प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसणे, मेकअप करणे हे आवडतच असते. प्रत्येक स्त्रीला आपला चेहरा आणि त्याचे सौंदर्य जपायला खूप आवडत असते. त्यामुळे त्या नेहमीच घरगुती छोटे छोटे उपाय करताना दिसतात. जर आज तुम्ही कोणत्या स्त्रीला विचारले की ब्युटी प्रोडक्टमध्ये सर्वात जास्त काय आवडते? तर जवळपास सगळ्याच महिलांचे उत्तर असेल की, लिपस्टिक.
महिलांच्या मेकअपमध्ये लिपस्टीक एक महत्त्वाची गोष्ट आहे. ब्युटी प्रोडक्ट हे लिपस्टीक शिवाय नेहमी अपूर्ण असतात. पूर्वी महिला बाहेर जाताना, ऑफिसला जाताना फक्त पावडर लावायच्या मात्र आता लिपस्टिक सर्रास रोजच्या वापराची झाली आहे. लिपस्टिक ही फक्त ओठांना विविध रंग देण्यासाठी नाही तर एक चेहऱ्यावर ग्लॉव आणण्यासाठी, कॉन्फिडन्स देण्यासाठी आणि आपले हास्य खुलावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बाजवताना दिसते. आजच्या काळामध्ये लिपस्टीक शक्यतो दररोज आणि दिवसभर लावली जाते.
आज बाजारात देखील लिपस्टिकचे अगणित शेड उपलब्ध झाले आहेत. आपल्या चेहर्यानुसार, रंगानुसार, कार्यक्रमानुसार ही लिपस्टिक शेडनुसार लावली जाते. जिथे लिपस्टिक आपले सौंदर्य वाढवण्याचे काम करते तिथे हाच लिपस्टिक आपल्या आरोग्यासाठी देखील घातक असते. लिपस्टिकमध्ये अनेक हानिकारक केमिकल्सचा समावेश असतो. त्याचा त्रास अप्रत्यक्षरित्या तुमच्या आरोग्यावर होतो. लिपस्टीक दररोज लावणे हे आरोग्यासाठी अपायकारक असून यामुळे होणारे दुष्परिणाम आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
शरीरात विषारी घटकांची वाढ
लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल्स ओठांचे सौंदर्य जरी वाढवत असले तरी त्यामधील काही घटक हानिकारक असतात. लिपस्टिकमध्ये शिसे, bismuth oxychloride असते जे विषारी असते. ज्यावेळी तुम्ही सतत लिपस्टिक लावता त्यावेळी तुमच्या शरीरात केमिकल्सचे घटक वाढत असतात. तुम्ही पाणी पिताना किंवा खाताना याचा सतत वापर करत असाल तर तुम्हाला शरीरात लिपस्टिक जात राहते आणि ती कालांतराने परिणाम करते.
मज्जासंस्थेवर परिणाम
सतत लिपस्टिक लावण्याचा परिणाम मज्जासंस्थेवरही होतो. लिपस्टिक शरीरात सतत जात असली तर त्याचे गंभीर परिणाम मज्जासंस्थेवर होतात. लिपस्टिकमध्ये असलेले लीड जास्त प्रमाणात पोटात गेले तर पोटांमध्ये ट्युमर होण्याची शक्यता असते. लीडमध्ये न्युरोटॉक्झिन नावाचा असलेला हानिकारक घटक या लिपस्टिकचा माध्यमातून शरीरात जातो आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. सध्या आणि स्वस्त लिपस्टिकमध्ये लीडचे प्रमाण जास्त असते.
कॅन्सरची शक्यता
लिपस्टिक टिकवण्यासाठी त्यात अनेक प्रिझरव्हेटिव्ह टाकले जातात. शरीरासाठी अत्यंत घातक असे पॅराबिन आणि formaldehyde हे घटक त्यामध्ये असतात. लिपस्टिक तुमच्या त्वचेच्या पोर्समध्ये जाते. त्यामुळे कॅन्सर सारखा दुर्धर आजारही होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. लिपस्टिकच्या एका वापरानंतर तुम्हाला लगेचच हा त्रास जाणवणार नाही. पण लिपस्टिकमधील केमिकल्स शरीरावर असा परिणाम करतात.
मूत्रपिंड निकामी
लिपस्टिकमध्ये कॅडिअम, मॅग्नेशीअम आणि क्रोमिअम आदी अनेक हानिकारक घटक असतात. हे घटक शरीरासाठी फारच हानिकारक असतात. जे एखादा अवयव निकामी करु शकता. जर लिपस्टिकमध्ये कॅडिअमचे प्रमाण जास्त असेल तर मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त लिपस्टिकमुळे तुम्हाला पोटाचा ट्युमर किंवा पोटाचे इतर त्रास होण्याचीही शक्यता असते.
ह्रदय आणि मेंदूवर परिणाम
आपल्या शरीरात लीड हे वेगवेगळ्या माध्यमातून जात असते. हवा, पाणी आणि श्वसानाच्या माध्यमातून कळत नकळतपणे शरीरात लीड जात असते. लिपस्टिकमध्ये असलेले लीडही तुमच्या शरीरात असेच कळत नकळत जात असते. सातत्याने लिपस्टिक लावत असाल तर लिपस्टिकमधील लीड तुमचे शरीर शोषून घेते. लीड शरीरात गेल्यामुळे तुमच्या रक्ताला अडथळा निर्माण होतो. तुमच्या ह्रदयावर आणि मेंदूवर लीड परिणाम करते.
स्तनांचा कर्करोग
लिपस्टिक मधील अनेक हानिकारक घटक असतात. जे कॅन्सरसारखे गंभीर आजार तुम्हाला देऊ शकतात. महिलांना कॅन्सरमध्ये सर्वाधित जास्त भीती असते ती म्हणजे स्तनांच्या कॅन्सरची. लिपस्टिकमध्ये असणारे प्रीझरव्हेटिव्ह तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात गेले तर कॅन्सरची शक्यता अधिक बळावते. विशेषत: स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता यामध्ये जास्त असते.
ओठांचा रंग
ओठांना सतत लिपस्टिक लावल्याने ओठे कोरडे पडतात आणि ओठांना अगदी क्रॅक देखील पडू शकतात. यामुळे ॲलर्जी, ओठांचा रंग बदलणे आणि चेहऱ्यावरील त्वचेशी संबंधित इतर समस्या देखील होऊ शकतात. जास्त वेळ लिपस्टिक लावल्याने ओठांचा रंग गडद होऊ शकतो. ओठांना पुन्हा नैसर्गिक रंग मिळवता येणे कठीण असते. ओठांची त्वचा अत्यंत नाजूक असल्यामुळे ही रसायने त्वचेवर दीर्घ काळ परिणाम करतात.
खाज येणे
तुम्ही जर स्थानिक ब्रँडची लिपस्टिक वापरत असाल तर तुम्हाला खाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठ आणि त्यांच्या बाजूची त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेची लिपस्टिक वापरणे अतिशय आवश्यक आहे.
खनिज तेल
ओठांना चमक यावी यासाठी लिपस्टिक तयार करताना त्यामध्ये खनिज तेलाचा वापर केलेला असतो. मात्र त्यामुळे ओठांमधली नैसर्गिक रंध्रे बंद होतात. याचा तुमच्या ओठांवर वाईट परिणाम होतो.
पेट्रोकेमिकल
लिपस्टिक तयार करण्यासाठी पेट्रोकेमिकलचा वापर केला जातो. हे शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. कच्चे तेल आणि गॅस यांपासून याची निर्मिती केली जाते. यामुळे शरीराच्या अंत:स्रावाला इजा पोहोचण्याची शक्यता असते.