नेहमी नेहमी नाही पण शक्य तेव्हा प्रत्येक कुटुंब हॉटेलमध्ये जेवायला जाते. घरी रोज स्वयंपाक करून कंटाळा आला की हॉटेलमध्ये जाऊन जेवायची सगळ्याची इच्छा होते. हॉटेलमध्ये जेवायला गेले की सर्वच आयते मिळते. आयते जेवण वाढण्यापासून ते हात धुण्यासाठी फिंगर बाऊल मिळेपर्यंत सर्वच गोष्टी आपल्यासमोर आपोआप येतात आणि आपल्याला तेवढाच आयते जेवण करण्याचा आनंद मिळतो.(Finger Bowl)
आतापर्यंत हॉटेलमध्ये एकदाही जेवायला गेला नाही असा व्यक्ती कोणीच नसेल. प्रत्येक जण महिन्यातून, सहा महिन्यातून, वर्षातून एकदातरी हॉटेलमध्ये जेवायला जातातच. हॉटेलमध्ये जेवायला जाणे अनेकांसाठी जरी छोटी गोष्ट असली तरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ती एक लक्झरी आहे. अगदी हात धुवायला देखील उठायचे नाही म्हटल्यावर तर ‘आई’ वर्ग थोडा ऑकवर्ड असला तरी खुश असतो. काही हॉटेलमध्ये जेवणाच्या आधी देखील फिंगर बाऊल (Finger Bowl) दिले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, हॉटेलमध्ये फिंगर बाऊल का दिले जाते? हॉटेलकडून त्यांच्या ग्राहकांना एवढी सेवा का दिली? आज या लेखात आपण हेच जाऊन घेऊया. (Top Stories)
फिंगर बाऊल म्हणजे काय?
फिंगर बाऊल म्हणजे काय तर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर ग्राहकांना जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी टेबलवरच एक कोमट पाण्याने भरले बाऊल दिले जाते. यात लिंबुचा एक तुकडा देखील असतो. या बाऊलमध्ये आपण हात टाकून आपले हात बसल्या ठिकाणीच धु शकतो. काही हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवण्याच्या आधी देखील फिंगर बाऊल दिले जाते. (Marathi Latest News)
फिंगर बाऊल देण्याची पद्धत भारताची नाही तर परदेशातील आहे. फिंगर बाऊल ही पद्धत आपल्याकडे अमेरिकेतून आली असून, ही खूपच जुनी पद्धत आहे. एका माहितीनुसार पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळेपासून ही पद्धत प्रचलित झाली. या युद्धाच्या वेळी जेव्हा जगातील सर्वच मोठमोठे प्रतिनिधी एकत्र एखाद्या हॉटेल्समध्ये रेस्टोरंटमध्ये एकत्र जायचे तेव्हा त्यांना हात धुण्यासाठी त्यांच्या रुममध्येच फिंगर बाऊल दिले जात. त्यानंतर ही पद्धत पुढे चालू ठेवली गेली. पुढे ही संस्कृती लहान हॉटेल्स आणि रेस्टोरंटमध्ये देखील प्रचलित झाली. काळानुरूप ही फिंगर बाऊल ही संकल्पना भारतात आली आणि आता सर्वच लहान मोठ्या हॉटेल्समध्ये अगदी सर्रास वापरली जाते. (Marathi News)
असे देखील सांगितले जाते की, परदेशात खूपच सुरुवातीच्या काळात हॉटेलमध्ये फिंगर बाऊलची सुविधा केवळ उच्चभ्रू लोकांचा दिली जायची. त्यानंतर हॉटेलकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देखील फिंगर बाऊल देण्याची पद्धत हॉटेलमध्ये सुरु केली गेली.
फिंगर बाऊलमध्ये लिंबु का देतात?
फिंगर बाउलमध्ये लिंबू टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे लिंबामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे कोमट पाण्यात लिंबू टाकल्याने हाताला लागलेला खाण्याचा गंध आणि तेल नाहीसं होतं आणि त्याव्यतिरिक्त असलेले हातावरील बॅक्टेरियाही नाहीसे होतात.
=============
हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट
=============
फिंगर बाऊल वापरण्याचे काही नियम
फिंगर बाऊल दिल्यांनतर त्यात कधीच पूर्ण हात बुडवायचा नाही. फक्त बोटंच बुडून ती धुवायची आणि बाजूला असलेल्या नॅपकिन किंवा टिशू पेपरला हात पुसायचा.
बाऊलमध्ये देण्यात आलेला लिंबू अगदी जोरात किंवा खूप जास्त पिळायचा नाही. किंबहुना हा लिंबु पिळायची गरजच नसते. जर तुमचे हात जास्तच तेलकट झाले असतील तर अगदी हलकेच लिंबु बोटांवर पिळावा आणि हात स्वच्छ करावे.