Home » हिवाळ्यात नियमित गूळ खा आणि राहा निरोगी

हिवाळ्यात नियमित गूळ खा आणि राहा निरोगी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jaggery In Winter
Share

आपल्याकडे कोणताही गोड पदार्थ करताना साखर किंवा गुळाचा वापर केला जातो. मात्र नेहमीच तज्ज्ञ, डॉक्टर किंवा इतर अभ्यासक सांगत असतात की, साखरेचे सेवन आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. साखरेला अनेक जाणकार मंडळी तर पांढरे विष म्हणतात. आज जिथे अनेक लोकं हळूहळू त्यांच्या आरोग्याप्रती जागरूक होताना दिसत आहे, तिथे अनेकांनी त्यांच्या आहारात बदल करत साखरेऐवजी गुळाचा वापर करताना दिसत आहे. गूळ खाल्ल्याने पदार्थाला चव तर येतेच सोबतच आपले आरोग्य देखील राखले जाते. साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. गुळात असलेले पौष्टिक तत्वे पाहता. साखरेऐवजी गोड पदार्थांमध्ये गुळ वापरला जातो.

सध्या हिवाळा हा ऋतू सुरु झाला आहे. थंडी हळू हळू वाढत असताना अनेकांनी आता आहारात बदल देखील केले आहेत. जेणेकरून हिवाळ्यात होणारे त्रास आणि वातावरणातील बदलांमुळे शरीराला कोणताही त्रास जाणवू नये. थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवण्याची विशेष आवश्यकता असते. त्यामुळे या काळात गरम गोष्टी सोबतच उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ खाण्याकडे कल दिला जातो. गुळ ही गरज पूर्ण करतो. गूळ उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला त्याच्या सेवनामुळे फायदा होऊ शकतो. हिवाळ्यातील दिवसांत गुळ खाणे हे औषधासमान आहे.

आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले घटक हे गुळामध्ये आढळले जातात. यात व्हिटॅमिन- ए आणि बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. हिवाळ्यात गूळ शरीरासाठी पॉवर बूस्टर म्हणून काम करतो. हिवाळ्यात गूळ खाण्याचे कोणते फायदे शरीराला होतात जाणून घेऊया.

पचनास मदत
जेवण झाल्यानंतर जर गूळ खाल्ला तर पचनशक्ती मजबूत होते. ज्या लोकांना गॅस किंवा अपचन याचा त्रास होत असेल त्या लोकांनी गुळ खाल्ला पाहिजे. गुळामध्ये अनेक पोषक घटक असतात जे पचनास मदत करतात.

Jaggery In Winter

अॅनिमिया कमी होतो
गुळात लोह चांगल्या प्रमाणात आढळते. शरीरात असलेली रक्ताची कमतरता गूळ खाल्ला की कमी होते आणि रक्ताची पातळी टिकवली जाते. त्यामुळे रक्ताची कमी असलेल्या लोकांनी गूळ नियमित खाल्ला पाहिजे. यामुळे लाल रक्तपेशी वाढतात. हिमोग्लोबिन कमी असल्यास गूळ खाऊ शकता. गुळामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते.

हाडे मजबूत होतात
जेवणानंतर दररोज गुळाचे सेवन केले तर यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.

लठ्ठपणा कमी होतो
गुळात असलेले पोटॅशियम चयापचय गतिमान करते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गूळ जास्त चांगला.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. गुळात झिंक आणि व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीरात उबदारपणा येतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

रक्ताभिसरण सुरळीत होते
हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. गुळात आढळणारे लोह रक्ताभिसरणाची गती वाढवते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.

दमाच्या समस्येवर प्रभावी
दमा, ब्राँकायटिसचा त्रास असणाऱ्यांना हिवाळ्यात छाती जड होण्याचा त्रास वाढू शकतो. गूळ खाल्ल्याने हा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. गुळामध्ये अंतीबॅक्टरियल आणि अँटी इम्प्लॉयमेंटरी गुणधर्म आढळतात जे फुफुसांमधील सूज कमी करून, त्यामध्ये जाणवणारा जडपणा कमी करण्यास मदत करतात.

गॅसवर ठरते फायदेशीर
गूळ खाल्ल्याने पोटातील अ‍ॅसिडीक पीएच योग्य राहण्यास मदत मिळते. तसेच यामुळे अ‍ॅसिडीटी आणि पोटात सतत होणाऱ्या गॅसपासून सुटका होते. अ‍ॅसिडीटी झाल्यास पाण्यात गूळ टाकून ते पाणी प्या, यामुळे अ‍ॅसिडीटीपासून सुटका होण्यास मदत होईल. यासह पोट फुगण्याच्या समस्येवरही गूळ खाणे फायदेशीर मानले जाते.

स्मरणशक्ती वाढते
नियमित गुळाच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. तसेच लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.

रक्ताच्या गुठळ्या थांबवतो
गुळात असलेले अँटीकोगुलेंट गुणधर्म रक्ताच्या गुठळ्या होण्यास रोखते. नसांच्या माध्यमातून शरीरातील सर्व भागातून रक्तप्रवाह सुरळीत होतो. हे संपूर्ण शरीरासाठी खूप चांगले असते.

========
हे देखील वाचा : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची माहिती आणि इतिहास
========

कोलेस्ट्रॉल कमी होईल
जे लोक रोज साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात त्यांच्या शरीरात साचलेले बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. त्याचबरोबर लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.

शरीराला मिळेल उर्जा
गुळात आढळणारे पोषक तत्वांमुळं तो एक उर्जेचा स्त्रोतही आहे. गुळ खाल्ल्याने एनर्जी मिळते त्याचबरोबर रोजच्या जीवनातील कठिण परिस्थीती हाताळण्यास उर्जा मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.