Home » ब्लॅक वॉटर म्हणजे काय? ते पिणे किती फायदेशीर आहे?

ब्लॅक वॉटर म्हणजे काय? ते पिणे किती फायदेशीर आहे?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Black Water
Share

निरोगी (Healthy) आणि उत्तम आरोग्यासाठी दररोज २ ते ३ लिटर पाणी (Water) पिणे आवश्यक असते. योग्य प्रमाणात आणि नियमित पाणी प्यायल्यामुळे आपण सर्वच आजारांपासून दूर राहून आपले आनंदी (Happy) जीवन व्यतीत करू शकतो. पाणी पिताना देखील अनेक लोकं कोमट पाणीच पितात, काही फक्त घरी बनवलेले अल्काईन वॉटर (Alkaline Water) पितात. मात्र यामध्ये मधल्या काही काळापासून एक पाण्याचा अजून एक प्रकार खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. (Water)

हा नवीन पाण्याचा प्रकार म्हणजे ब्लॅक वॉटर (Black Water). ऐकून थोडे विचित्र वाटले ना….? पण हो ब्लॅक वॉटर पिण्याचा मोठा ट्रेंड सध्या सुरु आहे. खासकरून सेलिब्रिटींमध्ये या पाण्याची क्रेझ खूपच आहे. विराट कोहलीला (Virat Kohali) तर अनेकदा हे पाणी पिताना पाहिले जाते. मग हे नक्की ब्लॅक वॉटर आहे तरी काय? आणि हे पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत? चला जाणून घेऊया या आणि इतर सर्व प्रश्नांची उत्तरं. (Black Water)

सामान्य पाण्याच्या पीएचची (PH) पातळी ७ असते तर ब्लॅक वॉटरची पीएच पातळी ही ८ ते ९ इतकी असते. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि विटामिनसारख्या अनेक खजिन्यांचा यामध्ये समावेश असतो. ब्लॅक वॉटरमध्ये अल्काईन असून नॉर्मल पाणी हे न्यूट्रल असते. त्यामुळे यात खनिजे आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. ब्लॅक वॉटर प्यायल्याने साध्या पाण्याच्या तुलनेत अधिक ऊर्जा मिळते. सध्या पाण्याला चव नसते परंतु ब्लॅक वॉटर पिताना सुरुवातीला थोडा कडवटपणा जाणवतो.

Black Water

ब्लॅक वॉटर रक्तातील चिकटपणा दूर करून व्यायामामुळे होणारे डिहायड्रेशन कमी करण्यास फायदेशीर ठरते. मिनरल्स आणि विटामिन्स यामध्ये मिक्स करण्यात आल्यामुळे ब्लॅक वॉटर हायड्रेशनसाठी अधिक फायदेशीर ठरते. व्यायामानंतर अनेकदा शरीर डिहाड्रेट होते पण ब्लॅक वॉटर प्यायल्याने लगेच फरक पडतो. साधारणत: मिनरल वॉटरची किंमत 20 ते 40 रुपये असते, मात्र या काळ्या पाण्याची किंमत प्रति लिटर 600 ते 3000 रुपये असेल. विशेषतः हे पाणी फ्रान्समधून आयात केलं जातं.

ब्लॅक वॉटर कसे तयार होते?
ब्लॅक वॉटर अथवा अल्काईन वॉटर हे दोन पद्धतीचे असते. नैसर्गिक (Natural) ब्लॅक वॉटर आणि कृत्रिम ब्लॅक वॉटर. पाणी डोंगरातून वाहून धबधब्याच्या (Waterfall) स्वरूपात कोसळते तेव्हा ब्लॅक वॉटर तयार होते. हे पाणी मिनरल्सच्या गुणधर्मांची युक्त असते. हे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल वाढते.

ब्लॅक वॉटर आणि नॉर्मल पाण्यातील फरक
या दोन्ही पाण्यात नेमका काय फरक आहे (Difference Between Black And Normal Water) ज्यामुळे ब्लॅक वॉटरची मागणी वाढली आहे जाणून घ्या. ब्लॅक वॉटरमध्ये अल्काईन असून नॉर्मल पाणी हे न्यूट्रल असते. ब्लॅक वॉटरमध्ये खनिजे आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स हे साध्या पाण्याच्या तुलनेत यामध्ये जास्त असून त्यात अधिक ऊर्जा असल्याचे सांगण्यात येते. साध्या पाण्याला चव नसते तर ब्लॅक वॉटरला सुरूवातीला थोडा कडवटपणा जाणवतो.

– काळ्या पाण्याचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामुळे डिहायड्रेशनपासून संरक्षण (Protection) होते. डीहायड्रेशनमुळे रक्तातील स्निग्धता कमी करण्याची शक्ती त्याच्या क्षारीय स्वरूपामध्ये आहे. सहसा व्यायामानंतर आपलं शरीर डीहायड्रेट होते.

– काळे पाणी हे अल्कधर्मी असते, जे तुमच्या पोटात चांगले बॅक्टेरिया (Bactria) वाढण्यास मदत करते. या गुणामुळे पचन (Digestion) आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते .

– काळे पाणी गॅस्ट्रिक ऍसिडचे स्राव देखील नियंत्रित करू शकते. यामुळे पित्त मूत्राशयाचे कार्य सुलभ करण्यास आणि शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते.

– या काळ्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे वृद्धत्व टाळण्यास मदत करतात आणि शरीरात डिटॉक्स म्हणून कार्य करतात.

– जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर काळे पाणी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हे HbA1c आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

Black Water

– अल्काईन वॉटर मेटाबॉलिजला अधिक उत्तेजना देण्यास मदत करते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर (Profit) ठरते. काळ्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया वेगवान होते. पचनक्रिया सुधारून तुम्हाला अधिक ऊर्जात्मक राहण्यास मदत मिळते.

– ब्लॅक वॉटरमधील हाय पीएच लेव्हल हे अ‍ॅसिड रिफ्लेक्सचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर ठरते. अ‍ॅसिडिटी (Acidity) संबंधित समस्या कमी करून पचनशक्ती अधिक चांगली करण्यासाठी ब्लॅक वॉटरचा उपयोग करता येतो.

– पचनशक्ती मजबूत होते यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही. पोटात (Stomach) चांगल्या जीवाणूंची वाढ होते.

– या पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हे पाणी प्यायल्याने अनेक इन्फेक्शन, आजार टाळता येतात. हे शरीराला डिटॉक्सिफाई देखील करते.

========

हे देखील वाचा : पोटावरील चरबी कमी करतील हे 5 Detox Water
                        Benefits of Jeera Water: वजन कमी करण्याबरोबरच अनेक समस्या सोडवते जिऱ्याचे पाणी
========

– ही मिनरल्स शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. आरओच्या पाण्यात पीएच पातळी कमी असून उच्च आम्लीय (Acid) स्वरूप असते. यामुळे कधीकधी शरीराला आरओ पाण्याची समस्या उद्भवू शकते.

– काही लोकांना व्हिटॅमिन आणि सप्लीमेंट्स अतिरिक्त घ्यावे लागतात. याकरिता ही कमतरता भरून काढण्यासाठी काळे पाणी काही प्रमाणात मदत करू शकते.

– ज्यांना पोटात ॲसिडिटीची समस्या आहे त्यांच्यासाठी अल्कधर्मी पाणी प्रामुख्याने फायदेशीर ठरू शकते. यामुळे तयार होणाऱ्या पेप्सिन एंजाइमची क्रिया कमी करण्यासाठी क्षारीय मिनरल वॉटर फायदेशीर ठरू शकते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.