वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला आहे. आता सगळीकडे ख्रिसमस आणि न्यु इयर ची लगबग पाहायला मिळत आहे. अनेकांचे या महिन्याच्या शेवटी बाहेर जाण्याचे प्लॅन्स असतील. म्ह्णून या आठवड्यात बरेच लोकं घरीच राहणे पसंत करतील. वीकेंड्सला बाहेर देखील भरपूर गर्दी असते. त्यामुळे घरीच विकेंड कसा घालवावा असा अनेकांना प्रश्न पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या आठवड्यात ओटीटीवर अनेक उत्तम कलाकृती प्रदर्शित होत आहे. त्या पाहून तुम्ही तुमचा विकेंड मस्त एन्जॉय करू शकतात. आता ओटीटीवर या आठवड्यात कोणते सिनेमे प्रदर्शित होतंय ते पाहू.
अमरन
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि शिवकार्तिकेयन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अमरन’ ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र आता तो ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. ‘अमरन’ चित्रपट ५ डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
मटका
वरुण तेज, मीनाक्षी चौधरी, नोरा फतेही आणि सत्यम स्टारर चित्रपट ‘मटका’ १४ नोव्हेंबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करू शकला नाही. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर ५ डिसेंबरला होत आहे.
अग्नी
प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांचा ‘अग्नी’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
जिगरा
आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा ‘जिगरा’ चित्रपट ऑक्टोबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात आलियाचा जबरदस्त ॲक्शन अवतार पाहायला मिळाला. हा चित्रपट ६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
मायरी
‘मायरी’ ही एक टीव्ही सीरिज आहे, ज्यामध्ये तन्वी मुंडलेची भूमिका आहे. सचिन दरेकर निर्मित आणि दिग्दर्शित, ही एक रिव्हेंज ड्रामा सीरिज आहे. ही सीरिज ६ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होत आहे.
तनाव सीजन 2
‘तनाव’चा पहिला सीझन हिट झाल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन प्रदर्शित होत आहे. मानव विज, कबीर बेदी आणि रजत कपूर हे कलाकार ‘तनाव सीझन 2’ मध्ये दिसणार आहे. ही सीरिज ६ डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर रिलीज होत आहे.