या सृष्टीचा संहार आणि विघटन ज्यांच्या अधिपत्याखाली आहे, ते भगवान शिव शंकर सर्वच हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहे. या जगामध्ये शिव शंकराची अनेक मंदिरं आहेत. शिव अस्तित्वात होते किंबहुना आजही आहेत, याच्या अनेक खुणा या मंदिराद्वारे आपल्याला मिळतात. आपल्या धर्मामध्ये देखील महादेवाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. याच शंकराचे आजही कोट्यवधी भक्त आहे. महादेवाचे वास्तव कैलास पर्वतावर आहेत असे म्हटले जाते. यांचे देखील अनेक दाखले पुराणांमध्ये आहेत. हिंदू धर्मामध्ये याच कैलास पर्वताला मोठे महत्व आहे.
शिव शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोकं बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर, अमरनाथ आदी अनेक महादेव असल्याचे अनुभूती करून देणाऱ्या ठिकाणी यात्रा करतात देवाचे दर्शन घेतात. असेच एक महादेवाचे प्रिय स्थान म्हणजे कैलास पर्वात. या जगामध्ये पाच कैलासाची उपस्थिती मनाली जाते. ज्यांचे शिव भक्तांमध्ये विशेष महत्व आहे.
हिमालय पर्वत ज्याला धार्मिक आणि भौगोलिक दृष्ट्या मोठे महत्व आहे. अशा या हिमालयाच्या पर्वत रांगामध्ये स्थित आहे पंच कैलास. या पाच पावन स्थळांमध्ये समावेश होतो, तिबेटमधील कैलास मान सरोवर, उत्तराखंडातील आदि कैलास, हिमाचल प्रदेशातील मणिमहेश, किन्नर कैलास आणि श्रीखंड महादेव यांचा. या पंच कैलासाला मोठे महत्व असून ते सर्वच हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. आज आपण याच पंच कैलासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कैलास पर्वत
भगवान शंकरांचे निवास्थान असलेला प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेट देशात स्थित आहे. पांच कैलास पर्वतांमध्ये हा पर्वत ६६३८ मीटर उंच आहे. आपल्या पुराणानुसार आणि आख्यायिकांनुसार भगवान शिव याच पर्वतावर निवास करतात. अजून एका मान्यतेनुसार याच कैलास पर्वताजवळच कुबेर देवाची नगरी देखील असल्याचे सांगितले जाते. तसेच कैलास पर्वताच्या वरती स्वर्ग आणि खाली मृत्यलोक आहे. कैलास पर्वताजवळ मानसरोवर आणि राक्षताल स्थित आहे. कैलास पर्वत कमीतकमी ६६०० मीटर पेक्षा देखील उंच आहे. पण आज पर्यंत कोणीही कैलास पर्वतावर चढू शकलेले नाही. तसेच मानसरोवरची यात्रा करणारे भाविक दुरूनच कैलास पर्वताचे दर्शन घेतात.
आदि कैलास
आदि कैलास, ज्याला छोटा कैलास आणि शिव कैलास देखील म्हणतात. कैलास पर्वतानंतर हे तिबेटमधील दुसरे सर्वात पवित्र पर्वत शिखर आहे. हा पर्वत भारत-तिबेट सीमेच्या जवळ भारतीय सीमा क्षेत्रामध्ये स्थित आहे. आदि कैलासला कैलास पर्वताची एक प्रतिकृती देखील मानले जाते. हा पर्वत समुद्रतळापासून कमीतकमी ५९४५ मीटर आहे. तसेच अशी धार्मिक मान्यता आहे की, महादेव जेव्हा माता पार्वतीसोबत विवाह करण्यासाठी वरात घेऊन आले होते तेव्हा ते इथेच थांबले होते. तसेच हा पर्वत शिवभक्तांसाठी लोकप्रिय स्थान आहे. या पर्वतात कैलास पर्वताचे छयाचित्र दिसते. तसेच येथील सरोवराच्या किनाऱ्यावर माता पार्वती आणि महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे.
किन्नर कैलास
किन्नर कैलास हिमाचल प्रदेश मधील किन्नौर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हा पर्वत कमीतकमी ६०५० मीटर उंच आहे. पौराणिक मान्यतानुसार किन्नर कैलास जवळ देवी पार्वती द्वारा निर्मित एक सरोवर आहे. ज्याला त्यांनी पूजेकरिता बनवले होते. याला पार्वती सरोवर नावाने देखील ओळखले जाते. या ठिकाणी भगवान शिव आणि पार्वती यांची भेट झाल्याचे मानले जाते. असे सांगितले जाते की, भगवान शिव प्रत्येक हिवाळ्यात किन्नर कैलास शिखरावर देवी-देवतांची बैठक भरते. इथे हिवाळ्यात बर्फ पडतो. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की हा पर्वत कधीच बर्फाने झाकला जात नाही. किन्नर कैलास पर्वतावर असलेले शिवलिंग दिवसभरात अनेक वेळेस आपले रंग बदलते.
मणिमहेश कैलास
मणिमहेश कैलास हिमाचल प्रदेश मधील चंबा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हा पर्वत कमीतकमी ५६५३ मीटर उंच आहे. हिमालयातील धौलाधर, पांगी आणि झांस्कर रांगांनी वेढलेला कैलास पर्वत मणिमहेश कैलास या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच मणिमहेश कैलास पर्वताजवळ मणिमहेश सरोवर आहे. पौराणिक मान्यतेनुसार महादेवांनी माता पार्वतीशी विवाह पूर्व हा पर्वत निर्माण केला होता.
श्रीखंड कैलास
श्रीखंड कैलास हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये स्थित आहे. समुद्रतळापासून हा पर्वत कमीतकमी ५२२७ मीटर उंचावर आहे. पौराणिक मान्यतानुसार इथे भगवान विष्णूंनी महादेवांकडून वरदान प्राप्त असलेल्या भस्मासुराचा नृत्याच्या मदतीने वध केला होता. श्रीखंड कैलासाची यात्रा खूप कठीण मनाली जाते. पण अनेक भक्त इथे कठीण यात्रा पार करून पोहचतात.