Home » Kojagiri Purnima : कोजागिरी स्पेशल मसाला दूध आणि खीर रेसिपी

Kojagiri Purnima : कोजागिरी स्पेशल मसाला दूध आणि खीर रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kojagiri Purnima
Share

कोजागिरी पौर्णिमेला गोड पदार्थांमध्ये खीर मसाला दूध किंवा खीर करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी हे पदार्थ अमृत प्रसाद बनते. कोजागिरी पूर्णिमा म्हटले की लगेच डोळ्यासमोर येते ते मसाला दूध आणि खीर. कोजागिरी पूर्णिमेला प्रत्येक घरामध्ये मसाला दूध आणि खिरीची मेजवानी असते. कोजागिरी पूर्णिमा ही मसाला दूध आणि खिरीशिवाय अपूर्ण असते. चंद्राच्या शीतल प्रकाशात पूजेनंतर याच प्रसादाचा आस्वाद सर्वच लोकं मिळून घेतात. आज आम्ही तुम्हाला कोजागिरीच्या मुहूर्तावर मसाला दूध आणि खिरीच्या काही भन्नाट आणि सोप्या रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीला फॉलो करून तुम्ही एकदम परफेक्ट मसाला दूध किंवा खीर बनवून घरच्यांना खुश करू शकता. (Todays Marathi Headline)

शेवया खीर
साहित्य : शेवया, साखर, दूध, हिरवी वेलची, तूप, आवडी प्रमाणे ड्रायफ्रुटस, केशर

कृती:
सर्व प्रथम कढईत तूप घालून आवडीचे ड्रायफ्रूट्स तळून घ्या. यानंतर शेवया त्याच तुपात तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता दुसऱ्या पातेल्यात दूध टाकून उकळून घ्या. वेलची बारीक करून त्यात घाला. दूध मंद आचेवर उकळवा. कंडेन्स्ड मिल्क असल्यास ते घाला नाहीतर हे दूध उकळवून घट्ट करा. त्यात केशराचे तुकडे घाला. तसेच शेवया आणि ड्रायफ्रुट्स एकत्र घाला. शेवया मिक्स करून त्यात साखर घाला. आता खीर थोडा वेळ शिजू द्या. (Top Marathi News)

Kojagiri Purnima

तांदळाची खीर
साहित्य : १ लिटर फुल क्रीम दूध, १५० ग्रॅम बासमती तांदळाचे तुकडे, १ चमचा तूप, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, १ टीस्पून गुलाब पाणी, २५० ग्रॅम साखर, १/२ टीस्पून वेलची पावडर, १५-२० गुलाबाच्या पाकळ्या, ५-६ केशर

कृती :
कोणताही तुम्हाला आवडणारा सुगंधित तांदूळ घेऊन तो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो २०-२५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. आता दूध मध्यम मंद आचेवर उकळायला ठेवा. एका कढईत तूप गरम करून त्यात तांदूळ घालून परतून घ्या. त्यानंतर हे तांदूळ उकळत्या दुधात टाका आणि २० ते २५ मिनिटे दोन्ही शिजवून घ्या. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाका. खीर चांगली शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यात साखर, गुलाबपाणी, वेलची पावडर आणि केशर घालून मिक्स करा. खीर व्यवस्थित पातळ कापडाने झाकून चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्यानंतर काही वेळाने किंवा सकाळी हा खिरीचा प्रसाद खा. (Top Trending Headline)

=========

Kojagiri Purnima : यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? काय आहे या दिवसाचे महत्त्व?

Kojagiri Purnima : जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करण्याचा विधी

=========

मसाला दूध
साहित्य : दूध – १ लिटर, साखर – चवीनुसार (किंवा अर्धा कप), केसर, वेलची पूड – १ चमचा, जायफळ पूड, ड्रायफ्रुटस

कृती :
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन मध्यम आचेवर उकळायला ठेवा. दूध सतत ढवळत रहा, जेणेकरून ते भांड्याच्या तळाशी लागणार नाही. दूध साधारण एक-तृतीयांश कमी झाल्यावर म्हणजे आटल्यानंतर त्यात साखर आणि केसर घाला. दुधातील साखर पूर्ण विरघळल्यानंतर वेलची पूड, जायफळ पूड, आवडीचे ड्रायफ्रुटस घालून घ्या. दूध चांगले घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. भांड्याला चिकटलेली साय दुधात मिक्स करत राहा. हे तयार झालेले मसाला दूध कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशात काही वेळ ठेवावे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.