आपल्या सर्वांच्याच घराचा किंबहुना स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग म्हणजे फ्रिज. आजकाल फ्रिज सर्वच घरांमध्ये दिसते. फ्रिजशिवाय कोणाचेही पण हालत नाही. अपवाद वगळता सर्वच घरांमध्ये फ्रिज असतेच असते. फ्रीजचा वापर देखील मधल्या काही काळापासून कमालीचा वाढल्याचे चित्र आहे. सध्या मार्केटमध्ये तर विविध प्रकारचे, लहान मोठे, अनेक डोर असलेले, विविध फॅन्सी सुविधा देणारे फ्रिज आपल्याला पाहायला मिळतात. आता फ्रिज हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्यामुळे तुम्ही कितीही चांगले, महागडे फ्रिज घेतले तरी ते कधी ना कधी खराब होतेच. अनेकदा फ्रिजमधून एक वेगळाच आवाज देखील येतो. (Fridge)
फ्रिजमधून आवाज येण्याची बाब तर कमालीची सामान्य झाली आहे. अनेक घरांमध्ये फ्रिजमधून विविध प्रकारचे आवाज आपोआप येतात आणि आपोआपच बंद होतात. घरात शांतता झाल्यानंतर हा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. मग आपल्याला समजत नाही नक्की फ्रिज खराब झाले आहे की नाही. रिपेरिंगवाल्याला बोलवायचे की नाही. कारण आवाज येतो आणि बंद पण होतो. यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र फ्रिजमधून आवाज का येतो आणि तो आपोआपच बंद का होतो याचा कधी विचार केला आहे का? नाही…चला जाणून घेऊया याबद्दलच. (Kitchen Tips)
फ्रीजमध्ये एक कॉम्प्रेसर असते आणि ते थर्मोस्टॅटच्या सिग्नलवर चालू किंवा बंद होते. फ्रिजमधील कम्प्रेसर म्हणजे फ्रिजचे हृदय असते. पण तो सतत चालत नाही फक्त तापमान वाढलं की सुरू होतो आणि थंड झालं की बंद होतो. फ्रिज चालू असताना काही ना काही आवाज येत राहतात. जे पूर्णपणे सामान्य आहे. पण, तुमच्या फ्रीजमधून वेगळ्या प्रकारचा आवाज येत असेल आणि तुम्हाला पदार्थ थंड होण्यात समस्या येत असतील, तर मग फ्रिजमध्ये काही समस्या असण्याची शक्यता असू शकते. जर फ्रीजच्या खालून आवाज येत असेल तर: जर तुम्हाला फ्रीजच्या खालून खडखडाटाचा आवाज येत असेल, तर ड्रेन पॅनमध्ये समस्या असू शकते. अशावेळी ते बाहेर काढून पुन्हा नीट व्यवस्थित लावावे. (Todays Marathi Headline)

फ्रीजच्या मागच्या बाजूने आवाज येत असल्यास, कंडेन्सर किंवा कंप्रेसरमध्ये समस्या असू शकते. कंडेन्सर फॅनमुळे आवाज येत आहे असे वाटत असेल तर फॅनच्या ब्लेडमध्ये साचलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही इलेक्ट्रीशियनकडून देखील हे काम करून घेऊ शकता. जर फ्रीजच्या आतून आवाज येत असेल तर, फ्रिजच्या परिसंचरण फॅनमध्ये अर्थात सर्क्युलेशनमध्ये समस्या असू शकते. हे तपासण्यासाठी तुम्हाला एखाद्या इलेक्ट्रिशनची मदत घ्यावी लागेल. (Marathi News)
तुमच्या फ्रीजमध्ये पक्ष्यांचा किंवा लहान क्रिटरचा आवाज येत असेल तर याचा अर्थ बाष्पीभवन म्हणजेच एवोपोरेशन करणारा पंखा खराब झाला असू शकतो. यासाठी देखील तुम्हाला इलेक्ट्रिशनची आवश्यकता असेल. जर तुमच्या फ्रीजमधून ठोठावण्याचा आवाज येत असेल, तर ते कंडेन्सर निकामी झाल्याचे किंवा मोटर नीट काम करत नसल्याचे लक्षण असू शकते. तुमचा आइस मेकर क्लिकिंग आवाज काढत असल्यास, हे शक्य आहे की वॉटर लाइन व्हॉल्व्ह सैल आहे किंवा पाणी पुरवठ्याशी जोडलेला नाही. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियनचीही मदत घ्यावी लागेल. (Top Trending News)
========
Brandy : ब्रॅंडीच्या बाटलीवर असणारे VS, VSOP, XO हे शब्द काय दर्शवतात?
========
जर तुमच्या रेफ्रिजरेटरच्या दरवाजाचा आवाज येत असेल तर हा आवाज लोखंडी गंजण्यापासून ते रबर सैल होण्यापर्यंतच्या विविध कारणांमुळे आवाज हा येत असतो. यासाठी जेव्हा जेव्हा आवाज येत असेल तेव्हा त्या फ्रीजच्या दरवाजाला पेट्रोलियम जेली कापसावर घेऊन लावावी आणि त्या दरवाज्यावर हळुवारपणे घासावी. असे नियमित केल्याने फ्रीजच्या दरवाज्यामधून आवाज येणार नाही आणि फ्रीज सुद्धा दीर्घकाळ टिकेल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
