Home » Fairness Cream : सावधान! नियमित फेयरनेस क्रीमचा वापर करताय…? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

Fairness Cream : सावधान! नियमित फेयरनेस क्रीमचा वापर करताय…? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Fairness Cream
Share

प्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्याच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात सजग असतेच. गृहिणी असो किंवा ऑफिसला जाणारी स्त्री असो दररोज या महिला थोडाफार तरी मेकअप करतातच. काही महिला त्यांना त्यांच्या रंगाचा न्यूनगंड असतो म्हणून मेकअप करतात तर काही महिला आवड असल्यामुळे किंवा आपण अधिक गोरे आणि चांगले दिसावे म्हणून मेकअप करतात. (Fairness Cream)

सध्याच्या या मॉडर्न जगात मेकअप करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. आपले सौंदर्य अधिक खुलून येण्यासाठी स्त्रिया मेकअपचा आधार घेतात. जास्तकरून शहरातल्या, आधुनिक स्त्रिया मेकअप करताना विविध प्रकारचे अनेक प्रोडक्ट वापरतात. ज्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिक खुलून येईल. मात्र बहुतकरून जुन्या स्त्रिया आजही मेकअप करताना किंवा बाहेर जाताना फक्त एकच प्रोडक्ट वापरतात आणि ते म्हणजे फेयरनेस क्रीम. (Use Of Fairness Cream)

चेहरा स्वच्छ धुवून त्यावर आधी ही आवडीची फेयरनेस क्रीम लावायची मग टाल्कम पावडर लावायची झाला मेकअप. इतके साधे आणि सोपे गणित आहे. आजही विविध प्रकारच्या फेयरनेस क्रीम महिलांमध्ये कमालीच्या प्रसिद्ध आहेत. महिला दररोज देखील या फेयरनेस क्रीमचा वापर करताना आपल्याला सर्रास दिसतात. मात्र तुम्हाला माहित आहे का..? की या फेयरनेस क्रीमचा जास्त वापर करणे तुमच्या शरीरासाठी, त्वचेसाठी खूपच घातक ठरू शकतात. या फेयरनेस क्रीमचे नक्की कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात? चला जाणून घेऊया. (Fairness Cream Side Effects)

Fairness Cream

फेयरनेस क्रीममध्ये चेहरा उजळवण्यासाठी विविध केमिकल्सचा वापर केला जातो. या क्रीममध्ये दोन प्रकारचे ब्लिचिंग एजेंट असतात. हाइड्रोक्विनोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे घटक आढळतात. शिवाय या क्रीम्समध्ये ग्लुटाथिओनचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा फक्त त्वचेवरच नाही, तर इतर अवयवांवरही गंभीर परिणाम होतो. एका अभ्यासातून दिसून आले आहे की, यापैकी काही उत्पादनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक घटक आणि पाऱ्याचे प्रमाण असते. ज्याचा थेट मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. (Top Stories)

एका अभ्यासात असे निदर्शनात आले की, फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे अनेक महिलांना मूत्रपिंडासंबंधित बऱ्याच समस्या जाणवू लागल्या. फेअरनेस क्रीम्समध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे देखील यात दिसून आले. या क्रीम्सच्या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला पारा त्वचेद्वारे शरीरात शोषला जातो. त्यानंतर हा पारा मूत्रपिंडांपर्यंत पोहोचतो आणि मूत्रपिंडाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो. (Marathi Latest News)

===============

हे देखील वाचा :  Maratha History : मोघलाई की पेशवाई पहिली आली ? नेमकं सत्य काय ?

===============

यामुळे होते काय तर शरीराच्या स्वतःच्या उतींना आणि मूत्रपिंडात असलेल्या प्रथिनांना लक्ष्य करणाऱ्या अँटीबॉडीजचे उत्पादन सुरू होते. परिणामी रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे भविष्यात मूत्राशयासंबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. याशिवाय त्वचेला खाज सुटणे, ॲलर्जी होणे, त्वचा काळवंडणे आणि त्वचा पातळ होणे अशा अनेक समस्या सुद्धा या फेयरनेस क्रीमच्या वापरामुळे निर्माण होताना दिसत आहे.

जास्त प्रमाणात या फेयरनेस क्रीमचा वापर करणे तुम्हाला वेळेपूर्वीच म्हातारे करू शकतो. त्यामुळे टीव्हीवरील आकर्षक जाहिरातींना बळी पडू नका. ते लोकं निव्वळ त्यांच्या वस्तूचा खप वाढावा म्हणून खोट्या जाहिराती करतात मात्र सामान्य माणसं या जाहिरातींना भुलतात. असे घातक प्रोडक्ट वापरून गंभीर आजारांना बळी पडण्यापेक्षा स्वतःचा आहे तसा स्वीकार करणे कधीही चांगले आणि योग्यच असेल. तुम्हाला तुमचे सौंदर्य खुलवायचे असेल तर त्यासाठी निरोगी आहार, भरपूर पाणी पिणे, नीट झोप आणि नियमित व्यायाम करा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.