पर्यटन सगळ्या लोकांचाच अतिशय जिव्हाळयाचा विषय आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा सगळे लगेच कुठे जायचे फिरायला त्याचा प्लॅन बनवायला लागतात. काहींचे तर वर्षभराचे प्लॅन जानेवारी महिन्यातच तयार असतात. आपल्या देशात देखील फिरण्यासाठी अतिशय सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. अगदी बीचेस पासून तर डोंगर दऱ्या आदी अनेक सुंदर गोष्टी आपल्याला भारतात पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहित आहे का…? आपल्या देशात अशी काही ठिकाणं आहेत जिथे भारतीयांना प्रवेश नाही. ऐकून आश्चर्य वाटले ना…? हो आपलीच देशात अशा काही जागा आहेत जिथे आपल्याच देशातील नागरिकांना प्रवेश नाकारला जातो. जाणून घेऊया ही ठिकाणं.
उत्तर सेंटिनेल बेटे
उत्तर सेंटिनेल बेटे हे अंदमान आणि निकोबार या प्रसिद्ध बेटांमध्ये वसलेली बेटे आहेत. या ठिकाणी जगातील सर्वात जुनी आदिवासी जमात राहते. आजच्या आधुनिक काळात देखील या आदिवासी लोकांचा आजच्या युगाशी काहीही संबंध नाही आणि त्यांना बाहेरच्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे देखील नाही. या बेटांजवळ कोणीही आल्यास हे लोक हिंसक होऊन त्याची हत्या करतात. एवढेच नाही तर भारतीय लष्करालाही या ठिकाणी जाण्यास मनाई आहे.
अक्साई चीन, लडाख
लडाखमधील अक्साई चीन हे स्वर्गापेक्षा कमी नाही. तिथे खारट मिठाचे तलाव, दरी आणि करकाश नदीचे सौंदर्य विलक्षण आहे. पण या ठिकाणी भारतीय जाऊ शकत नाहीत. कारण त्या जागेबद्दल बराच काळ वाद सुरू आहे. भारत अक्साई चीनवर दावा करत तो लडाखचा भाग असल्याचे भारताचे म्हणणे आहे. १९६२ च्या युद्धात चीनने अक्साई चीनचा काही भाग ताब्यात घेतला होता.
बॅरेन बेट, अंदमान
बॅरेन बेट हे अंदमान समुद्रात आहे आणि भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचे घर आहे. या बेटाचे सौंदर्य जहाजातून दुरूनच पाहता येते. कारण इथे जाण्यास मनाई आहे.
लक्षद्वीपची काही बेटे
लक्षद्वीपमध्ये 36 बेटे आहेत, ज्यातील बहुतेक बेटांवर पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. याचे कारण स्थानिक स्वारस्य आणि नौदलाचा बेस देखील आहे. परंतु तुम्ही काही बेटांना भेट देऊ शकतात.
बीएआरसी, मुंबई
मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र अर्थात BARC हे पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहे. हे भारताचे प्रतिष्ठित अणु संशोधन केंद्र आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संशोधक आणि विद्यार्थ्यांशिवाय अभ्यागत प्रवेश करू शकत नाहीत. इथे प्रवेश मिळवण्यासाठी अनेक परवानग्या लागतात त्या मिळाल्यानंतर तिथे प्रवेश दिला जातो.