जांभई देणे ही नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीला जांभई येते. जांभई येणे हे झोप येण्याचे लक्षण समजले जाते. काही लोकं जांभाईला आळस आल्याचे देखील म्हणतात. बऱ्याचवेळा सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी देखील कोणी जांभई देत असेल आणि आपले त्या व्यक्तीकडे लक्ष गेले तर लगेच आपल्याला देखील जांभई येते. आपल्याला झोप आलेली नसेल तरी आणि आळस आला नसले तरी केवळ जांभई देणाऱ्या त्या व्यक्तीकडे पाहिल्याने आपल्याला देखील लगेच जांभई येते. पण असे का होते? (Marathi)
कित्येक वेळा जांभई आल्यानंतर यामागे झोप आली आहे, किंवा कंटाळा आला आहे असा तर्क लावला जातो. मात्र, असे अजिबातच नाहीये. यामागे वेगळेच कारण आहे. अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, जांभईचा संबंध थेट मेंदूशी आहे. जांभई येणे म्हणजे मेंदूचे तापमान नियंत्रित करण्यासाठी होत असलेली प्रक्रिया असते. जेव्हा वातावरणातील तापमान कमी होते, तेव्हा शरीराचे तापमान वाढते, आणि वातावरणातील तापमान वाढल्यावर शरीराचे तापमान कमी होत असते. (Todays Marathi News)

अशा वेळी मेंदू शरीरातील अधिक ऑक्सिजन वापरून आपले तापमान नियंत्रित ठेवतो. जांभईमुळे आपला मेंदू थंड होतो. खरं तर, जेव्हा आपण दिवसभर सतत काम करून थकतो किंवा जेव्हा आपली ऊर्जा पातळी कमी होऊ लागते, तेव्हा आपल्या मेंदूचे तापमान वाढते. मेंदूचे हे तापमान कमी करण्यासाठी शरीर जांभई देण्याची प्रक्रिया पार पाडते. जांभईमुळे गरम डोकं थंड होण्यास मदत होते. हिवाळ्यात ऑक्सिजनची जास्त गरज असते, त्यामुळे हिवाळ्यात जांभईही जास्त येते. (Latest Marathi Headline)
एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून आपल्याला लगेच का जांभई येते? तर याचे कारण म्हणजे मेंदूचा मिरर न्यूरॉन प्रभाव. आपल्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन नावाचे विशेष न्यूरॉन्स असतात. हे न्यूरॉन्स दुसऱ्याच्या कृती, भावना किंवा हालचाली आपोआप “कॉपी” करतात. म्हणजेच कोणी हसत असेल तर आपल्यालाही हसायला येते आणि कोणी जांभई देत असेल तर आपल्यालाही जांभई येते म्हणूनच जांभई संसर्गजन्य होते. कधी कधी अनेकजण एकाच खोलीत असतात आणि सर्वांसाठी हवेतील ऑक्सिजन वायू कमी होत जातो, तेव्हा मेंदूला अधिक ऑक्सिजनची गरज जाणवते आणि जांभई देणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही; ती एक सामाजिक वर्तणूक देखील आहे. यामुळे तुमचा मेंदू तुमच्या सभोवतालच्या लोकांशी जोडला जातो आणि आपोआप प्रतिसाद देतो. (Top Stories)
==========
Dictator Donald Trump : इंटरनॅशनल गुंडा
==========
अॅनिमल बिहेवियर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, ज्या लोकांचा मेंदू जास्त काम करतो, त्यांना दीर्घकाळ जांभई येते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, जास्त जांभई देणे किंवा वारंवार जांभई देणे हे काही औषधांच्या साईड इफेक्ट्सचाही परिणाम असू शकतो. एक व्यक्ती ५-१९ वेळा जांभई देतो. पण जास्त जांभई देणे चिंतेचेही होऊ शकते. म्हणूनच आपण अनेकदा ऐकले आहे की, कारच्या पुढील सीटवर ड्रायव्हरसोबत बसलेल्या व्यक्तीने झोपणे किंवा जांभई येणे टाळावे. कारण त्यांना पाहून ड्रायव्हरला झोपेचा आणि जांभईचाही अनुभव येईल, जे वाहन चालवताना धोकादायक ठरू शकते. खरं तर, समोरच्या व्यक्तीला जांभई देताना पाहून मिरर न्यूरॉन सिस्टीम लगेच सक्रिय होते. मिरर न्यूरॉन प्रणाली इतरांना जांभईची नक्कल करण्यास भाग पाडते. यामुळेच आपल्याला जांभईही येऊ लागते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
