Home » Nepal : जाणून घ्या नेपाळमधील एकमेव अब्जाधीश व्यक्तीबद्दल

Nepal : जाणून घ्या नेपाळमधील एकमेव अब्जाधीश व्यक्तीबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nepal
Share

नेपाळमधील ‘GenZ आंदोलन’ सध्या संपूर्ण जगामध्ये कमालीचे गाजत आहे. तरुणाईने नेपाळ सरकरविरोधात हे आंदोलन पुकारले आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे आणि देशात चालणारा भ्रष्टाचार यामुळेतरुणाईच्या द्वेषाचा उद्रेक झाला आहे. याचा निषेध म्हणून नेपाळमधील जनता रस्त्यावर उतरली. मात्र आता याच आंदोलनाने आता हिंसक रूप घेतले आहे. या आंदोलनांमध्ये जवळपास २२ लोकांचा मृत्यू झाला असून, १०० पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. भारताचा शेजारी असलेल्या नेपाळला त्याच्या सौंदर्यामुळे आणि हर्बल वस्तूंमुळे जगात नवी ओळख मिळाली आहे. या देशाची अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी पर्यटकांवर आणि शेती, रेमिटन्स यावर अवलंबून आहे. (Marathi News)

असे असले तरी नेपाळमधील काही कंपन्यांनी आपल्या उत्पादनांमुळे जागतिक ओळख निर्माण केली आहे. नेपाळमधील असाच एक लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध ब्रँड म्हणजे ‘वाई वाई नूडल्स’. या नूडल्स केवळ नेपाळच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असून लोकांच्या आवडत्या आहे. हा ब्रँड सीजी कॉर्प ग्लोबल ग्रुपचा असून या ग्रुपचे मालक आहेत, विनोद चौधरी. नेपाळमधील एकमेक अब्जाधीश व्यक्ती म्हणून विनोद चौधरी यांची ओळख आहे. जरी नेपाळ लहान देश असला तरी या ‘वाई वाई नूडल्स’ने या देशाला अधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे. (Nepal News)

विनोद चौधरी हे नेपाळमधील एकमेव अब्जाधीश उद्योगपती आहेत, ज्यांची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स (सुमारे १६,७०० कोटी रुपये) आहे. नेपाळसारख्या केवळ ३ कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या आणि विविध आव्हानं समोर असलेल्या या देशात विनोद चौधरी यांनी ‘चौधरी ग्रुप’च्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायाला ग्लोबल लेव्हलवर नेले. त्यांच्या अभूतपूर्व यशामुळेचा त्यांना लोकं नेपाळचे ‘एलन मस्क’ म्हणून देखील ओळखतात. (Top Marathi Headline)

Nepal

विनोद चौधरी यांचा विविध क्षेत्रामध्ये व्यवसाय पसरलेला आहे. यामध्ये अन्न उद्योग, बँकिंग, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. ते सीजी कॉर्प ग्लोबल ग्रुपचे मालक असून, ज्या अंतर्गत सुमारे १६० कंपन्या आणि ८० ब्रँड्स काम करतात. त्यांचा व्यवसाय ३० हून अधिक देशांमध्ये देखील पसरलेला आहे. (Latest Marathi News)

लोकप्रिय नूडल्स ब्रँड ‘वाई वाई नूडल्स’ मुळे विनोद चौधरी यांना सर्वाधिक ओळख मिळाली. भारतात देखील प्रत्येक घरामध्ये या नूडल्स मोठ्या चवीने आणि आवडीने खाल्ल्या जातात. नूडल्सचा हा ब्रँड नेपाळ आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि कंपनीच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग त्यातून येतो. अन्न उद्योगातील या यशामुळे चौधरी यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. (Todays Marathi Headline)

विनोद चौधरी यांचा एक सामान्य माणूस ते अब्जाधीश असा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मूळचे भारतीय असलेल्या चौधरी यांचे आजोबा राजस्थानमधून नेपाळला स्थलांतरित झाले आणि कपड्याचा एक छोटेखानी व्यवसाय त्यांनी सुरू केला. अशातच काठमांडू येथील मारवाडी कुटुंबात विनोद यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी ‘अरुण एम्पोरियम’ नावाचे दुकान उघडले. पुढे वडिलांच्या आजारपणामुळे वयाच्या १८ व्या वर्षी विनोद यांनी शिक्षण सोडून व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. अप;लय वडिलांचे दुकान असलेल्या ‘अरुण एम्पोरियम’ दुकानाचे रूपांतर विनोद यांनी नेपाळचे पहिले डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये केले. (Marathi Top News)

विनोद चौधरी यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या ‘वाई वाई’ या इन्स्टंट नूडल्समुळे. या नूडल्सने मॅगी सारख्या जागतिक ब्रँडला भारत आणि नेपाळमध्ये जोरदार टक्कर दिली. विनोद हे थायलंडच्या ट्रीपवर गेले असताना तिथे त्यांनी लोकांमध्ये नूडल्सची लोकप्रियता पाहिली आणि त्यांना नूडल्सच्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी १९८० च्या दशकात ‘वाई वाई’ लाँच केले. कमी किंमत, उत्तम चव आणि कमी वेळात तयार होणारे हे नूडल्स नेपाळ आणि भारतातील गावातील लहान दुकानांपासून ते शहरातील आलिशान मॉल्सपर्यंत पोहोचले. भारतातील इन्स्टंट नूडल्स बाजारपेठेत या कंपनीचा २५% पेक्षा जास्त वाटा आहे आणि तिची वार्षिक उलाढाल ८ अब्ज रुपये (९६.२ दशलक्ष डॉलर्स) आहे. (Top Trending News)

=========

Nepal : तुमच्या घरातही असतील ‘या’ नेपाळी ब्रँड्सच्या वस्तू

Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?

Nepal : त्रिकोणी राष्ट्रध्वज असणारा एकमेव देश

=========

१९९० मध्ये विनोद चौधरी यांनी सिंगापूरमध्ये ‘सिनोव्हेशन ग्रुप’ स्थापन केला आणि १९९५ मध्ये नबिल बँकेत हिस्सा खरेदी केला. त्यांनी टाटा ग्रुपच्या ताज हॉटेल्ससह करार करून १०० हून अधिक देशांमध्ये १४३ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवले. नेपाळसह भारत आणि श्रीलंकेमध्ये या ग्रुप्सचे अनेक आलिशान ५ स्टार, ७ स्टार हॉटेल्स आहेत. फोर्ब्सच्या अंदाजानुसार २०२३ मध्ये त्यांची संपत्ती १.८ अरब डॉलर होती. विनोद चौधरी हे बिजनेसमॅन सोबतच संसद देखील आहेत. शिवाय ते विविध सामाजिक कार्यांमध्ये देखील सक्रिय सहभाग घेतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.