृत्यूचे दोन प्रकार असतात. पहिलं म्हणजे क्लीनिकल मृत्यू. यामध्ये व्यक्तीचं हृदयचं धडधडणं थांबतं. त्याच्या फुफ्फुस सुद्धा काम करणं बंद करतात आणि शरीराला ऑक्सिजन मिळत नाही. यावेळेस त्याची नाडी, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची प्रक्रिया पाहून तो जिवंत आहे की नाही हे कळतं. या प्रकारामध्ये मृत्यूनंतर सुद्धा व्यक्तीचा मेंदू १० मिनिटं काम करत असतो. काही केसेसमध्ये असा मृत्यू येणाऱ्या व्यक्तींना CPR देऊन वाचवलं जाऊ शकतं. पण याचे चान्सेस खूप कमी असतात.

आणि दूसरा प्रकार म्हणजे बायोलॉजिकल मृत्यू. या प्रकारात व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे काम करणं बंद करतो. मेंदूचा सिग्नल शरीराच्या इतर भागात पोहचत नाही आणि माणसाचा मृत्यू होतं. या प्रकारात CPRचा काहीच उपयोग होतं नाही.

म्हणून माणसाला मृत घोषित केल्यानंतर सुद्धा क्लिनिकल मृत्यूमध्ये काही व्यक्ती पुन्हा जीवंत होतात. यामागे ‘लाझारस फेनोमेनन’ आहे. J.G. ब्रे यांनी 1993 मध्ये हा शब्द अशा प्रकारच्या केसेस साठी वापरला होता. बायबलमधील लाझारसच्या कथेवर आधारित हा शब्द आहे. ज्याला येशूने त्याच्या मृत्यूच्या चार दिवसांनंतर पुनर्जीवित केले होतं. मेल्यानंतर पुन्हा जीवंत होण्यालाच ‘लाजारस सिंड्रोम’ म्हणतात.

==============

हे देखील वाचा : liquor : विदेशी दारूच्या बाटल्यांसाठी त्यांनी विकली भारताची गोपनीय माहिती!

==============

लाजारस सिंड्रोम नंतर जिवंत होणारे व्यक्ती जास्त काळ जिवंत राहात नाहीत. सीपीआरच्या नंतर जिवंत होणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य देखील कमी असते. यामध्ये मेंदूला जास्त नुकसान होतं. १९८२ ते २०१८ पर्यंत लाजारस सिंड्रोमचे ६५ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यातील १८ लोकच पूर्णपणे बरे झाले आहेत, तर ४७ लोक लगेच किंवा लवकर मरण पावले.

सीपीआर दिल्यानंतर १० ते ४५ मिनिटांनंतर माणसाचा श्वास परत येण्याची शक्यता असते. सामान्यतः या दरम्यान श्वास परत येतो, पण काही केसेस मध्ये ते काही तासांनंतर सुद्धा रुग्णांचा श्वास परत येऊ शकतो. हेच त्या कोल्हापूरच्या आजोबांसोबत घडलं असावं. बाकी मृत्यूच रहस्य हे माणसांसाठी आजही गुढच आहे. पण तेच अंतिम सत्य आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.