ऋतू बदलला की लगेच त्याचा सर्वात आधी आणि जास्त परिणाम आपल्या रोजच्या भाज्यांवर दिसून येतो. भाज्या महागल्या की लगेच गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडते. २/३ रुपयांनी जरी भाज्या महाग झाल्या तरी त्याची तुफान चर्चा होते. आपल्या सामान्य लोकांच्या खिशाला या भाज्या महागल्या की लगेच कात्री लागते. मात्र तुम्हाला माहित आहे का की या जगामध्ये अशा काही भाज्या आहेत ज्यांच्या किंमती जर तुम्ही ऐकाल तर नक्कीच डोळे पांढरे होतील. अगदी सोन्यापेक्षा देखील महाग भाज्या या जगात मिळतात. कोणत्या आहेत त्या भाज्या आणि किती असते त्यांची किंमत चला जाणून घेऊया.
व्हाईट ट्रफल
इटली या देशामध्ये व्हाईट ट्रफल ही भाजी मिळते. ही भाजी मशरूप या विभागातली एक किंमती भाजी आहे. त्याची चव लसूण आणि चीज सारखी असते. या भाजीची शेती केली जात नाही. ही भाजी ओक, पाइन, चिनार या झाडांच्या मुळांमध्ये जमिनीखाली आपोआपच उगवते. ही भाजी तोडण्यासाठी पहाटे धुक्यामध्येच जावे लागते. या भाजीची किंमत ५ लाख रुपये किलो आहे.
मुत्सुताके मशरूम
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्सुताके मशरूमची किंमत ३ ते ५ लाख रुपये किलो आहे. मात्सुताके मशरूम आपल्या गंधासाठी ओळखले जाते. पांढऱ्या रंगाचे असते. याची भाजी अतिशय स्वादिष्ट असते.
‘ले बोनॉट’
ले बोनॉट या बटाट्याचे उत्पादन फ्रान्समध्ये घेतले जाते. ले बोनॉट जातीच्या एक किलो बटाट्याची किंमत १ लाख रुपयापर्यंत असते. फ्रान्समध्ये ले बोनॉट हा बटाटा विकला जाते. फ्रान्समध्ये केवळ मे ते जून या कालावधीतच या बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. या बटाट्याची चव मीठ, अक्रोड आणि लिंबाच्या चवीसारखी लागते. हे बटाटे खूप मऊ आणि नाजूक असतात.
हॉप शूट्स
हॉप शूट ही एक प्रकारची वनस्पती आहे. जी तिच्या विशिष्ट सुगंध आणि आंबट चवीसाठी ओळखली जाते. तसेच होपच्या फुलांचा वापर बिअरमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. हे जगाच्या अनेक भागांमध्ये ही भाजी पिकवली जाते, परंतु युरोपियन देशांमध्ये त्याला विशेष मागणी आहे. याची किंमत ८५,००० प्रति किलो असते.
यार्त्सा गुम्बू
या मशरूमला इंग्रजीत Caterpillar Fungus असे म्हणतात आणि आशियामध्ये यारत्सा गुनबु या तिबेटी नावाने प्रसिद्ध आहे. नेपाळ, भारत, तिबेट आणि भूतान या प्रदेशात 3000 ते 5000 मीटर उंचीवर हिमालयाच्या शिखरांमध्ये यार्त्सा गुनबू येतो. एक किलो यार्त्सा गुनबू खरेदी करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करावे लागतात.