Home » New Year : कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कधी होते?

New Year : कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कधी होते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
New Year
Share

उद्यापासून १ जानेवारी २०२६ अर्थात २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आज आपण सर्वच २०२५ वर्षाला निरोप देऊन २०२६ चे दणक्यात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहोत. प्रत्येकाच्याच पार्टीचे आणि नवीन वर्षाचे स्वागत कसे करणार याचे प्लॅनिंग झाले आहे. आता आपण इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार २०२५ हे वर्ष संपून २०२६ वर्ष सुरु होणार आहे. मात्र भारतामध्ये किंबहुना जगामध्ये राहणाऱ्या विविध धर्माच्या लोकांचे नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी सुरु होते. मग कोणत्या धर्माचे नवीन वर्ष कधी सुरु होते जाणून घेऊया. (New Year)

हिंदू नवीन वर्ष
हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन होते. यादिवशी आपण महाराष्ट्रीयन लोकं गुढी पाडव्याचा सण साजरा करतो. यालाच हिंदू नवीन संवत्सर किंवा संवत असेही म्हणतात. या दिवसापासुन ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीला सुरुवात केली असल्याचे सांगितले जाते. शिवाय याच दिवसापासुन विक्रम संवतच्या नवीन वर्षाची सुरवात होते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा सण किंवा हा महिना, ही तारीख मार्च – एप्रिल महिन्यात येते. (Top Trending News)

New Year

जैन नवीन वर्ष
जैन नववर्ष दिवाळीच्या दुस-या दिवसापासून सुरू होते. महावीर स्वामींच्या मोक्ष प्राप्ती दिवसाच्या दुस-या दिवसापासुन जैन नववर्षाला सुरुवात होते. याला वीर नर्वाण सवंत असेही म्हणतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपण पाडव्याचा सण साजरा करतो.

New Year

ईसाई नविन वर्ष
ईसाई लोक १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. जवळजवळ ४००० वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये नवीन वर्ष २१ मार्चला साजरे केले जायचे, याच दिवशी वसंत ऋतूला सुरवात होते असेही मानले जाते. जेव्हा हुकूमशाह ज्युलियस या रोमन सम्राटाने इ.स.पु.र्व. ४५ व्या वर्षी ज्युलियस कॅलेंडरची स्थापना केली. तेव्हा जगात पहिल्यांदा १ जानेवारीला नविन वर्षचा उत्सव साजरा केला गेला. हे संपूर्ण जगात साजरे केले जाणारे प्रचलित नवीन वर्ष आहे. (Social News)

New Year

सिंधी नवीन वर्ष
सिंधी नव वर्षाची सुरुवात चेटीचंड उत्सवापासून होते. हा उत्सव चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरा केला जातो. सिंधी मान्यतेनुसार याच दिवशी वरूणराजाच्या अवतारातील भगवान झुलेलाल यांचा जन्म झाला.

New Year

शीख नवीन वर्ष
पंजाबमध्ये नवीन वर्षाचे स्वागत बैसाखी उत्सव साजरा करुन केले जाते. हा सण एप्रिल महिन्यात येतो. शीख नानकशाही कॅलेंडरनुसार होळीच्या दुस-या दिवसापासून नवीन वर्षाची सुरवात होते.

New Year

पारशी नवीन वर्ष
पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रुपात साजरे केले जाते. १९ ऑगस्टला पारशी लोक नवरोजचा सण साजरा करतात. ३००० वर्षांपूर्वी शाह जमशेदजी यांनी पारशी धर्मात नवरोज साजरा करण्यास सुरवात केली. नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दिवस, असा नवरोज चा अर्थ आहे.

New Year

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.