सोशल मीडियावर काही काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. मधल्या काही काळापासून कलाकार, खेळाडू, नेते किंवा अगदी सामान्य लोकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसपासून ते इंस्टाग्राम स्टोरीजपर्यंत, अनेकदा सकाळी ११:११ किंवा रात्री ११:११ वाजताचे फोटो दिसतात आणि सोबतच काही सकारात्मक ईमोजी, संदेश देखील दिसतात. आता बऱ्याच लोकांना यामागचा अर्थ माहिती असेल पण बऱ्याच लोकांना याचा अर्थ अजूनही लागत नाही. मग चला जाणून घेऊया याबद्दल नक्की काय आहे ११.११? (Numerology)
११.११ यामागे एक खास अंकशास्त्र दडले आहे. ११:११ या अंकाकडे अनेक जण शुभ संकेत म्हणूनही पाहतात. घडाळ्याच्या काटावरही ११:११ किंवा १:११ असे दिसते तेव्हा त्याचा संकेत ‘Luck’ म्हणून पाहिला जातो. या अंकामध्ये दैवी आणि शुभ संकेत म्हणून पाहिले जाते. अंकशास्त्र आणि अध्यात्मिक जगात या विशिष्ट वेळेला एक शक्तिशाली संकेत मानले जाते. याला अनेकदा ‘एंजल नंबर’ किंवा ‘युनिव्हर्सचा प्रवेशद्वार’ असे सुद्धा म्हटले जाते. ११ अंक हा एक मास्टर अंक मानला जातो, जो उच्च चेतना, अंतर्ज्ञान, संवेदनशीलता आणि आत्म-जागृतीचे प्रतीक आहे. जेव्हा हे अंक दोनदा एकत्र दिसतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत आणि तुमचे विचार लवकरच सत्यात उतरणार. (Todays Marathi Headline)

घड्याळ्यात ११:११ ची वेळ दिसली की अनेक जण इच्छा बोलून दाखवतात आणि युनिव्हर्स प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अनेकजण यावेळी इतरांकडे त्याची वाच्यता करत नाहीत. ही इच्छा बोलून दाखवली तर ती पूर्ण होणार नाही अशीही काहींची धारणा आहे. ११ नंबर आणि ११:११ वेळेबाबत लक फॅक्टर आणि दैवी असण्याबाबत वेगवेगळे समज आहेत. जेव्हा ही संख्या चार वेळा जसे की, ११:११ येते, तेव्हा तिची ऊर्जा आणखी वाढते. अनेकांचे मत आहे की ही वेळ ‘जागृतीचा कॉल’ असतो. अर्थात जीवनाबद्दल अधिक जागरूक राहण्याची, स्वतःच्या हेतूंशी जुळवून घेण्याची आणि खऱ्या इच्छा प्रकट करण्याची संधी. (Latest Marathi Headline)
११:११ ची इच्छा लवकर manifest होते अशी धारणा आहे. या अंकासोबत psychic vibrations असतात. त्यामुळे लोकांना psychic awareness देण्यासाठी हा अंक वापरला जातो. त्याचे मानसशास्त्राचे निगडीतही सकारात्मक परिणाम आहेत. ११:११ वर मागितलेल्या इच्छा खरंच पूर्ण झाल्या आणि त्यामुळे त्यांना खूप विश्वास बसला. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याला कोणताही ठोस पुरावा नाही. अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ हे ‘कन्फर्मेशन बायस’ म्हणतात. म्हणजे जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा आपण ११:११ ला श्रेय देतो, पण जेव्हा नाही तेव्हा विसरतो. किंवा ‘सिलेक्टिव्ह पर्सेप्शन’ आपला मेंदू अशा पॅटर्नना जास्त लक्ष देतो जे आपल्याला आवडतात. (Top Stories)
=======
Chaturthi : जाणून घ्या माघ महिन्यात येणाऱ्या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
=======
मानसशास्त्र हे मान्य करते की जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयावर तीव्रतेने फोकस करता, सकारात्मक विचार करता आणि कल्पना करता, तेव्हा तुम्ही स्वतःच त्यासाठी पावले उचलता आणि यशाची शक्यता वाढते. म्हणजे ११:११ ही वेळ जादू नसून, तुमच्या मनाची शक्ती आणि फोकस वाढवण्याचा एक ट्रिगर किंवा रिमाइंडर ठरू शकते. प्लेसिबो इफेक्टसारखे. विश्वासामुळे प्रत्यक्ष फायदा होतो. ११.११ इच्छा मागताना हातातली कामं सोडून स्वतःवर तो क्षण लक्ष केंद्रित करा. या क्षण अनुभवण्याचा कोणताही चांगला किंवा वाईट मार्ग नाही. त्यांच्या मनाप्रमाणे हा क्षण ते अनुभवू शकतात. यासाठी केवळ डिजिटल क्लॉक नाही तर नंबर प्लेट, पत्ता, रस्त्याचा क्रमांक किंवा कोणतेही कॉम्बिनेशन काम करू शकते. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
