Home » World Yog Day : प्राणायाम करण्याचे फायदे

World Yog Day : प्राणायाम करण्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
World Yog Day
Share

आपल्या शरीराला आणि मनाला उत्तम ठेवायचे असेल तर योग हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे केवळ शरीर निरोगीच राहते असे नाही तर मनही प्रफुल्लित राहते. भारतानेच जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. दिवसागणिक योगाचे महत्व जगाला पटत असून, योगाबद्दल लोकांना विश्वासार्हता देखील जाणवत आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योगचे महत्व संपूर्ण जगाला समजावे आणि प्रत्येकाने दररोज योगाभ्यास करावा यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. (Yoga Day)

उद्या संपूर्ण जग जल्लोषात आणि योग करत हा दिवस साजरा करणार आहे. योगा म्हटले की आपल्या सर्वांच्या डोक्यात सर्वात आधी येतो तो ‘प्राणायम’. योग करताना त्याची सुरुवात काही लोकं प्राणायाम करूनच करतात. योगामध्ये प्राणायामला कमालीचे महत्व आहे. प्राणायाम म्हणजे काय तर, श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्याची एक प्रक्रिया आहे, जी योगामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ‘प्राण’ म्हणजे जीवनशक्ती किंवा श्वास आणि ‘आयाम’ म्हणजे नियंत्रण. अर्थात प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळवून जीवनशक्ती वाढवण्याचा एक मार्ग. (Marathi News)

असे सांगितले जाते की, निरोगी मनुष्य प्रत्येक मिनिटाला साधारण १५ वेळा श्वास घेतो, म्हणजे दिवसाला २१ हजार ६०० वेळा तो श्वास घेत असतो. महर्षी पतंजली म्हणतात, ‘‘या नैसर्गिक गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम.” हा श्वास मिनिटाला पंधरापेक्षा जास्त म्हणजे गती वाढवणे किंवा कमी करणे. श्वासोच्छवासामध्ये स्वाभाविक गतीत प्रयत्नपूर्वक, प्रमाणबद्ध, विशिष्ट फळाच्या उद्देशाने बदल करणे म्हणजे प्राणायाम होय. दररोज प्राणायाम केल्याचे अगणित फायदे आपल्या शरीरावर होत असतात. या लेखातून आपण याच प्राणायामाचे फायदे जाणून घेऊया. (Marathi Trending News)

World Yog Day

प्राणायाम करण्याचे फायदे

– प्राणायाम ध्यान्यात मदत करतो. ज्यामुळे मज्जासंस्था शांत होते. परिणामी, तणावाची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे दररोज जर तुम्ही प्राणायाम केलात तर हळूहळू स्ट्रेस कमी होऊ लागतो आणि मेंदूला एनर्जी मिळते. (Top Trending News)

– बदलत्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात बहुतेक लोक निद्रानाशेच्या समस्येने हैराण आहेत. तुम्ही सुद्धा निद्रानाशेच्या समस्येने हैराण असाल तर दररोज प्राणायाम करण्याची सवय लावा. रोज प्राणायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप लागते आणि हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे चांगल्या आणि शांत झोपेसाठी प्राणायाम करा.

– नियमित प्राणायाम केल्याने श्वसनसंस्था निरोगी, संतुलित आणि नियंत्रित राहते, त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होत नाहीत आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला होतो. (Todays Top Headline)

– प्राणायाममध्ये श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया केली जाते. त्यामुळे फुफ्फुस मजबूत होतात आणि त्यांची कार्यक्षमता सुधारते. फुफ्फुसाशी संबंधित समस्या असतील तर दररोज प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल.

– हाय ब्लड प्रेशरच्या त्रासालामुळे ह्रदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो. यामुळे आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते. (Marathi Latest News)

– प्राणायाम करताना सर्व लक्ष श्वासोच्छवासावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे, यावेळी तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाबद्दल अधिक जागरूक होतात, ज्याने माइंडफूलनेस वाढतो. एकंदरच, प्राणायाम केल्याने मानसिक आरोग्यसाठी फायद्याचा ठरतो.

– नाडीशोधन प्राणायाम विशेषतः वात नियंत्रित आणि संतुलित करण्यासाठी फायदेशीर आहे. तर शीतली प्राणायाम पित्तला नियंत्रित आणि शांत करण्यात मदत करतो. भस्त्रिका प्राणायाम कफ नियंत्रित करण्यास आणि कफाच्या अतिरेकामुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत करतो.

– अनुलोम विलोम, कपालभाती आणि भ्रमरी प्राणायामचा सराव पचन समस्या, विशेषतः गॅस्ट्रिक संबंधित समस्या, निद्रानाशची समस्या दूर करण्यासाठी, संयम, ध्यान आणि शारीरिक नियंत्रण राखण्यासाठी आणि तणाव आणि चिंता दूर करण्यास मदत करते. (Marathi Top News)

World Yog Day

– प्राणायामाच्या दररोजच्या सरावामुळे फुफ्फुसांशी संबंधित दमा, श्वसनसंस्थेशी संबंधित ऍलर्जी, ऍलर्जीक ब्राँकायटिस, न्यूमोनिया आणि टीबी सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

– प्राणायामाचा सराव शरीर आणि मन यांच्यातील संबंध मजबूत करतो, शरीरात आणि विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो, शरीराच्या सर्व अवयवांची सक्रियता आणि कार्यप्रणाली वाढवते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवते. (Top Stories)

=================

हे देखील वाचा : Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !

Anna Mani : ओझोनचं रहस्य उलगडणारी वेदर वुमन ऑफ इंडिया!

=================

प्राणायाम कसा करावा?
कुठेही बसून प्राणायाम करता येतो. फक्त जिथे प्राणायाम करायचा ती जागा मोकळी आणि हवेशीर असावी. सकाळचा सूर्योदयाचा वेळ प्राणायाम करण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो. शिवाय संध्याकाळी मावळत्या सूर्यसोबतही प्राणायाम केलेला उत्तम असतो. प्राणायाम करताना कायम पाठीचा कणा सरळ ठेवावा. प्राणायम करण्यासाठी पद्मासनाच्या मुद्रात बसून डोळे बंद करावे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. नाकातून हळू हळूहळू लांब आणि खोल श्वास घ्या. यानंतर श्वास हळूहळू सोडा. पुढे तोंडातून हळूहळू श्वास घेणे, लांब आणि खोल श्वास घ्या आणि बाहेर ‘ह्म्म्म’ असा आवाज सोडणे. एक महत्वाची गोष्ट, प्राणायाम ठरताना तुमचे संपूर्ण लक्ष केवळ श्वासावर केंद्रित असणे गरजेचे आहे. (Social Media)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.