आजकाल मोबाईल आणि त्यातही स्मार्ट फोनशिवाय कोणाचेही पान हलत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याचा मूलभूत गरजा होत्या. मात्र आता यात मोबाईल ही चौथी गरज नकळतपणे ऍड झाली आहे. लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईलचे जेवढे दुष्परिणाम आहेत, तेवढीच आजच्या काळात त्याची गरज. त्यामुळे प्रत्येक जणं या मोबाईलची गरज ओळखून आपला मोबाईल जपत असतो.(Mobile)
मात्र कधी कधी अशी परिस्थिती येते की, चुकून आपला फोन पाण्यात पडतो किंवा पाण्यात भिजतो. आता फोन भिजल्यावर सगळेच पॅनिक नक्कीच होतात. एकतर फोन चालू होईल की नाही ही भीती, टेन्शन असते आणि दुसरे म्हणजे आपला महत्वाचा डाटा त्यात असतो. शिवाय फोनशिवाय कसे राहायचे हा देखील एक मोठा प्रश्न असतोच की. त्यामुळे सगळेच आपल्या फोनची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतात. पण चुकून फोन भिजला तर काय करावे? अनेक लोकं फोन ओपन करून तांदुळामध्ये ठेवतात? मग असे करणे योग्य आहे का? यासोबतच अजून काय उपाय करता येतील, जेणेकरून फोन खराब होणार नाही? चला जाणून घेऊया. (Social News)
स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास काय करावे?
स्मार्टफोन बंद करा
तुमच्या फोनमध्ये पाणी शिरल्यास तुम्ही तो ताबडतोब बंद करण्याचा प्रयत्न करा. मोबाईल पाण्यात पडल्यानंतर तो थोडा वेळ तो सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करून नका. तसेच तो चार्जिंगलाही लावू नका. असे केल्यास शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. त्यामुळे स्मार्टफोन सर्वात आधी बंद करा. (Marathi News)
सिम कार्ड आणि मेमरी कार्ड
फोन बंद केल्यानंतर, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून घ्या. असे केल्याने फोनमध्ये पाणी शिरले तरी आपले सिम कार्ड आणि मेमरी कार्ड खराब होऊन त्याचे नुकसान होणार नाही.
फोन सुकवा
पाण्यात पडल्यानंतर फोन वळवण्यासाठी मोकळ्या हवेत ठेवा. जिथे अजिबातच ओलावा नाही अशा ठिकाणी हा फोन ठेवा. तुम्ही पंखा चालवू ठेवून देखील फोन सुकवू शकता. अनेक लोकं स्मार्टफोन सुकविण्यासाठी हेअर ड्रायर वापरतात. मात्र, हेयर ड्रायरमधील गरम हवा स्मार्टफोनमधील घटकांना नुकसान पोहोचवू शकते आणि फोनचे मोठे नुकसान होऊ शकते. (Trending News)
तांदळात ठेवा
फोनमध्ये पाणी शिरले असेल तर फोन पटकन काही तासांसाठी तांदळाच्या पिशवीत किंवा तांदळ्याच्या डब्ब्यात ठेवू शकता. कारण तांदूळ ओलावा लवकर शोषून घेतो. मात्र यावर देखील अनेकांचे दुमत आहे.(Top Stories)
सर्विस सेंटर
वरील सर्व उपाय करूनही जर फोन चालू होत नसेल आणि काम करत नसेल, स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटरमध्ये न्या. सर्विस सेंटर फोन अधिक चांगल्या प्रकारे तपासून तो ठिक करून मिळेल. (Marathi Top News)
तांदळात फोन ठेवणे किती योग्य?
फोन पाण्यात पडला की जवळपास सर्वच लोकं तो पटकन तांदळात ठेवतात जेणेकरून तांदूळ फोनचा ओलावा लवकर शोषून घेऊ शकेल. फोन पाण्यात पडल्यानंतर तो तांदळाच्या डब्यात ठेवल्याने काही प्रमाणात फोन नीट करण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. मात्र यातले जे तज्ञ आहेत, त्यांना असे वाटते की, कच्च्या तांदळाचा वापर करून ओल्या वस्तू वाळवू नयेत. कच्चा तांदूळ फोनमधील पाणी योग्यरित्या शोषू शकत नाही.(Marathi Latest News)
=======
हे देखील वाचा : Longest Flights : ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब आणि वेळ खाऊ विमान प्रवास
Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा
=======
तांदूळ हळूहळू ओलावा शोषून घेते, त्यामुळे पाणी फोनमध्ये जास्त काळ राहू शकते. शिवाय फोन तांदुळामध्ये ठेवल्यास तांदळाचे दाणे चार्जिंग पोर्टमध्ये किंवा फोनच्या इतर साहित्य पॉइण्टमध्ये अडकू शकतात. यामुळे फोनचा ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे जर फोन पाण्यात पडला असेल तर तो तांदळाच्या डब्यात न ठेवता इतर उपाय करा. (wet Mobile)