Home » Dog Cry रात्री कुत्र्यांचे रडणे म्हणजे अशुभ घटनांचा संकेत? जाणून घ्या मागील तथ्य

Dog Cry रात्री कुत्र्यांचे रडणे म्हणजे अशुभ घटनांचा संकेत? जाणून घ्या मागील तथ्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dog Cry
Share

आपल्या भारतामध्ये अनेक गोष्टींचा संबंध चांगले – वाईट, शुभ – अशुभ, योग्य – अयोग्य यांच्याशी जोडला गेला आहे. अंधश्रद्धा म्हणा किंवा पूर्वापार चालत आलेला विचार. मात्र आजही आपण अनेक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या निराधार आहेत. जसे की आपण चालताना मांजर आडवी गेली की आपले काम होणार नाही, कावळा काव काव करतोय म्हणजे पाहुणे येणार आदी अनेक प्रथा आपण पाळतो. मात्र कधी आपण विचार केला आहे की, खरंच या मागे काही शास्त्र आहे का? (Dog Cry)

आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी ऐकली असेलच आणि ती म्हणजे रात्री कुत्रे रडणे. कुत्र्यांचे रात्री रडणे अजिबातच चांगले मानले जात नाही. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या रडण्यामुळे अशुभ काहीतरी होते. कुत्र्यांचे रडणे हा अशुभाचा संकेत असतो. कोणाचा तरी मृत्यू होणार असेल तर कुत्रे रडतात. कुत्र्यांना भूत दिसते असा देखील अनेकांचा समज आहे. आदी अनेक कल्पना या कुत्र्यांच्या रडण्याशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र या सर्व कल्पना खऱ्या आहे की, अंधश्रद्धा? यामागे काही वैज्ञानिक कारण असू शकते का? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. (Marathi News)

Dog Cry

रात्री गाढ झोपलेले असतात अचानक आपल्याला एका विचित्र आवाजामुळे जाग येते. कानाला नकोसा वाटणारा तो आवाज म्हणजे कुत्र्यांच्या रडण्याचा. एरवी आपल्याला आवडणारा हा पाळीव प्राणी मात्र या रडण्याचा आवाज ऐकून नकोसा होतो. याच आवाजाच्या मागचे खरे कारण विज्ञानाने शोधून काढले आहे. मग वैज्ञानिक दृष्ट्या कुत्रे रात्रीच्या वेळी का रडतात? तर बहुतकरून थंडीच्या दिवसांमध्ये कुत्रे रात्री जास्त रडतात. त्यांना थंडी वाजते थंडी असह्य झाली की ते रडतात. (Why Dog Crying At Night)

या कुत्र्यांच्या रडण्यामागे अजून एक कारण म्हणजे कुत्र्यांना त्यांचा काही संदेश त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहचवायचा असेल तरी कुत्रे रडतात. यासोबत जर कुत्रे त्यांच्या ग्रुपपासून वेगळे झाले आणि रस्ता चुकले तर ते रडून दुसऱ्या कुत्र्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात. जर दिवसभरात कुत्र्यांना कुठे इजा झाली तर थंडीच्या दिवसात ती जखम रात्री जास्त दुखते तो त्रास सहन होत नसल्यामुळे देखील कधी कधी कुत्रे रडतात. जसे जसे कुत्र्यांचे वय वाढते तसे तसे कुत्र्यांच्या मनात भीती निर्माण होते. या भीतीपोटी देखील कुत्रे जोरजोरात रडतात. (Top Stories)

============

हे देखील वाचा : YouTube कडून रणवीर अलाहाबादियाचा व्हिडीओ डिलीट, कधी काढला जातो प्लॅटफॉर्मवरुन कंटेट?

============

कुत्र्यांच्या रडण्यामागील अजून एक कारण म्हणजे थंडीच्या दिवसात दिवस लहान तर रात्र मोठी येते. अशावेळेस कधी कधी कुत्र्यांना रात्री जोराची भूक लागते. ही भूक सहन न झाल्यामुळे देखील कुत्र्यांना रात्री रडू येते आणि ते जोरात रडतात. आपण जर पाहिले तर कुत्रे हे ग्रुपमध्ये राहतात. मात्र काही कारणामुळे जर कुत्रे एकटे पडले तर एकटेपणाच्या भीतीमुळे देखील ते रडतात. कधी कधी कुत्र्यांना त्यांच्या मृत साथीदाराची आठवण येते आणि या आठवणीत देखील हे कुत्रे रडतात. यावरून काय निष्पन्न होते तर कुत्रे रडणे हा कोणताही अशुभ संकेत आणि अप्रिय घटना नाही. कुत्रे त्यांच्या रडण्यातून त्यांच्या विविध भावना व्यक्त करतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.