देवशयनी एकादशीला विश्रांती घेण्यासाठी गेलेले भगवान विष्णू देवउठनी एकादशीला जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कार्यभार सांभाळतात. त्यामुळे या एकादशीला देवोत्थान एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसासोबतच चातुर्मास समाप्त होतो आणि पुन्हा एकदा विवाह, साखरपुडा, बारसं, गृहप्रवेश यांसारखी शुभ-मांगलिक कार्ये सुरू होतात. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते. म्हणूनच देवउठनी एकादशीला नवीन आणि शुभ वेळेच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. (Kartiki Ekadshi)
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिकी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी इतकेच महत्त्व कार्तिकी एकादशीला आहे. यादिवशी देखील पंढरपूरची यात्रा भरते. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देखील केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. या एकादशीचे व्रत केल्यानं मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठधामला प्राप्त होतो, असे पुराणात सांगितले आहे. (Marathi)
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ११ मिनिटांनी सुरू होऊन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. १ नोव्हेंबरला एकादशी तिथी दिवसभर असल्यामुळे १ नोव्हेंबर रोजीच देवउठनी एकादशी साजरी केली जाईल. तर देवउठनी एकादशीचे पारण २ नोव्हेंबर रोजी केले जाईल. देवउठनी एकादशीचे व्रत आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला मोठे महत्त्व प्राप्त आहे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच जर आपण या एकादशीच्या दिवशी विविध उपाय केले तर नक्कीच त्यांचा आपल्या वर्तमान जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्याला उत्तम लाभ होतात. (Top Stories)
कार्तिकी एकादशीला काय करावे?
* कार्तिकी एकादशीला ब्राह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे. शक्य नसल्यास स्नान करताना सप्तनद्यांची नावे घ्यावी. त्यानंतर ध्यान करुन व्रताचा संकल्प करावा. त्याचबरोबर आपल्या पितरांच्या नावाने दान करा. (Marathi News)
* कार्तिकी एकादशीला भगवान विष्णु यांना अभिषेक करा आणि साजूक तुपाचा दिवा लावून आरती करा. त्यानंतर विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करुन श्रीहरीचे भजन व किर्तन करा. भगवान विष्णु यांना नैवेद्य दाखवा
* कार्तिकी एकादशीच्या तिथीवर निर्जळी उपवास करा आणि भजन किर्तन करुन दान अवश्य करा. (Top Marathi Headline)

* कार्तिकी एकादशीला गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच यादिवशी गरीब गरजू लोकांना अन्नदान करावे. (Latest Marathi News)
* कार्तिकी एकादशीला दान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे यादिवशी विविध गोष्टींचे दान करता येते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे दान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. दूध दान केल्याने कुटुंबातील लोकांच्या व्यवसायात प्रगती होते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. याशिवाय दूध दान केल्याने देवी लक्ष्मीवर विशेष कृपा प्राप्त होते.
* मान्यता आहे की या एकादशीच्या दिवशी दान केल्याने भगवान विष्णूसह सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे या दिवशी घराचे आंगण शेणाने सारवतात आणि ते फार पवित्र मानले जाते. यादिवशी अन्न व पैशांव्यतिरिक्त धान्य, मका,गहू, बाजरी, गूळ, उडीद आणि कपडे दान केले जातात. रताळे आणि उस दान करणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी लाभते. (Top Marathi News)
* प्रभू विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे. याच कारणामुळे या एकादशीच्या पूजेत पिवळ्या रंगाच्या वस्तू अधिक वापरल्या जातात. प्रबोधिनी एकादशीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घाऊन देवाची पूजा करावी आणि पूजा करताना कपाळावर चंदनाचा टिळा अवश्य लावावा. असे केल्याने प्रभू विष्णू प्रसन्न होतात.
* या दिवशी भगवान विष्णू किंवा आपल्या इष्ट-देवाची उपासना केली पाहिजे. या दिवशी “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः “मंत्राचा जप केल्याने लाभ होतो.
* असे म्हणतात की देवोत्थान एकादशी व्रत केल्याने हजार अश्वमेघ व शंभर राजसूय यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होते. धन आणि समृद्धी येते. प्रबोधिनी एकादशी व्रत केल्याने भाग्य उजळते. (Latest Marathi Headline)
=========
Devuthani Ekadashi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउठणी एकादशीचे महत्त्व आणि माहिती
Kartika Purnima : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती
=========
कार्तिकी एकादशीला काय करू नये?
* कार्तिकी एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळावे. (Top Trending News)
* कार्तिकी एकादशीच्या दिवशी बाहेर भांडणे करु नये. चुकूनही कोणाचा अपमान करु नये.
* कार्तिकी एकादशीच्या दिवशी मांस-मदिराचे सेवन करु नये. त्याचबरोबर, लसूण-प्याजसारखे तामसिक भोजन करु नये. तुम्ही व्रत करत नसाल तरीदेखील यादिवशी सात्विक आहार घेतात.
* एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपू नये. तसेच चुकूनही नखे किंवा केस कापू नयेत. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही याची हमी देत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
