Home » आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले?

आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Which salt to eat?
Share

‘आई भाजीला मीठ कमी झाले गं…’ असे वाक्य आपल्याला नेहमीच घराघरात ऐकायला मिळते. आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे ‘मीठ’. रोजच्या जेवणाला रुचकर आणि चविष्ट बनवणारे मीठ प्रत्येकाच्याच घरात अगदी सहज सापडते. हेच मीठ जेवणात प्रमाणात पडले तर जेवण रुचकर होते आणि जास्त झाले तर खारट. (Which salt to eat?)

आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सोडियमचा महत्वाचा स्रोत म्हणून मीठ काम करते. हे मीठ आपल्या शरीरासाठी जरी आवश्यक असले तरी त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम जास्तच असते. शरीराला आवश्यक असणाऱ्या सोडियमपैकी ९० टक्के सोडियम हे एकट्या मिठातून मिळते. वैज्ञानिकाच्या माहितीनुसार आपण रोज ५ ग्रॅम मीठ खायला हवे. म्हणजेच साधारण १ चमचा मीठ आपण खायला पाहिजे. मात्र भारतात जवळपास ११ ग्रॅम मीठ रोज खाल्ले जाते.

मीठ हा आपल्या अन्नाची चव वाढवत असला तरी या मिठाचे जास्त सेवन केल्यास अनेक मोठ्या आणि दुर्धर आजारांना आमंत्रण देतो. जास्त मीठ खाल्ले तर लठ्ठपणा, जळजळ, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, गॅस्ट्रिक कॅन्सर, मेंदूतील रक्तप्रवाहाला बाधा निर्माण होत डोक्यातील एखादी रक्तवाहिनी फुटणे किंवा रक्ताच्या गाठी निर्माण होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन हाडे कमकुवत होतात. जे लोकं जास्त मीठ खातात त्यांना लठ्ठपणाचा त्रास होण्याचे प्रमाण वाढते. ज्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ते मीठ शरीरासाठी घटक असते. (Which salt to eat?)

Which salt to eat?

आजच्या काळात तर डॉक्टर, फिटनेस ट्रेनर, आहारतज्ज्ञ आदी सर्वच मीठ कमीच खाण्याचा सल्ला देतात. काही लोकं काळं मीठ, खडा मीठ, सैंधव मीठ आदी प्रकारची मीठ आरोग्यासाठी चांगली असून ती खावी असे सांगतात. मात्र नक्की कोणते मीठ खावे आणि त्याचे प्रमाण किती असावे हे कधीच कोणी सांगत नाही. कमी मीठ पण कमी म्हणजे नक्की किती हेच आपण आज जाणून घेऊया.

सामान्य मीठ :

आपण रोजच्या वापरासाठी जे पांढरे मीठ वापरतो त्यालाच सामान्य मीठ म्हणतात. हे मीठ प्रत्येक घरात अगदी सहजच उपलब्ध असते. सामान्य मीठाचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे या मिठामध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धता नसते. हे शुद्ध मीठ बनवण्यासाठी अनेक प्रक्रिया पार कराव्या लागतात. त्यांनतर हे शुद्ध मीठ तयार होते. मुलांच्या विकासासाठी सामान्य मीठ महत्वाचे असते. मात्र, प्रमाणात मीठच फायदेशीर असते, अन्यथा जास्त मीठ खाल्ल्याने अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात. (Which salt to eat?)

सैंधव मीठ :

समुद्र किंवा तलावाच्या खऱ्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर काही विविध रंगांचे खडे किंवा स्फटिक खाली राहतात. यापासूनच रॉक सॉल्ट अर्थात आपले सैंधव मीठ तयार केले जाते. सैंधव मीठ हे तसे पाहिले तर एक प्रकारचे खनिजच आहे. या मिठाचा आपण जेवणासाठी वापर केला तर आपले अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रियेशिवाय बनते आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. सैंधव मिठाला हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ आदी नावाने देखील संबोधले जाते. रॉक सॉल्टमध्ये 90 पेक्षा अधिक खनिजे आढळतात. यात मॅग्नेशियम आणि सल्फरचे प्रमाण जास्त असते.

सी सॉल्ट :

हे मीठ पाण्याची वाफ तयार करून केले जाते. या प्रक्रियेद्वारे तयार होणारे मीठ हे काळे मीठ असते. या मिठामध्ये सोडियम कमी आणि आयोडीन जास्त असते. हे मीठ लवकर वितळते. (Which salt to eat?)

======
हे देखील वाचा : ‘या’ घरगुती गोष्टींचे सेवन थायरॉइड नियंत्रणात आणू शकतो
======

 

काळे मीठ :

हे मीठ तयार अनेक मसाले, झाडाची साल वापरून तयार केले जाते. हे मीठ पोट फुगी, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी आदी आजारांमध्ये औषध म्हणून वापरले जाते. तसेच लहान मुलांना देण्यासाठी देखील या मिठाचा वापर केला जातो. (Which salt to eat?)

आपण नेहमी कमी सोडियम असलेले मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. समुद्री मीठ आणि सैंधव मीठ या दोन्ही मिठांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्याने ते खाणे अधिक फायदेशीर आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.