आजचे जग हे सोशल मीडियाचे (Social Media) जग म्हणून ओळखले जात आहे. या माध्यमामुळे अनेक सामान्य लोकं स्टार झाले असून, कोट्यवधींच्या पैसा कमवत आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियालाच आपले करियर म्हणून निवडले आहे. या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करून पैसा कमवणारे अनेक मोठमोठे लोकं आहेत. आज सोशल मीडियामुळे सिलेब्रिटी झालेले अनेक लोकं आहेत. यात सर्वात वर आणि मोठे, सतत लाइमलाईट्मधे येणारे नाव म्हणजे यूटुबर म्हणजे रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia).
आपल्या सोशल मीडियावरील विविध चॅनेलवर दिग्गज मंडळींच्या मुलाखती घेत रणवीरने स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली. आज रणवीर सामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटींमध्ये देखील एक लोकप्रिय मुलाखतकार किंवा सोशल मीडिया स्टार आहे. आजवर अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी त्याच्या शोवर येऊन चित्रपटांचे प्रमोशन केले आहे. आपल्या अतिशय प्रभावी बोलण्याच्या कौशल्यामुळे तो समोरच्याला सहजपणे बोलते करतो आणि त्यांची मुलाखत घेतो. विविध क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या लोकांनी त्याच्या शोमध्ये आजवर हजेरी लावली आहे. (Ranveer Allahbadia)
केवळ देशातच नाही तर परदेशातही त्याचा शो आणि तो स्वतः खूपच लोकप्रिय आहे. रणवीरची लोकप्रियता आणि प्रसिद्धी पाहून त्याला मागच्यावर्षी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) National Creators Award 2024 पुरस्कारही प्रदान केला. सोशल मीडियावर त्याचे कोट्यावधी फॅन्स आहेत. मात्र सध्या तो एका मोठ्या वादात अडकला असून, त्याच्यावर सोशल मीडियावर चहुबाजूनी टीका होताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. (Top Stories)
रणवीरने कॉमेडियन समय रैना (Samay Raina) ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ (Indias got latent) या शोमध्ये जाऊन एका स्पर्धकाला अतिशय अश्लील आणि चुकीचा प्रश्न विचारला. रणवीर आई वडिलांच्या अतिशय खासगी आणि वैयक्तिक विषयाबद्दल वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. या वादावर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत माफी देखील मागितली आहे. मात्र हा वाद चांगलाच वाढला आहे. या वादामुळे चर्चेत आलेला रणवीर मोठ्या सेलिब्रिटींमध्ये गणला जातो. आज प्रसिद्ध झालेल्या रणवीरचा सोशल मीडियावरील प्रवास जवळपास १० वर्षांपूर्वीच सुरु झाला होता. जाणून घेऊया रणवीरचा संपूर्ण प्रवास. (Celebrity News)
रणवीर अलाहाबादियाचा जन्म २ जून १९९३ रोजी मुंबईत झाला. त्याने त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. मात्र पालकांच्या पावलावर पाऊल न ठेवता त्याने काहीतरी वेगळे करियर करण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्याने द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. रणवीर लहानपणी एक गुबगुबीत मुलगा होता. २०१४ मध्ये त्याने त्याचे पहिले यूट्यूब चॅनेल सुरु केले. (Social News)
वयाच्या १७ व्या वर्षी त्याने पहिल्यांदा उत्सुकतेपोटी दारू प्यायली. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या दिवसांत त्याचे दारू पिणे वाढले आणि काही दिवसातच त्याला दारूचे व्यसन लागले. अशातच तो कॉलेजच्या पहिल्या वर्षात नापास झाला. तो दारू पिऊ लागला. एवढेच नाही तर तो अभ्यासापासूनही दूर जाऊ लागला. मात्र नापास होणे हा त्याच्या आयुष्याला मिळालेला मोठा झटका आणि टर्निंग पॉइंट होता. यानंतर त्याने स्वतःवर नियंत्रण आणण्याचे ठरवले. अशातच त्याला वयाच्या २४ व्या वर्षी, त्याचे त्याला गुरू भेटले. या गुरूंनी त्याला योग्य मार्गावर आणण्यास मोठी भूमिका वाजवली. त्यांनी त्याला ध्यानधारणा, साधनेची ओळख करून दिली. गुरूंच्या मागर्दर्शनाखाली पुढे रणवीरने निरोगी आणि चांगल्या जीवनशैलीकडे वाटचाल सुरु केली. (Latest Marathi News)
=============
हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट
Finger Bowl जाणून घ्या हॉटेलमध्ये का दिले जाते फिंगर बाऊल
=============
तो एकूण तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ (beerbiceps) हे त्याचे युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स आहेत. युट्यूबर (Youtuber) म्हणून प्रसिद्ध असलेल्या रणवीरची महिन्याची कमाई ही लाखोंमध्ये आहे. युट्यूब, जाहिराती आणि प्रमोशनमधूनही तो बक्कळ कमाई करतो. काही रिपोर्ट्स नुसार युट्यूबच्या माध्यमातून रणवीर एका महिन्याला तब्बल ३५ लाखांची कमाई करतो. दिवसाची त्यांची कामे जवळपास १.३० लाखांच्या आसपास आहे. तर त्याची एकूण संपत्ती ही ६० कोटींच्या जवळपास असल्याचेही म्हटले जाते.