भारताला खूपच मोठा आणि महत्वाचा इतिहास लाभला आहे. या इतिहासात अशा अनेक घटना, गोष्टी घडून गेल्या ज्यांनी देशाच्या वर्तमानावर आणि भविष्यावर आपल्या प्रभाव सोडला. मात्र बऱ्याच अशा घटना आहेत, ज्या इतिहासात मागे पडल्या आणि विस्मृतीत गेल्या. मात्र चित्रपटांमुळे अशा जुन्या मात्र महत्वाच्या घटनांना लोकांसमोर मांडल्या जातात आणि त्यांना देखील या घटनांबद्दल माहित होते.
नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांचा ‘स्काय फोर्स’ (Skyforce) चित्रपट प्रदर्शित झाला. देशभक्तीपर आधारित असलेला हा सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान अमेरिकेकडून मिळालेल्या प्रगत लढाऊ विमानांचा वापर करून पाकिस्तान भारतीय हवाई दलाच्या तळांवर मोठा हल्ला करतो. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाचे सात जवान शहीद झाले होते आणि खूप मोठे नुकसान होते. या हलायचा बदल म्हणून भारत पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर हल्ला करतो. अशी या सिनेमाची कथा आहे. (Ajjamada Boppayya Devayya)
‘स्काय फोर्स’ या चित्रपटात वीर पहाडिया इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या (Ajjamada Boppayya Devayya) यांची भूमिका साकारत आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेकांनी अज्जामद बोपय्या देवय्या हे नाव पहिल्यांदा ऐकले असेल. मात्र अज्जामद बोपय्या देवय्या कोण होते?, त्यांचे शौर्य कोणते होते? हेच आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारत पाकिस्तानच्या युद्धात त्यांनी अज्जामद बोपय्या देवय्या यांनी आपल्या सहकाऱ्यांचेच प्राण वाचवले नाहीत, तर पाकिस्तानला सुद्धा जोरदार दणका दिला होता. (Marathi News)
इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या एक उत्कृष्ट पायलट होते. देवय्या यांचा जन्म २४ डिसेंबर १९३२ रोजी कुर्ग, कर्नाटक येथे झाला. १९५४ मध्ये जवळपास ७० वर्षांपूर्वी फायटर पायलट म्हणून ते IAF अर्थात भारतीय हवाईदलामध्ये रुजू झाले होते. फायटर जेट उडविण्यात त्यांचा खास हातखंडा होता. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना अज्जामद यांच्यावर इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग कॉलेजमध्ये युवकांच्या ट्रेनिंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
बोपय्या त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. सोबतच त्यांनी आपले शौर्य दाखवत देशासाठी अनेक मोहिमा यशस्वीरीत्या देखील पार पडल्या. १९६५ साली पाकिस्तान विरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर अज्जामद यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देशाच्या पहिल्या एअर स्ट्राइक मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी दिली होती. या मिशनमध्ये त्यांची जबाबदारी एका शिक्षकाची होती. पण, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सहकाऱ्यांना त्यांची आवश्यकता आहे, त्यावेळी थेट फायटर जेट घेऊन ते थेट सरगोधा एअर बेसच्या दिशेने गेले. (Ajjamada Boppayya Devayya Story)
एका डॅमेज प्लेनसह उड्डाण करणाऱ्या अज्जामद यांचा सामना अमेरिकी एफ-104 मधील पाकिस्तानी फ्लाइट लेफ्टनेंट अमजद हुसैन यांच्याशी झाला. पण ते ना घाबरले, ना डगमगले, नाही त्यांनी हिंमत सोडली. बोपय्या यांनी पाकिस्तानी पायलटला आपल्या सहकाऱ्यांच्या मागे जाण्यापासून रोखले. अमेरिकी बनावटीच्या एफ-104 ला त्यांनी कडवी टक्कर दिली. मात्र त्यांचा जास्त टिकाव लागला नाही आणि या युद्धात बोपय्या यांचे विमान कोसळले. या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. बोपय्या यांचे विमान पाकिस्तानमध्ये कोसळले आणि पाकिस्तानमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाला मिळू शकला नाही.
===============
हे देखील वाचा : Maharashtra State Lottery : अनेकांना लखपति बनवणारी राज्य लॉटरी बंद होणार?
===============
शहीद अज्जामद बोपय्या देवय्या यांच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी १९८८ साली सरकारकडून त्यांना मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अज्जामद बोपय्या देवय्या भारतीय वायुसेनेच असे एकमेव अधिकारी आहेत, ज्यांना मरणोपरांत हा अतिशय मानाचा महावीर चक्र पुरस्कार मिळाला.