येत्या २६ जानेवारी रोजी आपण आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. २६ जानेवारी १९५० साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. प्रजासत्ताक दिवस हा आपण सर्वांसाठी मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. या दिवशी देशाची ताकद, सांस्कृतिक विविधतेची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाची झलक संपूर्ण जगाला पाहायला मिळते. भारतात दरवर्षी २६ जानेवारीला ‘ प्रजासत्ताक दिन ‘ साजरा केला जातो. तर, १५ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करतात. हे दोन सर्वात मोठे आणि महत्त्वाचे राष्ट्रीय उत्सव असून त्याचा उत्साह संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळतो. मात्र या दोन राष्ट्रीय उत्सवांमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. अनेक लोकांचा आजही प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन दिवसांमध्ये गोंधळ होतो. आज आपण याच दोन दिवसांमधील नेमका फरक काय आहे तो जाणून घेऊया. (Marathi)
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले खरे पण भारत १९५० पर्यंत प्रजासत्ताक राष्ट्र नव्हता. म्हणजेच काय तर, देशाची राज्यघटना तयार होईपर्यंत भारताला स्वतंत्र घोषित करण्यात आले नव्हते. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो, जो ब्रिटीश राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे प्रतीक आहे. तर दुसरीकडे प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी म्हणजे, २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. (Republic Day)

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचे स्मरण केले जाते. हा दिवस राष्ट्रीय गौरव आणि सन्मानाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. तर भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिवस प्रजासत्ताकाचे राष्ट्रासाठी असलेल्या योगदानाची जाणीव करून देतो. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. त्यात २२ भाग आणि ८ वेळापत्रकांमध्ये विभागलेले ३९५ लेख आहेत. १५ ऑगस्टला ब्रिटिशांचा झेंडा उतरवून भारतीय झेंडा ध्वजस्तंभावर चढवण्यात आला होता. त्यामुळे यादिवशी झेंडा ध्वजस्तंभाच्या खाली बांधलेला असतो. दोरीने तो खालून वर चढवून मग फडकवला जातो. तर २६ जानेवारीला झेंडा ध्वजस्तंभाला वरच बांंधलेला असतो. (Latest Marathi News)
भारतीय राज्यघटनेनुसार, “भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे, जो आपल्या नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी देतो आणि त्यांच्यामध्ये बंधुभाव वाढविण्याचा प्रयत्न करतो.” स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. याशिवाय, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, देशाचे राष्ट्रपती टेलिव्हिजनवर ‘राष्ट्राला अभिभाषण’ देतात. प्रजासत्ताक दिनाचे आयोजन दिल्लीतील इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनाजवळ ड्युटी पथावर केले जाते. २६ जानेवारीच्या उत्सवाची सांगता २९ जानेवारीला ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभाने होते. तर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव १५ ऑगस्टलाच संपतो. (Top Stories)
========
Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते ?
Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
========
देशभरात प्रजासत्ताक दिनही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भारताचे राष्ट्रपती नवी दिल्लीतील ‘कर्तव्य पथ’वर ध्वजारोहण करतात. या कार्यक्रमात भारताचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेद्वारे परेड आणि एअर शोचे प्रदर्शन केले जाते. स्वातंत्र्यदिनी परेडचे आयोजन केले जात नाही. प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य पथावर एक परेड असते. यात सर्व राज्यांचे देखावे दाखवले जातात. ज्यामध्ये त्या देशांची कला आणि संस्कृती दाखवली जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
