लवकरच आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करणार आहोत. या सणाला खूपच मोठे आणि महत्वाचे वैशिट्य आहे. एकतर या दिवशी हिंदू नवीन वर्ष सुरु होते आणि दुसरे म्हणजे या दिवसापासून हिंदू कालगणना सुरु होते. पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. आपले जवळपास सर्वच हिंदू सण हे याच कालगणनेनुसार साजरे करत असतो. खूप कमी असे सण आहेत ज्यासाठी इंग्रजी कॅलेंडरची आपल्याला गरज पडते. (Gudhipadwa)
आपण नेहमीच अनेकांच्या तोंडून, पंचागावर, पूजा सांगणाऱ्या गुरुजींच्या तोंडून एक शब्द नक्कीच ऐकला असेल आणि तो शब्द म्हणजे, ‘शालिवाहन शक‘. मग नक्की हे ‘शालिवाहन शक’ आहे तरी काय? काय आहे या शब्दाला अर्थ? फक्त कोणीतरी हा शब्द उच्चरतात आपण ऐकतो आणि सोडून देतो. मात्र शालिवाहन शक या शब्दाला मोठा अर्थ आणि महत्व आहे. याच शब्दावरून आपली हिंदू कालगणना ठरवली गेली आहे. हिंदू कालगणनेत विक्रम संवत् आणि शालिवाहन शके या दोन कालगणना महत्त्वाच्या आहेत. (Shalivahan Shake)
भारतात शक आणि विक्रम या दोन दिनदर्शिकांचे महत्त्व आजही आहे. शालिवाहन शके म्हणजे काय आणि याची सुरुवात कोणी केली, याबद्दल आपण आज जाणून घेऊया या. शालिवाहन राजाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. दक्षिण भारतात आजही ही कालगणना वापरली जाते. (Marathi Top Stories)
शक संवत्सर हे फाल्गुन महिन्यातील शेवटच्या अमावस्येनंतर चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी शुल्क पक्षात सुरू होते. महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यात शक संवस्तर हे शालिवाहन शक या नावाने प्रसिद्ध आहे. शालिवाहन शकाचा कालगणनेसाठी वापर करतो. शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं.(Marathi LAtest News)
=======
हे देखील वाचा : Mata Mahishasur Mardine : वाराणसीची माता स्वप्नेश्वरी !
=======
शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी पैठण ही होती. सातवाहन राजांनी महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशावर मोठा काळ राज्य केले. शकांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकात पश्चिम भारतावर आक्रमण केले आणि सातवाहन राजांची येथे असलेली सत्ता नष्ट केली. यामुळे काय झाले तर महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेले सातवाहन राजांचे वर्चस्व संपले आणि ते दक्षिणेत गेले.(Trending News)
याच सातवाहन घराण्यातील शिवस्वाती आणि गौतमी बलश्री यांचा पुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. गौतमी या सातकर्णी राजांच्या आई होत्या. सातवाहन राजांमध्ये असलेल्या मातृसत्ताक पद्धतीमुळे सातकर्णी यांच्या नावाआधी ‘गौतमीपुत्र’ असे लावले जाते. नाशिकजवळ असलेल्या गोवर्धन येथे सातकर्णी आणि शकांमध्ये मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये शकांचा राजा नहपान हा धाराशाही झाला आणि सातकर्णी विजयी झाले. या प्रदेशात मग पुन्हा सातवाहनांचे वर्चस्व स्थापित झाले.(Social News)
शालिवाहन ‘शके’ कसे झाले?
काही लोकांच्या सांगण्यानुसार, शालिवाहन शके या कालगणनेमध्ये वापरला जाणारा ‘शके’ हा शब्द शक या राजांशी संबंधित नाही. ‘शक’ ही केवळ कालगणनेची पद्धत असून, काही लोक त्याचा संबंध शकांशी लावत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ‘शक’ हा शब्द संवत अशा अर्थाने वापरात असलेला एक शब्द आहे. विविध शकं म्हणजे कालगणना आहेत. शालिवाहन राजानं इसवी सन ७८व्या वर्षी जी कालगणना सुरु केली तीच कालगणना आपण मराठी कालगणना म्हणून मानतो. (Gudhipadwa News)
=======
हे देखील वाचा : Uniform : माहिती आहे का….वकील काळा तर डॉक्टर पांढराच कोट का घालतात?
=======
शालिवाहन शक इसवीसन ७८ मध्ये सुरु झाला. जर आपल्याला आज आपण नक्की कोणत्या शालिवाहन वर्षात आहोत हे जर काढायचे असेल तर आजच्या इंग्रजी वर्षातून ७८ वजा केले की येणारी संख्या ही आजची शालिवाहन शक अर्थात वर्ष आहे. उदाहरणार्थ : २०२५ – ७८ = १९४७. म्हणजेच आज शके १९४७ सुरु झाले आहे. विक्रम संवत हे इसवी सन पूर्वी ५७ वर्षे आधी सुरु झाले आहे. म्हणजेच सध्या २०८२ विक्रम संवत वर्ष सुरु होणार आहे.