फिरायला सगळ्यांनाच खूप आवडते. देशात म्हणा, विदेशात फिरणे अनेकांचा छंद आहे, तर अनेकांना फिरण्याचे वेड आहे. काही लोक फक्त फिरण्यासाठीच पैसा कमवत असतात. असे हे फिरण्याचे वेड कमी अधिक प्रमाणात अनेकांना असते. देशात फिरण्यासाठी आपल्याला जास्त नियम, अटी जास्त काही नसतात. मात्र जेव्हा तुम्ही परदेशात फिरण्याचे ठरवतात तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे परदेशात जाण्यासाठी आवश्यक असतो तो व्हिसा आणि पासपोर्ट.
पासपोर्ट तर आजकाल सर्वच लोकांकडे अगदी सर्रास पाहायला मिळतो. मात्र प्रश्न असतो तो व्हिसाचा. कोणत्याही देशात फिरायला जाण्यासाठी व्हिसा खूपच आवश्यक आहे. व्हिसा म्हणजे काय तर ही एक प्रकारची सरकारची परवानगी असते. ज्यामध्ये आपल्याला त्या देशात प्रवेश करण्याची, विशिष्ट्य काळासाठी तो देश फिरण्याची, तिथे राहण्याची परवानगी दिली जाते. आता दुसऱ्या देशात जाण्यासाठी व्हिसा आवश्यकच असतो. मात्र असे अनेक देश आहेत ज्यांनी भारतीय लोकांना व्हिसा नसला तरी त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिली आहे. मग असे कोणते टॉप देश आहे चला जाणून घेऊया.
थायलंड
अतिशय सुंदर, स्वच्छ समुद्र किनारे, विविध सुंदर बेटे असलेला हा देश भारतीय लोकांना ६० दिवस म्हणजे दोन महिने व्हिसा शिवाय राहण्याची परवानगी देतो. थायलंडची अप्रतिम संस्कृती आणि शॉपिंग सेंटर खूपच प्रसिद्ध आहेत. भारतीय या देशामध्ये व्हिसाशिवाय ६० दिवस राहू शकता. शिवाय नंतर आपण स्थानिक इमिग्रेशन ऑफिसमधून ३० दिवसांपर्यंत आपले व्हिसा फ्री दिवस वाढवून घेऊ शकतो.
भूतान
भारताच्या अगदी जवळचा आणि भारतीय संस्कृतीशी बऱ्यापैकी साधर्म्य असलेला देश म्हणजे भूतान. हिमालयाच्या पर्वतांमध्ये वसलेल्या भूतानला स्वर्ग देखील म्हटले जाते. भूतान हा अतिशय सुंदर देश आहे. या देशाला निसर्गाने भरभरून सौंदर्याचे वरदान दिले आहे. भारतीय पर्यटक म्हणून या देशात आपल्याला व्हिसाशिवाय १४ दिवस राहता येते.
नेपाळ
भारताचा शेजारी म्हणून नेपाळ या देशाला ओळखले जाते. चारही बाजूनी हिमालय पर्वताने वेढलेला हा देश म्हणजे भारतीय संस्कृतीची प्रतिकृतीच आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि कांचनजंघा सारखे प्रसिद्ध आणि मोठे पर्वत या देशात आहे. प्राचीन इतिहासाशी संबंधित अनेक मंदिरे पाहायला मिळतील. नेपाळला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही.
मॉरिशियस
अतिशय सुंदर समुद्र किनारे, तलाव आणि विविध प्रकारे शैवाल हे मॉरीशचे वैशिट्य आहे. भारतीय पर्यटक या देशामध्ये व्हिसाशिवाय ९० दिवस राहून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. या देशात अनेक लोकं हिंदी भाषेत देखील बोलतात.
मलेशिया
इस्लामी देश असलेल्या मलेशियाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुंदर समुद्रकिनारे आणि मोठमोठी सुंदर शहरं. भारतीयांना या देशात व्हिसाशिवाय ३० दिवसांपर्यंत राहण्याची परवानगी आहे.
केनिया
“हजार टेकड्यांचा देश” म्हणून केनिया हा देश ओळखला जातो. हा देश वन्यजीव आणि ५० पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे. या देशात भारतीय लोकं व्हिसाशिवाय ९० दिवसांपर्यंत राहू शकतात.