महिलांचे कायम वेगवेगळे फॅशन ट्रेंड येत असतात. महिलांची फॅशन सतत बदलणारी असते. मात्र पुरुषांच्या बाबतीत यावर मर्यादा असतात. त्यातही पुरुष शक्य तेवढ्या फॅशन फॉलो करतात. पुरुषांमध्ये मधल्या काही काळापासून एक फॅशन ट्रेंड कमालीचा वाढलेला दिसत आहे आणि तो म्हणजे, हातात चांदीचे कड घालणे. आता जरी ही गोष्ट एक फॅशन स्टेटमेंट असली तरी पुरुषांनी हातात चांदीचे कड घालणे ही खूपच जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये कडा हा ग्रहांशी संबंधित समजला जातो. पुरुषांनी उजव्या हातात ब्रेसलेट किंवा कडा घालावे. असे केल्याने कुंडलीतील अनेक दोषांपासून मुक्ती मिळते. पण, त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही ते नियमितपणे घालता. (Silver)
आता तर अनेक पुरुष स्टाईल स्टेटमेंट म्हणून का असेना पण हातात चांदीचे, तांब्याचे, पंचधातूची आदी विविध धातूंचे कडे घालताना दिसतात. मात्र काही लोकं अशी सुद्धा आहेत जे ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार ते घालतात. ज्योतिष शास्रात चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असल्याचे मानले जाते. चंद्र हा ग्रह मन, भावना, मानसिक शांती यांचं प्रतिक आहे. ज्यांचा चंद्र ग्रह कमजोर असतो, अशा लोकांना चांदीची एखादी वस्तू हातात घालण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार, पुरुष मंडळींनी डाव्या हातात चांदीचे कड घालावे. यामुळे कुंडलीतील काही दोष दूर होतात. या व्यतिरिक्त जर सातत्याने अपयश मिळत असेल तर तुम्ही चांदीचे कड घातले पाहिजे. यामुळे ही तुम्हाला फायदा होईल. अशातच जाणून घेऊयात चांदीचे कड घातल्याने नक्की काय फायदे होतात. (Marathi News)
– जर पुरुषांनी हातात चांदीचे कडे घातले तर तुमचे दोन ग्रह मजबूत होतात. जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर असं मानलं जातं की तुमचा चंद्र ग्रह कमजोर आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या हातात चांदीचं कडं घातलं तर तुमचा चंद्र ग्रह मजबूत होतो, आणि तुमच्या मनातील निगेटिव्हिटी दूर होऊन, सकारात्मक विचार येतात.(Todays Marathi Headline)

– चांदीचे कड घातल्याने तुमच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र या दोन्ही ग्रहांची स्थिती मजबूत होऊ शकते. यामुळे उत्तम आरोग्यासह सुख-समृ्द्धी ही प्राप्त होतेच. पण घरात धन-धान्याची भरभराट ही होत राहते. ज्योतिष शास्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र कमजोर आहेत त्यांनी चांदीचे कड जरुर घातले पाहिजे. (Top Trending Headline)
– ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे कडे धारण करणे शुभ मानले जाते. चांदीचे ब्रेसलेट धारण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे आर्थिक समृद्धी येते. चांदीचे कडे घालल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. (Top Marathi News)
– हातात चांदीचे ब्रेसलेट घालणे मानसिक शांतता आणि सकारात्मकता वाढविण्यासाठी मदत करू शकते. चांदीचे ब्रेसलेट घालल्याने मन शांत राहते आणि तणाव, चिंता कमी होते. चांदीला अनेक संस्कृतींमध्ये शांतता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. (Latest Marathi Headline)
– चांदीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, जी नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे व्यक्ती शांत आणि आनंदी राहते. चांदी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मानले जाते. चांदी नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करते. (Top Trending News)
==========
Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन
==========
– हातात चांदीचे कडे घातल्यामुळे शुक्र ग्रह देखील मजबूत होतो. जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो, तेव्हा तुमच्या यशाचा मार्ग खुला होतो, तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतात, कामात, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यावसायात यश मिळते, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. (top Stories)
– वास्तुशास्रानुसार, चांदीला सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवणारा धातु मानले जाते. त्यानुसार, चांदीचे कड घातल्याने तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रकारची नकारात्मकता दूर होते. तसेच मनात येणारे नकारात्मक विचार ही दूर होतात. वास्तु शास्रानुसार, शुक्रवारच्या दिवशी चांदीचे कड घालणे शुभ मानले जाते. परंतु ते घालण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला जरुर घ्या. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
