कर कटेवरि उभा विठेवरि | युगे अठ्ठाविस राहिला | ऐसा लावण्य रुपाचा सोहळा | अजी म्या डोळा पाहिला ||
सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निघालेल्या वाऱ्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्या पंढरपूरला पोहचतात आणि आषाढीला विठ्ठलाचे दर्शन घेतात. महाराष्ट्रातील या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आता तर वारीला ग्लोबल ओळख देखील मिळाली आहे. संपूर्ण वारकऱ्यांचे किंबहुना महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल. या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने भाविक पंढरपूरला पोहचतात आणि डोळे भरून विठ्ठलाचे रूप बघतात. (Pandharpur)
विठ्ठल नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर कमरेवर हात ठेऊन उभा असलेला सावळा विठ्ठल आपल्या डोळ्यासमोरून येतो. विठ्ठलाचे संपूर्ण रूप मोहित करणारे आहे. मात्र तरीही विठ्ठलाला बघताच क्षणी आपले लक्ष वेधून घेणारी विठ्ठलाच्या मूर्तीतील एक गोष्ट म्हणजे देवाचा टिळा. विठ्ठलाच्या मूर्तीला लावला जाणारा चंदनाचा टिळा हा कायमच सर्वांचेच लक्ष आकर्षित करून घेतो. मात्र तुम्हाला माहित आहे का की या टिळ्याच्या मागे देखील एक खास गोष्ट आहे? या टिळ्याला देखील विठ्ठल पूजेमध्ये महत्व आहे? असे काय आहे या टिळ्यामधे चला जाणून घेऊया.(Marathi News)
विठुरायाच्या कपाळावर लावला जाणारा टिळा खूपच खास असतो. विठुरायाच्या भाळी असलेल्या चंदनाचा विशिष्ट पद्धतीचा टिळा खूप काही सांगून जातो. पूर्ण कपाळापासून ते नाकापर्यंत विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावला जातो. या चंदनावर अबीराचा काळा ठिपका देखील लावला जातो. अष्टगंध, अबीर आणि चंदन यांचे मिश्रण असलेला गंध विठ्ठलाच्या कपाळी लावला जातो. विठ्ठलाच्या भाळावर गोलाकार टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. (Todays Marathi HEadline)
आपल्या धार्मिक पुराणानुसार सांगितले जाते की, विठ्ठल हा भगवान श्रीकृष्णाचा आणि पर्यायाने विष्णूंचा अवतार आहे. विष्णूंचे मूळ स्वरुप आपण पाहिले तर येते की, ते समुद्राच्या तळाशी शेषनागावर विराजमान होऊन वास्तव्यास आहेत. शेषनाग हा कायमच विष्णूंच्या बरोबर असतो. विष्णूनी घेतलेल्या विविध अवतारांमध्ये देखील शेषनाग देखील वेगळ्या अवतारात येऊन त्याची सेवा देताना दिसला आहे. हा शेषनाग विष्णूंना त्याचा स्वामी मानत असे. विठ्ठल रुप धारण केल्यानंतर शेषनाग विष्णूंपासून दुरावला गेला. मग या शेषनागाचे प्रतिक म्हणून विठ्ठालाने कपाळावर टिळा लावला आहे. (Marathi Latest News)
विठ्ठलाच्या कपाळावरचा गोळाकार चंदनाचा टिळा हा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फण्यासारखा आहे. या चंदनाच्या गोलाकार टीळ्याच्यामध्ये काळ्या रंगाचा छोटासा ठिपका आहे. हा ठिपका अबीराने लावला जातो. याचा अर्थ शेषनागाच्या काळ्या रंगाच्या कांतीसमान हा रंग आहे. अशा पद्धतीने शेषनाग विष्णूंच्या विठ्ठल रूपात देखील त्यांच्यासोबत आहे. (Top Stories)
यासोबतच या तिच्यामागे अजून एक माहिती सांगितली जाते जी खूपच खास आहे. एका मान्यतेनुसार, विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरमध्ये येत असतात. आपल्या माऊलीला डोळे भरून पाहण्यासाठी अनेक तास तहान भूक विसरून दर्शनाच्या रांगेत उभे असतात. मात्र विठुराया म्हणतो की, मी लोकांच्या दर्शनासाठी येथे उभा आहे. मी माझ्या भक्तांची वाट बघत असतो. ते मला भेटण्यासाठी माझी प्रतीक्षा करतात हे मला पटत नाही. विठू माऊली भक्तांना तासंतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अपराध नष्ट करण्यासाठी एक कार्य करते. (Social News)
============
हे ही वाचा : Rathyatra : जिच्या स्पर्शाने होते पुण्यप्राप्ती अशा भगवान जग्गनाथांच्या रथाच्या दोरीचे नाव देखील आहे खास
=============
पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो जिथे भक्तांची रांग असते तिथली माती जमा केली जाते. ती माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळले जाते. त्यात अबीराचे मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाच्या टिळ्याच्या अगदी मधोमध लावला जातो. आपल्या भक्तांच्या पायाची माती कपाळावर लावून मिरवणारा सर्वांचा दयाळू विठ्ठल म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा आहे. (Marathi Trending News)