येत्या १४ जानेवारीला संपूर्ण देशामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. संक्रांतीचा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये या दिवशी तिळगुळाचे लाडू वाटले जातात आणि हे लाडू देताना ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असे म्हटले जाते. संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यत असतो. (Bornhan)
संक्रांती ते रथसप्तमी या १० ते १५ दिवसांच्या काळात सुवासिनी स्त्रिया हळदीकुंकू करतात अनेक ठिकाणी लहान मुलांचे याकाळात बोरन्हान देखील केले जाते. संक्रांतीमध्ये बोरन्हाण करणे खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रथा आहे. हे बोरन्हाण ५ वर्षांपर्यंत असलेल्या लहान मुलांचे केले जाते. बोरन्हाण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करता येते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालण्यात येतं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे. (Sankranti)
बोरन्हाण का घातले जाते?
बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते. शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे. मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते. ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार, संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो. त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते. त्यामुळे अशा ऋतुची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरन्हाण घातले जाते. (Todays Marathi Headline)

यावेळी कुरमुरे, उसाचे तोकडे, भुईमूगाच्या शेंगा, बोर, बेर, करवंद अशा फळांचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. यावेळी इतर लहान मुलांना बोलावले जाते. लहान मुलांना ही फळं नुसती दिली तर ते ही फळं खाणार नाहीत. पण बोरन्हाणाच्या माध्यमातून ते या विविध फळांचे सेवन करतात. त्यांना विविध फळं खाण्याची सवय देखील लागते. मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते असे सांगण्यात येते. (Top Marathi News)
साधारणतः १४ जानेवारी अर्थात संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यत कोणत्याही दिवशी हे बोरन्हाण केलं जाते. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे कधीही करू शकता. मुख्य म्हणजे बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. वडीलधाऱ्या लोकांचे आशिर्वाद लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्याच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच हेतू असतो. सामान्यपणे बाळाचे पहिल्या वर्षीच बोरन्हाण केले जाते. मात्र प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. काही ठिकाणी पाहिल्यावर्षी न करता दुसऱ्या वर्षी बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे १-३ या वर्षात बाळांसाठी बोरन्हाण करण्यात येते. मधल्या काही काळापासून ५ वर्षापर्यंतच्या बाळाचे बोरन्हाण करण्याची प्रथा सुरु झाली आहे. (Latest Marathi Headline)
लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो. तसाच हादेखील एक सोहळा असतो. घरगुती पद्धतीने हा सोहळा केला जातो. मकरसंक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाळाच्या बोरन्हाणाच्या दिवशी बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस आणि हलव्याचे दागिने घालावे. बाळासाठी छानसा छानसा मुकूट देखील घ्यावा. पाटावर बसवून बाळाचे औक्षण करावे. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जातात. बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरं, उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते. त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरन्हाण करण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे. (Top Trending News)
=======
Sankranti : जाणून घ्या यावेळच्या मकर संक्रांतीचे वाहन काय?
=======
बोरन्हाण आख्यायिका
बोरन्हाण का करायला हवे, याच्या संदर्भात एक आख्यायिका आहे, ती म्हणजे एक करी नांवाचा राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्या नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहानं मुलांवर बोरन्हाण केले जाते. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
