अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शका-लेखिका ताहिरा कश्यप पुन्हा एकदा कॅन्सरची बळी ठरली आहे. सात वर्षांनंतर, ताहिराला पुन्हा एकदा स्तनाचा कॅन्सर झाला आहे. ज्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. ताहिराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “सात वर्षे वेदना सहन केल्यानंतर किंवा नियमित तपासणी केल्यानंतरही. मी दुसरा पर्याय निवडला आणि इतरांना नियमित मॅमोग्राम करत राहण्याचा सल्ला दिला. माझा राऊंड-2 सुरू झाला आहे’ ताहिराने आधीच ब्रेस्ट कॅन्सरशी यशस्वी लढा दिला होता. मात्र कॅन्सरला मत दिल्यानंतर पुन्हा एकदा ती याला बळी पडली आहे.
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री हिना खानला देखील ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मधल्या काही काळापासून ब्रेवस्त कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक महिला या आजाराला बळी पडताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती होणे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेणे वेळोवेळी स्वतःला तपासणे आवश्यक आहे. आज आपण या लेखातून ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जाणून घेऊया.
आजच्या आधुनिक आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका सतत वाढत आहे. या आजारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. महिलांमध्ये कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी १५ टक्के मृत्यू हे स्तनाच्या कर्करोगामुळे होत आहेत. हा आजार वाईट जीवनशैली मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा इत्यादी अनेक गोष्टींमुळे होऊ शकतो. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते.
=========
हे देखील वाचा : AC : आता एसी लावताना विजेच्या बिलाचे टेन्शन येते? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
==========
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखून पहिल्या स्टेजमध्येच त्यावर उपचार सुरू केला तर पेशंट बरा होण्याची शक्यता ८० टक्क्यांपेक्षा अधिक असते. दुसऱ्या स्टेजमध्ये उपचार सुरू केल्यानंतर ६० ते ७० टक्के महिला बऱ्या होतात. तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये याची माहिती मिळाल्यावर हा आजार नियंत्रणात ठेवणे खूपच अवघड जाते. यामुळे स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे सर्वच महिलांना माहित असणे आणि त्याची वेळोवेळी तपासणी करणे देखील आवश्यक असते.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
स्तनाचा आकार बदलणे
जर स्तनाच्या आकारामध्ये अचानक बदल जाणवत असेल एक स्तन दुसऱ्याच्या तुलनेत वाढत असेल तर हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
स्तनामध्ये सूज
स्तनामध्ये सूज येत असेल आणि त्याचे टिश्यूज अचानक जाड होत असतील तर दुर्लक्ष करू नका. हे स्तनाच्या कर्कराेगाचे लक्षण असू शकते.
वेदना
स्तनांमध्ये वेदना होत असतील आणि ते अचानक मऊ होत असतील तर याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.
काखेत सूज
काखेत सूज येणे हे ही ब्रेस्ट कॅन्सरचे एक महत्वाचे लक्षण असते.
गाठ
जर स्तनात एखाद्यी गाठ असल्याचे जाणवले तर हे स्तनाच्या कर्करोगाचे मुख्य लक्षण असू शकते. या गाठीमध्ये वेदना होऊ शकतात मात्र या वेदना सगळ्यांनाच होतात असे नाही.
त्वचेत बदल
स्तनाच्या आजूबाजूच्या त्वचेमध्ये बदल होणे देखील एक लक्षण असू शकते. शिवाय स्तनाच्या आजूबाजूला जसे पुरळ येणे, चट्टे येणे, त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या पडणे अशी लक्षणे देखील या कर्करोगाची असू शकतात.
=========
हे देखील वाचा : Shivaji Satam : सीआयडीची ओळख असणाऱ्या ‘एसीपी प्रद्युमन’चा प्रेरणादायी अभिनय प्रवास
==========
स्तनाचा कर्करोग उपचार
लम्पेक्टॉमी
जेव्हा डॉक्टर स्तनाला इजा झालेली गाठ काढून टाकतात तेव्हा लम्पेक्टॉमी केली जाते.
मास्टेक्टॉमी
मास्टेक्टॉमी दरम्यान, डॉक्टर ट्यूमर आणि कनेक्टिंग टिश्यूसह तुमच्या सर्व स्तनाच्या ऊती शस्त्रक्रियेने काढून टाकतात.
रेडिएशन
या कर्करोगावर उपचार करण्यासाठी डॉक्टर रेडिएशनचा वापर करतात.