सध्या सोशल मीडियावर स्टार असलेले अनेक कलाकार विविध कारणांमुळे वादात अडकताना दिसत आहे. यात अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. आता या यादीत अजून एक नाव जोडले गेले आहे, आणि ते म्हणजे कुणाल कामरा. कुणाल हा आजच्या काळातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन आहे. आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या शोमुळे आणि सोशल मीडियावरील त्याच्या व्हिडिओमुळे सतत गाजत असतो. मात्र आता तो एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत किंबहुना वादात अडकला आहे. (Kunal Kamra)
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना गद्दार म्हटलं आणि शिंदे शिवसेना गटाची खिल्ली देखील उडवली आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करत निषेध व्यक्त केलाय. शिवाय कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील शिवसैनिकांनी तोडफोड केलीये. (Kunal Kamra News)
कुणालने दिल तो पागल हैं सिनेमातील एका गाण्याच्या चालीवर एक विडंबनात्मक कविता सर्वांना ऐकवली आणि नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला. त्याने त्यांच्या कवितेमध्ये लिहिले, “थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए, उसमे ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी मे मिल जाए तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहें”(Marathi Latest News)
दरम्यान कुणालाच हा व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कुणालला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्याला तीव्र विरोध केला आहे. या वादामुळे चर्चेत आलेल्या कुणालसाठी ‘वाद’ काही नवीन नाही. याआधी देखील तो अनेकवेळा वादात अडकला आहे. त्याने अनेक वादग्रस्त विधाने देखील केली आहे. एवढेच नाही तर त्याला भारतीय विमानांमध्ये सहा महिन्यांसाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली होती. जाणून घेऊया नक्की कुणाल कामरा आहे तरी कोण?(Top Stories)
==============
हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !
===============
कोण आहे कुणाल कामरा?
कुणाल कामराचा जन्म ३ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईत झाला. मुंबईतच शिक्षण घेणाऱ्या कुणालने वाणिज्य शाखेत पदवी मिळविण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, मात्र त्याने दुसऱ्या वर्षातच कॉलेज सोडले आणि तो प्रसून पांडेंची जाहिरात चित्रपट निर्मिती संस्था ‘कॉर्कोइस फिल्म्स’मध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करू लागला. त्याठिकाणी त्याने तब्बल ११ वर्षे काम केले. (Marathi Trending News)
कुणाल व्यवसायाने एक स्टँडअप कॉमेडियन आहे. तो जीवनातील विचित्र गोष्टींवर विनोद करतो. त्याचे राजकारण, कॅब ड्रायव्हर्स, बॅचलर लाईफ आणि टीव्ही जाहिराती या विषयांवरील विनोद सर्वात प्रसिद्ध आहेत. राजकीय विषयांवर त्याने केलेली स्टँडअप कॉमेडी बऱ्याचदा चर्चेत येत असते. (Social News)
२०१३ ला कुणालने मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये एका कार्यक्रमाद्वारे स्टँड-अप कॉमेडियन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये, त्याच्या शोची एक क्लिप YouTube वर अपलोड झाली आणि त्यामुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुढे कुणालने जुलै २०१७ मध्ये रमित वर्मासोबत ‘शट अप कुणाल’ हा टॉक-शो सुरू केला. (Entertainment News)
‘शट अप या कुणाल’ या शोमुळे त्याला सर्वात जास्त प्रसिद्ध मिळाली होती आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला होता. त्यावेळी कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, उमर खालीद, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या.(Marathi Latest Top NEws)
कुणाल कामराची संपत्ती
कुणाल कामराच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, एका माहितीनुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे २ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास १७ कोटी रुपये आहे. त्याने ही सर्व संपत्ती त्याच्या ‘शटअप कुणाल’ या शोमधून आणि स्टॅन्ड कॉमेडीच्या शोमधून कमावली आहे. कुणाल कामरा एका शोसाठी ३ ते ४ लाख रुपये घेतो. तसेच तो कॉमेडी शोच्या माध्यमातून महिन्याला १२ ते १५ लाख रुपये कमावतो. (Political News)
कुणाल कामरा अर्णब गोस्वामी वाद
२०२० मध्ये कुणाल आणि प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी याच्यामध्ये देखील विमानात वाद झाला होता. कुणाल आणि अर्णब एकाच फ्लाईटमधून प्रवास करत होते. त्यावेळी कुणालने अर्णब यांना पाहून त्याच्याबाबत टिप्पणी केली होती. त्यानंतर इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईसजेट आदी विमान कंपन्यांनी कुणाल कामराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती.
==============
हे देखील वाचा : Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
तत्पूर्वी कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमधून तीव्र संतापाची लाट उसळली. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ जिथे शूट झाला त्या ‘द हॅबिटॅट’मध्ये जाऊन तोडफोड केली. याप्रकरणी कुणालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.