हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. अशा वर्षभरात २४ एकादशी येतात. या सर्वच एकादशी महत्वाच्या असतात, मात्र त्यातही आषाढी एकादशीचे महत्व जरा जास्तच आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. ही तिथी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. धार्मिकदृष्ट्या ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. आपल्या हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, या एकादशीनंतर देव चार महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात. म्हणूनच या एकदाशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणातात. या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते. या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. (Ashadhi Ekadshi)
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशभरातून अनेक पालख्या आणि वारकरी पायी पंढरपुरास विठू रायाच्या दर्शनासाठी जातात. शेकडो दिंड्या आणि पालख्या हजारो वारकऱ्यांसह सहभागी होत असतात. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. देवशयनी एकादशी म्हणण्यामागे देखील एक कारण आहे. मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक पूर्ण रात्र असते. (Marathi News)
दक्षिणायन ही देवांची रात्र असून, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते. म्हणजेच देवांची रात्र सुरू होते, म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, असे म्हटले जाते, असे सांगितले जाते. आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र, कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. कार्तिक महिन्यात देवकार्ये सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. (Todays Marathi Headline)
महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीला एक वेगळेच महत्व प्राप्त होते. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. या एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय इत्मामांत विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो. देवशयनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते. (Top Marathi Headline)
आषाढी एकादशी कधी?
देवशयनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी करण्यात येते. यावर्षी हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी ही ०५ जुलैला संध्याकाळी ०६:०१ वाजेपासून ०६ जुलैला रात्री ०९:१७ वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देवशयनी एकादशीचे व्रत ०६ जुलै रविवारी रोजी करता येणार आहे. (Ashadhi Ekadashi News)
आषाढी एकादशीच्या पूजेची वेळ
ब्रह्म मुहूर्त – सकाळी ०४:०८ ते ०४:४९
अभिजित मुहूर्त – दुपारी ११:५८ ते १२:५४
विजय मुहूर्त – दुपारी ०२:४५ ते ०३:४०
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ०७:२१ ते ०७:४२
अमृत काल – दुपारी १२:५१ ते ०२:३८
त्रिपुष्कर योग – रात्री ०९:१४ ते १०:४२
रवि योग – सकाळी ०५:५६ ते रात्री १०:४२
धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीला उपवास केल्यास मनुष्याला धन, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या उपवासामुळे भगवान विष्णूची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात. आषाढी एकादशीला व्रत आणि उपवास करून दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला हा उपवास सोडावा. (Top Marathi Stories)
आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन शुचिर्भूत होऊन घरातील देवाची पूजा करावी. त्यानंतर विठुराच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून, स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा. विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी. (Top Trending News)
विश्वाचे पालनकर्ते म्हणून भगवान श्री हरी विष्णू यांना ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू चार महिने योग निद्रामध्ये जातात. या कालावधीला देवाचा निद्राकाळ असेही म्हणतात आणि यावरून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णू निद्राधीन झाल्यानंतर भगवान शिव ब्रह्मांड चालवतात. म्हणून चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान शिवाची पूजा करणे विशेषतः फलदायी असते. (Marathi Latest News)
भक्त पुंडलिक कोण होते?
मुचकुंद पुढे जानूदेव आणि मुक्ताबाई या ब्राम्हण दाम्पत्याच्या घरी एका बालकाने जन्म घेतला. या बालकाचे नाव पुंडलिक ठेवण्यात आले. यथावकाश पुंडलिकाचे लग्न झाले, मात्र पुंडलिक लग्नानंतर बाईल वेडा झाला होता. त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला. वाटेत मुक्कामासाठी ते कुक्कुट मुनींच्या आश्रमात थांबले. दुसऱ्या दिवशी पुंडलिक पहाटे उठला तेव्हा त्याला अनेक सुंदर स्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळी करताना दिसल्या. त्याने त्या स्रियांना विचारले तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कावेरी, कृष्णा इत्यादी नद्या स्त्री रूप धारण करून मातृ पितृ भक्ती करणाऱ्या कुक्कुट मुनींच्या सेवेसाठी इथे येतो इतके सांगून नद्या अदृश्य झाल्या. परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताप झाला. तो आई वडिलांना घेऊन परत पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करू लागला. (Top Stories)
विठू राया पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला का आले?
काही कारणाने माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील दिंडीरवनामध्ये ( चिंचेच्या वनात ) आल्या. त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूर मध्ये आले. रुक्मिणीचा शोध घेता घेता विठ्ठल पुंडलिकाच्या घराजवळ आले. माता पित्याबद्दल पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले. देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने त्याच्या जवळील वीट देवाकडे फेकली आणि मी माझ्या आई वडिलांची सेवा करून आलोच तोपर्यंत तुम्ही या विटेवरती आपण उभे राहा अशी देवाला प्रार्थना केली. विटेवरती उभा राहिला तो श्री विठोबा. श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रमला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपूरला विटेवरती उभा आहे. भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले म्हणून या एकादशीला फार महत्व आहे. (Social Media Updates)
=========
हे ही वाचा :
Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर
==========
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणावयाचा विष्णूचा मंत्र
सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत् सुप्तम् भावेदिदम् ।
विबुदे च विबुध्येत् प्रसन्न मे भावव्यय ।
मैत्राघपदे स्वपतिः विष्णुः श्रुतेश मध्यभागी परिवर्तमेति ।
जागर्ति पौष्ण वासाने नोवाण तत्र बुधः प्रकुर्यत् ।
शयन मंत्रानंतर, त्याच्याकडून क्षमा मागण्यासाठी क्षमा मंत्राचा पाठ केला पाहिजे.
भक्तस्तुतो भक्तपर: कीर्तिद: कीर्तिवर्धन:।
कीर्तिदिप्तिः क्षमा भक्त दया परा ।