Home » Onam: केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ‘ओणम’ सणाचे महत्व

Onam: केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ‘ओणम’ सणाचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Onam
Share

आपल्या देशामध्ये इंग्रजी नवीन वर्ष हे १ जानेवारीपासून सुरु होते. मात्र भारतातील प्रत्येक राज्यामध्ये नवीन वर्ष सुरु होण्याची तारीख आणि काळ हा वेगवेगळा असतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरु होतेतर काहींचे दिवाळीतील पाडव्याला सुरु होते. पारशी बांधवांचे नवीन वर्ष पतेतीपासून सुरु होते. असेच आपल्या देशातील मल्याळी बांधवांचे नवीन वर्ष सुरु होते ‘ओणम’ या सणापासून. भारतातील केरळ राज्यामध्ये मल्याळम लोकं राहतात. ओणम हा सण मल्याळी लोकं अतिशय आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतात. केरळमध्ये चिंगम नामक महिन्याच्या शुद्ध पक्षात श्रवण नक्षत्रावर ओणम साजरा करण्याची पद्धत आहे. (Marathi News)

हाच ओणम सण आज सर्वत्र साजरा केला जात आहे. साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येतो. हा ओणम सण दहा दिवस साजरा केला जातो. २६ ऑगस्ट २०२५ पासून या सणाची सुरुवात झाली. आज या सणाचा शेवटचा आणि महत्वाचा ‘थिरुवोणम’ दिवस आहे. आजच्याच दिवशी ओणम सण साजरा करतात. ओणमलाच मल्याळम भाषेत तिरुवोनम असेही म्हणतात. ओणम विशेषतः शेतात चांगले पीक येण्यासाठी साजरा केला जातो. हा उत्सव भगवान विष्णूच्या वामन अवतारालादेखील समर्पित आहे. केरळमध्ये महाबली नावाचा राक्षस राजा होता असे म्हणतात. त्यांच्या सन्मानार्थ ओणम सण साजरा केला जातो. (Todays Marathi News)

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजा आपल्या न्यायीपणाबद्दल, पराक्रमाबद्दल आणि प्रजेवरील प्रेमाबद्दल प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि त्यावर रांगोळी काढली जाते. ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखला जातो. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. या दिवशी दान करण्यालाही महत्त्व असते. (Top Marathi News)

Onam

ओणमच्या दिवशी सकाळी मंदिरात जाऊन भगवान विष्णूची पूजा केली जाते. केळीचे पापड नाश्त्यात खाल्ले जातात. यानंतर लोकं ओणमची माला किंवा पाकलं बनवतात. या दिवशी लोकं आपले घर फुलांनी सजवतात. या दिवशी केरळमध्ये नौका शर्यतीचंही खास आकर्षण असतं. याशिवाय बैलांच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात. ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. शेतकरी पिकाची पूजा करतात. (Latest Marathi News)

ओणमच्या दिवशी मल्याळी लोकं खासकरून तांदूळ आणि तांदळाचे विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सोबतच सांबार, ओलण, रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू म्हणजे ताक बनवतात. यासोबतच केळीचे चिप्स, केळीचा शिरा, अवियल, संभार, खोबरीची चटणी आदी पदार्थ खासकरून बनवतात. (Top Trending News)

========

Ganeshotsav : भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान – सिद्धिविनायक मंदिर मुंबई

========

ओणमची आख्ययिका
श्रीविष्णूंनी वामनावतार धारण करत एका पावलामध्ये बळीराजाला पातळात ढकलले, ही कथा सर्वश्रुत आहे. मात्र, बळीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वरदान मागण्यास सांगितले. त्यानुसार बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या राज्यात येऊन प्रजेला भेटण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हापासून बळी राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो, असे मानले जाते. राजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही वामनाला दिले. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह बळी राजाची मूर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.