उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरु होत आहे. नोकरदार वर्ग नवीन महिना सुरु झाला की, आधी त्या महिन्यात कोणते सण आहेत, कोणत्या कोणत्या सुट्ट्या आपल्याला मिळतील ते बघतात. सुट्ट्या पाहून अनेकदा कुटुंबासोबत विविध प्लँन्स देखील केले जातात. उद्यापासून नोव्हेंबर महिना चालू होत आहे आणि दिवाळी देखील पहिल्या आठवड्यातच संत आहे. त्यामुळे या महिन्यात नोकरदार वर्ग आणि बँकेचे कर्मचारी यांना कोणकोणत्या सुट्ट्या मिळणार आहे ते नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेयला या महिन्यातल्या सुट्ट्यांची यादी.
राज्यनिहाय सुट्ट्या
1 नोव्हेंबर : त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड,मेघालय, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये दिवाळी, कुट महोत्सव आणि कन्नड राज्योत्सवानिमित्त बँका बंद राहतील.
2 नोव्हेंबर : गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, उत्तर प्रदेशमध्ये दिवाळी, लक्ष्मी पूजा, विक्रम संवत नवीन वर्षाच्या दिवशी बँका बंद राहतील.
3 नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
7 नोव्हेंबर : बंगाल, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये छठ यात्रेमुळे निमित्त बँका बंद राहणार आहेत.
8 नोव्हेंबर (शुक्रवार): बिहार, झारखंड आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये छठ (सकाळी अर्घ्य)/वंगला उत्सवानिमित्त बँका बंद राहतील.
9 नोव्हेंबर (शनिवार): महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँकाना सुट्टी असेल.
10 नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
12 नोव्हेंबर (गुरुवार): उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, ओडिशा, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, बंगाल, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, इगास-बागवालच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
15 नोव्हेंबर (शुक्रवार): मिझोराम, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, महाराष्ट्र, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, जम्मू, उत्तर प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, श्रीनगरमध्ये गुरुनानक जयंती/कार्तिक पौर्णिमा/रहस पौर्णिमेनिमित्त बँक हॉलीडे असेल.
17 नोव्हेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
18 नोव्हेंबर : कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटकात बँकांना सुट्टी असेल.
23 नोव्हेंबर : मेघालयमध्ये सेंग कुत्स्नेमनिमित्त बँका बंद राहतील. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
24 नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.