आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक सर्रास घरात आढळणारी एक गोष्ट म्हणजे सिलेंडर. सिलेंडरशिवाय कोणतेही स्वयंपाकघर कायम अपूर्णच असते. सिलेंडरमुळेच आपण स्वयंपाक करू शकतो. त्यामुळे केवळ घरातच नाही तर हॉटेलमध्ये देखील सिलेंडरचा वापर केला जातो. दर महिन्याला आपल्याघरी सिलेंडर येते. आपण सिलेंडर घेताना काही गोष्टींचे अजिबातच निरीक्षण करत नाही. केवळ पैसे देऊन जुने सिलेंडर देऊन नवीन घेतो. आपण जर नीट पाहिले तर सिलेंडरवर एक खास नंबर लिहिलेला असतो. आपण या नंबरकडे कायमच पाहून न पाहिल्यासारखे करतो. कधी विचार केला आहे प्रत्येक सिलेंडर हा नंबर का लिहिला जातो. यामागे नक्की कोणते कारण आहे? नाही….मग आज जाणून घेऊया. (Kitchen Tips)
सिलेंडरवर एक खास प्रकारचा नंबर लिहिला जातो. किंबहुना प्रत्येक सिलेंडरवर हा नंबर असतोच असतो. या नंबरमागे असते ती सिलेंडरची एक्सपायरी डेट. आपण गॅस सिलिंडरवर जो नंबर पाहतो वास्तवात ती सिलिंडरची एक्स्पायरी डेट असते. स्वयंपाकघरात येणाऱ्या गॅस सिलिंडरवर एजन्सीद्वारे हा नंबर लिहिला जातो. त्याला सिलिंडरची एक्स्पायरी डेट म्हणून ओळखतात. जेणेकरून एजन्सीचा कर्मचारी वा सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्याला हे सहज समजेल. परंतु, सर्वसाधारण ग्राहकाला हे समजणे खूपच कठीण असते. (Marathi)
या कोड्सवर बारकाईने पाहिले तर त्याची सुरुवात इंग्रजी अक्षरे A, B, C, D ने होताना दिसते. यानंतर अंक छापेलेले दिसून येतात. यातील इंग्रजी लेटर्सचा संबंध वर्षाच्या १२ महिन्यांशी असतो. म्हणजेच १ महिना हा ३ महिन्यांचे प्रतिनिधित्व करत असतो. यानंतर जे अंक येतात ते सिलेंडर तयार झालेले वर्ष दाखवत असते. याप्रकारे हा कोड दाखवतो कि तुमच्या घरात असलेल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट काय आहे. (Todays Marathi News)

A अक्षराचा वापर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांसाठी केला जातो. B अक्षरांचा वापर एप्रिल, मे आणि जून महिना दर्शवत असतो. C अक्षर जूलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने दर्शवतात, तर D अक्षराचा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांसाठी केली जाते. लेटरनंतर येणारा अंक वर्ष सांगत असतो. म्हणजे समजा एखाद्या सिलेंडरवर A.23 लिहिलेले असेल तर तो सिलेंडर वर्ष २०२३च्या पहिल्या तिमाहीत एक्सपायर होणार आहे. (Top Marathi News)
ज्या प्रकारे खाण्यापिण्याच्या खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट असते, त्याचप्रकारे या सिलेंडरची सुध्दा एक्सपायरी डेट असते. जर तुमच्या स्वयंपाकघरात मुदत संपलेला सिलेंडर बसवला असेल, तर तुम्हाला कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागू शकते. जर एखाद्या सिलेंडरवर B.25 लिहिलेले असेल तर त्याचा अर्थ असा कि तो सिलेंडर एप्रिल, मे किंवा जून महिन्यात एक्सपायर होणार आहे. त्याचप्रमाणे C जुलै ते सप्टेंबर आणि D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर असा होईल. मात्र त्यांची टेस्टिंग आवश्यक असते. म्हणजेच हे कोड सिलेंडरची रिक्वायर्ड टेस्टिंग डेट सुध्दा सांगत असतात. (Latest Marathi Headline)
========
Sleep : झोपेत उंचावरून पडत असल्याचा आभास का होतो?
========
या अल्फाबेटसोबतच वर्षही लिहिले जाते. उदाहरण म्हणून A-17 चा अर्थ आहे की गॅस सिलिंडरची एक्स्पायरी डेट जानेवारी ते मार्च २०१७ पर्यंत आहे. आणि यानंतर सिलिंडरचा वापर करणे धोकादायक आहे. या धोक्यांमध्ये सिलिंडरमधून गॅस लिकेज किंवा सिलिंडरचा विस्फोटही सामील आहे. इंग्रजी अल्फाबेटनंतर लिहिलेला आकडा हा एक्स्पायरीच्या वर्षाला दर्शवतो. उदा. १९ चा अर्थ २०१९ आहे. त्याचप्रमाणे २० चा अर्थ २०२०. म्हणजेच तुमच्या घरात जर C-17 लिहिलेला सिलिंडर असेल, तर तो एक्स्पायर्ड आहे. जर D-26 असे लिहिले असेल, तर त्याची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे, तुमच्या घरी एखादा सिलेंडर आल्यास, तुम्ही या यादीनुसार त्याची मुदत तपासू शकता. (Top Stories)
थोडक्यात A- जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, B-एप्रिल, मे, जून, C- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, D- ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि या अल्फाबेटपुढे लिहिला नंबर हा वर्ष दर्शवते. त्यामुळे आजपासून तुम्ही कधीही सिलेंडर गया तेव्हा त्याची एक्सपायरी बघून नक्की घ्या. जेणेकरून तुम्ही सिलेंडरसोबत घडणाऱ्या दुर्दैवी घटना नक्कीच टाळू शकतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
