Home » DryFruits व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढतील ‘हे’ ड्रायफ्रुटसचे प्रकार

DryFruits व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढतील ‘हे’ ड्रायफ्रुटसचे प्रकार

by Jyotsna Kulkarni
0 comment
DryFruits
Share

प्रत्येकालाच चांगली आणि आरोग्यदायी जीवन जगण्याची इच्छा असते. मात्र आजूबाजूच्या वातावरणामुळे, अनहेल्दी खाण्यामुळे, व्यायामाच्या अभावामुळे, कामाच्या प्रेशरमुळे आदी अनेक कारणांमुळे खूपच कमी वयात अनेक व्याधी सुरु होताना दिसत आहे. अगदी छोट्या आजारांपासून मोठ्या गंभीर आजारांचा यात समावेश होतो. यापासून वाचण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे बदल केले. आहारात काही चांगल्या आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश केला तर आपण या आजारांना दूर ठेवण्यास प्रयत्न करू शकतो. (DryFruits)

आपल्या शरीराला उत्तम कार्य करण्यासाठी, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराची झिज भरून काढण्यासाठी पोषणतत्वयुक्त पदार्थ खाणे खूप आवश्यक असते. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन, प्रथिने, फेनोल, ओमेगा आदी यांचा समावेश असलेले पदार्थ खाणे खूपच आवश्यक असते. आपल्याला या गोष्टी विविध पदार्थांमधून मिळत असतात. त्यासाठी आपण त्या विशिष्ट गोष्टींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केला पाहिजे. या गोष्टी भाज्या, डाळी, विविध धान्य, मांस, पनीर, सुकामेवा आदी अनेक गोष्टींमधून मिळतात. (Health Care)

DryFruits

काजू, बदाम, पिस्ते, अंजीर अर्थात ड्रायफ्रुटस. आपल्या जेवणाची खासकरून गोड पदार्थांची चव वाढणारे हे ड्रायफ्रुटस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आणि लाभदायक आहे. प्रत्येक सुकामेवा हा आपल्याला अनेक आजारांपासून वाचवत असतो. अगदी शरीरातील कॅल्शियम वाढवण्यापासून तर जीवघेण्या आजारांना दूर ठेवण्यापर्यंत अनेक विकारांमध्ये हा सुकामेवा उपयुक्त ठरत. या सुकामेव्यामधील काजू, बदाम खाल्ल्याने मिळणारे फायदे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र आपण आज या लेखातून अंजीर, बेदाणे आणि अक्रोड खाल्ल्याने काय काय फायदे होतात ते जाणून घेऊया. (DryFruits Benefits)

अंजीर (Fig)
अंजीर हे अतिशय पौष्टिक फळ म्हणून ओळखले जाते. अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक मोठे आणि महत्वाचे फायदे होतात. अनेक प्रकारच्या व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असणाऱ्या या फळातून आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, आणि व्हिटॅमिन डी मिळते. यासोबतच अंजीरमध्ये अनेक खनिजं देखील आहेत. यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, स्ट्रॉन्टियम, तांबे, मॅग्नेशियम आदींचा समावेश होतो.

नियमित आणि योग्य प्रमाणत अंजीर खाल्ल्यास अंजीरमधील फायबरमुळे पचनास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. अंजीरमध्ये उपलब्ध असलेले प्रथिने, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आदी पोषक घटक शरीरास मजबूत राखण्यास मोठी भूमिका बजावतात. मधुमेही रुग्णांसाठी देखील अंजीर खाणे लाभदायक ठरते. (Latest Marathi News)

DryFruits

बेदाणे (Raisin)
बेदाणे खाल्ल्याने देखील आपल्या शरीराला अनेक उत्तम आणि चमत्कारिक लाभ होतात. बेदाणे अर्थात मनुका. हे बेदाणे द्राक्ष कोरडी करून बनवले जातात. यात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन, खनिजं, अँटीऑक्सिडंट्स, फायबर, नैसर्गिक साखरसोबतच इतरही अनेक पोषक घटक आढळतात. नियमित आणि योग्य प्रमाणात बेदाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. बेदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. शिवाय आपल्या शरीराला उर्जा मिळते. (Top Stories)

DryFruits

==============

हे देखील वाचा : Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस

Bihar : मखाना शेतीला चांगले दिवस !

===============

अक्रोड (Walnut)
अक्रोड अतिशय टणक कवचामध्ये असलेला हा मेवा अतिशय लाभदायी आणि चविष्टय आहे. फक्त अक्रोड फोडण्याचे थोडे कष्ट घेतल्यानंतर हा मेवा खाल्ल्यानंतर शरीराला होणारे लाभ अतिशय मोठे आणि महत्वाचे आहेत. अक्रोड हे फळ ओमेगा-3 फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा मोठा आणि मुबलक स्रोत आहे. अक्रोड खाल्ल्याने आपल्या मेंदूचे कार्य सुधारते, हाडे मजबूत होतात शिवाय हृदयविकाराचा धोका कमी होतो. अक्रोड वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते.

DryFruits


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.