आज सर्वत्र भोगीचा (Bhogi Festival) सण साजरा होत आहे. आता अनेकांसाठी हा शब्द किंवा हा सण नवीन असेल. मात्र संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. यंदा १३ जानेवारीला अर्थात आज आपण हा सण साजरा करत आहोत. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे वाक्य आपल्या कानावर कधीतरी पडलेच असेल. याचा अर्थ आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा उपभोगाचा सण आहे. (Bhogi 2025)
भोगी सणाचे देखील मोठे महत्व आहे. हा सण खासकरून भारतामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. तामिळनाडूमध्ये तर संक्रांतीच्या आधी पोंगल हा सण साजरा केला जातो. यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. चला तर जाणून घेऊया भोगी सणाचे महत्त्व आणि माहिती. (Marathi Top News)
मकर संक्रातीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बाजरीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते. शिवाय आजच्या दिवसापासून पुढील दोन ते तीन दिवस अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ केली जाते. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. (Makar Sankranti)
सोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी, खिचडी करण्याची परंपरा आहे. या दिवशी जेवणात देखील मोठ्या प्रमाणावर तीळाचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. (Bhogi Festival Information)
काही जाणकारांच्या माहितीनुसार शास्त्रात सांगितले आहे की, भोगीच्या दिवशी केस धुवावेत. यामागचे कारण म्हणजे, आजच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तींवर मात केली जाते. शिवाय शरीरात असणाऱ्या विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी देखील याचा फायदा होतो.
भोगीच्या दिवशी इंद्र देवाची पूजा केली जाते. आणि इंद्र देवाची आपल्यावर आणि शेतीवर कायम कृपा राहावी आणि सोबतच उदंड, चांगली, भरघोस पिकं कायमच शेतात पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. या दिवशी काही राज्यांमध्ये छोटी होळी किंवा शेकोटी करत त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. (Lord Indra)
या दिवसांमध्ये शेताला नवीन बहार आलेला असतो. शेतीची कामं करून शेतकरी ठाकतो. त्यामुळे तो या दिवशी कामातून सुट्टी घेत आराम करतो. सोबतच भोगीच्या दिवशी जेवणात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी खातात. या पदार्थांमधून मिळणारी ऊर्जा आणि उष्णता शेतकऱ्यांना वर्षभर शेतात काम करण्यासाठी प्रोत्साहित करते.
==========
हे देखील वाचा : Pongal जाणून घ्या दक्षिण भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पोंगल सणाची माहिती
==========
अनेक ठिकाणी भोगी देण्याची देखील प्रथा आहे. भोगीच्या दिवशी खास जेवण तयार केले जाते आणि सवाष्णीला जेवायला बोलावले जाते. काही ठिकाणी या सर्व पदार्थांचा शिधा सवाष्णीच्या घरी दिला जातो. यालाच “भोगी देणे” म्हणतात.
भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातच भोगीचा सण साजरा करण्याच्या विविध भागानुसार वेगवेगळ्या पद्धती दिसतील.कोकण, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते. अगदी भोगीची भाजी करण्याची पद्धतीही वेगवेगळी आहे.