Home » Brandy : ब्रॅंडीच्या बाटलीवर असणारे VS, VSOP, XO हे शब्द काय दर्शवतात?

Brandy : ब्रॅंडीच्या बाटलीवर असणारे VS, VSOP, XO हे शब्द काय दर्शवतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Brandy
Share

आपण सर्वच कायम बाहेरील पॅक फूड आणतो आणि खातो. अगदी सध्या चॉकलेट बिस्किट्सपासून ते रेडी टू इट जेवणापर्यंत सर्वच प्रकारचे पॅक फूड आपण आणत असतो. जर आपण हे फूडचे पॅक नीट पाहिले तर त्यावर विशिष्ट प्रकारचे कोड, चिन्ह, नंबर दिलेले असतात. आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण या सर्व गोष्टींचा खास अर्थ असल्याने ते अशा प्रकारच्या पॅकवर दिलेले असतात. सामान्यपणे हे खूपच छोट्या अक्षरात असल्याने कदाचित आपले दुर्लक्ष होत असेल, पण याला विशेष अर्थ असल्याने ते असे लिहिले जातात. उदाहरण द्यायचे झाले तर खाद्यपदार्थांवर लाल आणि हिरव्या रंगाचे एका छोट्या चौकात वर्तुळ असतात. जे तो पदार्थ शाकाहारी आहे की, मांसाहारी हे दर्शवते. अनेक प्रकारचे अर्थ सांगणाऱ्या सांकेतिक गोष्टी पदार्थवर दिल्या जातात. (Brandy)

आता दारूच्या बाटल्यांवर देखील काही सांकेतिक अक्षरं असतात, ज्याचा अर्थ खूपच कमी लोकांना ठाऊक असेल. जे लोकं ब्रँडी पितात त्यांना माहित असेल की, इंग्रजी वर्णमालेतील काही अक्षरं ब्रॅंडीच्या बाटलीवर समोरच्याच बाजूला ठळक अक्षरात लिहिलेले असतात. ब्रँडीच्या बाटलीवर अनेक कोड लिहिलेले असतात. आता अनेकांना वाटत असेल की हे कोड बाटलीचे सौंदर्य वाढवण्यासाठी, लोगोसाठी किंवा कंपनीचे नाव दर्शवण्यासाठी दिलेले असतील. मात्र असे नसते. (Marathi)

ब्रँडीच्या बाटलीवरील अक्षरांना खास अर्थ आहे. ब्रँडीच्या बाटल्यांवर असलेल्या VS, VSOP आणि XO या तिन्ही कोडचे वेगवेगळे अर्थ आहेत. मुख्य म्हणजे याच कोडवरून त्या ब्रँडीच्या बाटलीची किंमत देखील ठरते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ब्रँडीच्या बाटलीवरील VS, VSOP आणि XO हे कोड ब्रँडीचे वय आणि गुणवत्ता सांगतात. यातून ही वाईन किती जूनी आणि किती प्रिमियम हे ठरले जाते. आता हे कोड का वापरले जातात आणि त्यांचा अर्थ काय आहे ते पाहूया. (Top Marathi News)

Brandy

VS
VS (Very Special) या कोडचा अर्थ खूप खास असा आहे. या प्रकारातील वाईन किंवा दारू बाहेर विकण्यासाठी येण्याआधी दोन वर्षांपासून स्टोअरमध्ये साठवलेली असते. यामुळे वाईनच्या चवीवर देखील याचा एक खास परिणाम झालेला असतो. या वाईनच्या चवीत फळांचा सुवास असतो. याचाच अर्थ ही सर्वात नवीन ब्रँडी असते. (Top Stories)

VSOP
VSOP म्हणजे व्हेरी सुपीरियर ओल्ड पेल. हा कोड लिहिलेल्या बाटलीतील वाईन व्हेरी स्पेशल कोडपेक्षा जास्त काळ स्टोअर केलेली असते. या बाटलीतील वाईन ही ४ वर्षांपेक्षा जास्त काळ स्टोअर करून ठेवलेली असते. त्यामुळे या वाईनची चव ही व्हेरी स्पेशल कोडपेक्षा वेगळी आणि चांगली असते. (Marathi News)

XO
XO कोडचा अर्थ एक्स्ट्रा ओल्ड असा आहे. हा कोड वाईनच्या प्रीमियम ब्रँडीसाठी वापरला जातो. ज्या बाटलीवर हा कोड असतो त्यातील वाईन ही कमीत कमी १० वर्षे स्टोअर केलेली असते. त्यामुळे त्या ब्रँडीला सर्वात चांगली चव आलेली असते. ही सर्वात प्रिमियम ब्रँडी म्हणून ओळखली जाते. या ब्रॅंडीची किंमत देखील अधिक असते. या ब्रॅंडीची चव अनुभवण्यासाठी ती हळूहळू पिण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. (Top Trending News)

सामान्यपणे आपण ताजे फ्रेश खाण्याला आणि पिण्याला अधिक प्राधान्य देतो. मात्र वाईनच्या बाबतीत हा अपवाद आहे. वाईन जेवढी जुनी तेवढी ती चांगली, उत्कृष्ट आणि महागडी असते. मग असे का? ब्रँडी जास्त काळासाठी का साठवली जाते आणि यामुळे काय फायदा होतो? याचे उत्तर म्हणजे ब्रँडी जास्त काळासाठी स्टोअर केल्यास त्याची चव, दर्जा आणि सुगंध सुधारतो. यामुळेच एक्स्ट्रा ओल्ड कोड असलेली ब्रँडी अधिक महाग असते. यामुळे जी ब्रँडी जास्त काळ साठवलेली असते तिच्यावर XO हा कोड लिहिलेला असतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.