काही दिवसांपूर्वीच आपण २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले आणि आता लवकरच या नवीन वर्षातला पहिला सण देखील येत आहे. जानेवारी महिना लागला की सगळ्यांना वेध लागतात ते संक्रांतीचे. इंग्रजी नवीन वर्षातला जानेवारीमधील पहिला सण तर हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्यातला संक्रांतीचा सण अतिशय महत्वाचा समजला जातो. (Makar Sankranti)
पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांत हा सण साजरा केला जातो. हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीच्या सणाचे अनेक बाजूने विशेष महत्व आहे. (Indian Festival)
मात्र जर आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल विचार केला तर, आपल्याकडे नवीन नवरीची पहिली संक्रांत साजरी केली जाते. छोट्या बाळांचे बोरन्हाण केले जाते. सोबतच संक्रातीचे हळदीकुंकू देखील केले जाते. आपल्याकडे शुभ कार्यासाठी किंवा सणवारासाठी काळा रंग वर्ज्य मानला जातो. मात्र संक्रांतीच्या दिवशी खास काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. (Makar Sankranti and Black Clothes)
संक्रांतीचा कोणताही सण असला तरी काळे कपडेच घातले जातात, मग इतर शुभ दिवशी निषिद्ध असणारा काळा रंग संक्रातीच्या दिवसांमध्ये एवढा खास आणि महत्वपूर्ण का असतो? का या दिवसांमध्ये काळ्या रंगाचेच कपडे घातले जातात? चला जाणून घेऊया प्रश्नांची उत्तरे. (Marathi News)
संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्यामागे एक पौराणिक कथा देखील सांगितले जाते. ती अशी, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केले होते. म्हणून देखील या दिवशी काळ्या रंगाच्या कपडयांना जास्त महत्व दिले जाते. शिवाय संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. काळोख्या रात्रीला या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र घालून निरोप दिला जातो. (Top Stories)
तर, यामागे एक वैज्ञानिक कारण देखील सांगितले जाते. ते म्हणजे, मकर संक्रांतीचा सण हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. किंवा हा सण भर हिवाळ्यातच येत असतो. संक्रातीचा सण येतो तेव्हा संपूर्ण भारतामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले असते. अशा वेळी आपल्या शरीराला उष्णता देऊन उबदार ठेवणायचे काम काळा रंग करतो. कारण काळ्या रंगाचे कपडे हे जास्त उष्णता शोषून घेतात. त्यामुळे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. (Latest Marathi News)
या दिवशी फक्त काळे कपडे घालूनच शरीराला उबदार ठेवले जाते असे नाही. या दिवशी खास पदार्थ देखील खाल्ले जातात. मकर संक्रांतीला जवळपास सर्वच ठिकाणी तिळाचे पदार्थ खाल्ले जातात. या दिवशी तीळ खाण्याला मोठे महत्व आहे. कारण तीळ देखील उष्ण गुणधर्माची आहे. आपल्याला शरीराला उष्णता मिळावी आणि शरीराचे थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून संक्रांतील तिळगुळ वाटले जातात आणि तिळगुळाची पोळी खाल्ली जाते. (why do people wear black colour on makar sankranti)
==================
हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार ?
==================
मकर संक्रांतीचे महत्त्व
या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्र लहान होते. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिनाला ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. एक राशीला सोडून दुसर्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. यासाठी मकरसंक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो.